सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

रशिया युक्रेन दोघांच्या भांडणात पाकिस्तानला 400 कोटींचा दंड लागलाय.

‘धमाल’ मधला “मानव” म्हणजेच “जावेद जाफरी” आठवतो का ? ‘धमाल’ बघितला असेल तर कोण विसरणार मानवला ? एकदम भारी काम केलं होत जावेद जाफरीने. एक सिन मध्ये ‘मानव’ म्हणतो , ” पता नहीं ऐसी सिच्युवेशन में कैसे आगे आ जात हू “. आपल्या सर्वांच्या ग्रुप मध्ये पण एक मानव असतोच असतोच जो प्रॉब्लेम झाला कि आपोआप पुढे येतो. म्हणजे स्वतः नाही थांबत आपोआप तो थांबतो आणि अडकतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तान धमाल मधला ‘मानव’ आहे. सांगतो कसं ते..

रशियाला बोलवून पुतिनने इम्रान खानचा चुटिया काटला आहे.

पाकिस्तान कसा आहे हे कोणाला सांगायची गरज नाही. पण बिचार्यांचं नशीब पण त्यांच्या सारखाच दरिद्री आहे. कोणी पण येत चुटिया बनवून जात. तर असं झालंय, युक्रेन आणि रशिया यांच्या युद्ध स्थित स्थिती होती. पुतिन युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी करत होता. युक्रेनवर हल्ला करण्याच्या दिवशी पुतिनला एक मोठा कार्यक्रम पाहिजे होता जेणे करून जगाला त्या बातम्या मध्ये अडकवून हल्ला करायला मदत होईल. त्या कार्यक्रमासाठी पुतिनने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानची निवड केली. रशियाने इम्रान खानला भेटीसाठी मास्कोला बोलावले. रशिया स्वतःहून मॉस्कोला बोलावत आहे म्हंटल्यावर इम्रान खानने निमंत्रण नकाराने शक्य नव्हते. इम्रान खानने निमंत्रण स्वीकारले. रशिया कडून काही मिळेल या आशेने इम्रान खान २२ फेब्रुवारीला मॉस्कोत पोहचले. मॉस्कोत पोहचल्यावर इम्रान खानने प्रतिक्रिया दिली होती. केवढ्या सही वेळेवर मी मॉस्कोत आलोय..

इम्रान खान बरोबर होते पण वेळ काय आहे , पुतिनच प्लॅन काय आहे याची इम्रान खानला आयडिया नव्हती. इम्रान खानच्या पोहचण्याचा एक दोन तासातच बातम्या आल्या कि रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. रशियाच्या युक्रेनच्या हल्ल्याने इम्रान खानची फाटली असेल. कारण पुतीनने आपल्याला भेटी साठी बोलावले आणि हा गडी युक्रेनवर हल्ला करतं आहे. जगाचं सगळं लक्ष रशिया वर आहे आणि अश्या वेळेला आपण रशियात आहोत ते पण हल्ला करणाऱ्या देशात. सर्व जग आपल्याला प्रश्न करणार पण इम्रान खानला हे काळयापूर्वी वेळ निघून गेली होती. आता इम्रान खान काहीही करू शकत नव्हता. सर्व जगाच्या बात्म्यावाल्यानी इम्रान खानच्या रशियाच्या बातम्या छापल्या होत्या. हल्ल्याच्या वेळेला बोलवून पुतीनने इम्रान खानचा चुटिया काटला आहे.

इम्रान खानला रशियात बघून अमेरिकेच्या गोट्या डोक्यात जाण साहाजिकच होतं.

अमेरिका आणि रशियाचे संबंध एकदम आपले अन पाकिस्तानचे जसे आहेत तसेच आहेत. आपल्यापेक्षा पण जास्त दुष्मनी आहे ह्यांच्यात. युक्रेन अमेरिकेचा दोस्त देश आहे. त्यामुळे युक्रेनवर हल्ला होऊ न देणं अमेरिकेची जबाबदारी होती. पण पुतिनने आम्रिकेला चेक मेट केलं आहे. साहजिक पुतिन आणि रशियावर अमेरिका प्रचंड नाराज आहे. एवढ्या संकटाच्या काळात एकेकाळी अमेरिकेचा दोस्त देश असलेल्या पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान मात्र रशिया मध्ये दिसले. इम्रान खानला रशियाला बघितल्यावर अमेरिकेने पाकिस्तानला मेसेज पाठवला कि तुम्हाला याची किंमत मोजावी

अमेरिकेने नुसती पोकळी धमकी दिली नाही तर त्यांनी लगेच पाकिस्तानला कुठे धक्का देता येईल याचा प्रबंध केला. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अमेरिकन ब्रँच वर मनी लॉन्ड्रिंगची केस लावली. ह्या केस मध्ये अमेरिकेच्या फेडरल बँकेने ४०० कोटींचा दंड स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला लावला आहे. अमेरिकेत बँक चालवायची असेल तर ४०० कोटींचा दंड भरल्याशिवाय पाकिस्तानला पर्याय नाही.

भांडण, युद्ध चालू आहे युक्रेन आणि रशिया यांच्यात पण तोटा झाला आहे पाकिस्तानला. एकदा दूध पोळलं कि म्हणतात माणूस ताक पण गार करून पितो. पण पाकिस्तानच्या बाबतीत हि म्हण काय खरी नाय कारण स्वातंत्र्या पासून अनेक वेळा पाकिस्तान असच दुसऱ्याच्या भांडणात गंडलाय. आता येथून पुढे पाकिस्तान सुधारतो कि मागचे पाढे तेच असं वर्तन ठेवतो हे बघावं लागेल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.