सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

वॅलेंटाईनच्या दिवशी अण्णा उपोषण सुरु करतायत, सिंगल राहिलात तर फायदा घ्या.

अण्णा हजारे आणि महाराष्ट्र सरकारच नातं कसं आहे सांगायला नको. सासू अन सून पण कधी कधी एकत्र येत असतील पण महाविकास आघाडी आणि अण्णा हजारे यांच्यात एकमत होणार नाही. महाविकास आघाडीवर टीका करायला अण्णा मागेपुढे पाहत नाहीत तर सरकारचे समर्थक अण्णा कसे भाजप धार्जिणे आहेत म्हणून टीका करतात. बरं जाऊद्या आपल्याला काय करायचंय त्यांच्या भांडणाचं राहू द्या आपण आपल्या विषयाला येऊ ..

वॅलेंटाईनचा वीक चालूय, प्रेम वीर मस्त पैकी वॅलेंटाईन वीकचे वेग वेगळे डे साजरे करत असतील. किस डे, प्रपोज डे, हग डे वैगेरे …ज्याची सेटिंग झाली आहे त्यांना कशाची चिंता नाही. हे प्रेम वीर दुनियेला विसरले असतील. काही जण असेही असतील जे ह्या वर्षीच्या वॅलेंटाईन वीक मध्ये कोणीतरी मिळावी म्हणून ट्राय करत असतील. जे लोक ट्राय करत आहेत त्या सगळ्यांना आपल्याकडून शुभेच्छा. पण जर तुमच्या नशिबानं यंदा प्रयत्न फसला तर वाईट वाटून घेऊ नका भावांनो आणि बहिणींनो ..यंदा नाही तर पुढच्या साली होईल तुमचं काम. खचून नाही जायचं. अपयश हिचं यशाची पहिली पायरी असते लक्षात आहे ना ? …सो टेन्शन लेने का नहीं !

पोरगी नाही भेटली म्हणून वॅलेंटाईन डे साजरा करायचा नाही असं थोडीच असतंय. १४ फेब्रुवारीचा काही ना काही तरी प्लॅन पाहिजे कि नाही ? मी तुमच्यासाठी एक मस्त प्लॅन शोधला आहे. तुमचा वॅलेंटाईन डे पण भारी जाईल अन कोणाला कळणार पण नाही कि या वर्षी पण तुम्हाला कोणी मिळालं नाही ते. आता तुम्ही म्हणत असाल ह्या मराठी मिरर वाल्यानी काय वेगळं शोधलं असलं गडे. तर मित्रानो आपल्या मदतीला येणार आहेत समाजसेवक अण्णा हजारे. सांगतो काय करायचं ते ..वाचत राहा…सगळा प्लॅन करतो ओपन हळू हळू …

सरकार आणि अण्णाचा राडा झालाय .

तर तुम्हाला सांगतो राडा सुरु झालाय सरकारच्या एक निर्णयाने. दोन आठवड्यापूर्वी महसूल वाढावा म्हणून राज्य सरकारने किराणा दुकानांमध्ये वाईन विकायची परवानगी दिली. सरकारने निर्णय घेतला कि त्या निर्णयाला विरोध सुरु झाला. काही जण आंदोलन वैगेरे करू लागले. निर्णयाला विरोध होत आहे म्हंटल्यावर सरकारला मैदानात यावंच लागणार होते. तर सरकारच म्हणणं आहे कि वाईन काय दारू नाही. ‘अजित दादाच्या’ म्हणण्यानुसार तर वाईन अन दारू मध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. खरं सांगू आपल्याला काय अजित दादाचा तर्क आवडला नाही पण विषय वाईनचा आहे म्हणून आपण दुर्लक्ष करतोय दादाच्या तर्काकडे. सरकारने कितीही सांगितलं वाईन म्हणजे दारू नाही वैगेरे तरी अण्णा हजारे काय ऐकायला तयार नाहीत. अण्णांनी सरकारला एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला होता निर्णय मागे घ्यायला पण सरकारने घेतला नाही. मग काय अण्णांनी त्यांचं शेवटचं अस्त्र काढलं. १४ फेब्रुवारीला वाईन विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. अण्णा उपोषण करणार आहेत हे ठीक आहे पण आपल्यासाठी महत्वाचं १४ फेब्रुवारी.

नो बजरंग दल या वर्षी अण्णा उपोषण जिंदाबाद…

वॅलेंटाईनला सिंगल असण्यापेक्षा दुसरं मोठं दुःख ते काय. आपल्याला माहिती आहे ज्या पोरांना वॅलेंटाईनला पोरगी भेटतं नाही ते बजरंग दल जॉईन करतात. ज्यांना पोरगी भेटली आहे त्यांचं काम खराब करण्याचं पाप ते करतात. असो ती त्यांची दुःख साजरी करण्याची पध्दत आहे. या वर्षी मात्र आपल्याला बजरंग दलाची गरज नाही. कसं ते सांगतो, वॅलेंटाईनच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रभर अण्णांचे चाहते आंदोलन करणार. सगळ्या टीव्ही चॅनेलवर अण्णांच्या आंदोलनाचीच चर्चा असणार बरोबर ? आपण मस्त पैकी आपल्या शहरात जिथं आंदोलन आहे तिथे जायचं. सरकारच्या विरोधात घोषणा द्यायच्या. अण्णांचा विजय असो म्हणून मोठ्या गर्जना करायच्या. दिवस पण मस्त जाईल, ना कोणी आपल्याला चिडवायला येईल आणि वाईन विरोधात आंदोलन करण्याचं पुण्य वेगळं. बजरंग दलात जाऊन उगाच दुसऱ्यांना त्रास देण्यापेक्षा अण्णांच आंदोलन दुःख विसरायला मस्त जागा आहे असं वाटतंय.

काय वाटतं तुम्हाला ?

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.