सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

समुद्राचा निळा रंग जवळ गेल्यावर वेगळा का वाटतो याचा शोध घेतला आणि त्यासाठीच नोबेल मिळालं.

विज्ञानाच्या जगात फार मोठी आख्यायिका सांगितलें जाते कि आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लावला. सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या आईन्स्टाईनला सफरचंद खाली का पडलं असा प्रश्न पडला आणि त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आईन्स्टाईनच्या शोधावर अनेक जण जोक पण करत असतात . पण जगातले सगळे शोध असेच लागले आहेत. प्रत्येक वैज्ञानिकाला एक प्रश्न पडतो आणि तो त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतो आणि काही तरी नवीन सापडतं. त्याला आपण शोध लावला असं म्हणतो.

भारतीय वैज्ञानिक ‘सी व्ही रमण’ यांना देखील असाच प्रश्न पडला होता. रमण ज्या वेळेस विमानातून जायचे तेंव्हा त्यांना समुद्र निळा दिसायचा पण ज्या वेळेस आपण समुद्राच्या जवळ जातो तेंव्हा मात्र पाणी आपला रंग बदलतो. हे आपण देखील बघितलं आहे. पण आपल्याला असा प्रश्न पडत नाही हा भाग वेगळा. पण ‘सी व्ही रमण’याना हा प्रश्न पडला आणि त्यांनी त्याचा शोध सुरु केला कि असं काय होत पाणी त्याच्या रंग बदलतो. त्यातूनच शोध लागला रमण इफेक्ट.

रमण इफेक्ट नेमका आहे काय ?

रमण इफेक्ट काय आहे हे सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला आपण असं म्हणून शकतो कि प्रवासात असलेल्या प्रकाशाला काही छोटे छोटे मॉलेक्युल अडवतात. प्रकाशाला अडवल्यामुळे प्रकाश त्याची वाट बदलतो आणि त्यातूनच प्रकाशाचा रंग देखील बदलून जातो. प्रत्येक रंगाची एक वेव्हलेन्थ असते. ज्या लेन्थ मध्ये प्रकाश धावतो तो रंग आपल्याला दिसतो. म्हणजे आणखी सोपं सांगायचं झालं तर समजा आपण विमानात आहोत आणि आपण समुद्राकडे बघितले तर आपल्याला पाणी निळं दिसत. पाणी जरी आपल्याला निळं दिसत असलं तरी पाण्याचा रंग बदलला नाही. आपल्या कडे म्हणजे विमात येणाऱ्या प्रकाशाची वेव्हलेन्थ बदलली आहे. ज्या वेव्हलेन्थ मध्ये प्रकाश येतो तो रंग आपल्याला दिसतो. निळ्या रंगाचाही वेव्हलेन्थ आपल्या पर्यंत येत म्हणून आपल्याला समुद्र निळा दिसतो. हाच आहे रमण इफेक्ट.

१९३० ला रमण इफेक्ट साठी नोबेल मिळालं.

सी व्ही रमण यांनी प्रकाशाला वेगेळे रंग का येतात हे जगाला समजून सांगितले, प्रकाशाचे रेफ्रकॅशन कसे होते याचा सोप्या पद्धतीत उलगडा केला. त्यामुळेच प्रकाशाच्या अश्या वागण्याला सी व्ही रमण यांच्या सन्मानात रामन इफेक्ट असं नाव देण्यात आलं. रमण यांच्या शोधामुळे विज्ञानाला खूप फायदा झाला. रमण इफेक्ट मुळे पुढे खूप शोधेल लागले. रमण यांच्या कार्याची दाखल नोबेल समितीने देखील घेतली आणि १९३० च्या पुरस्कारात भौतिक शास्त्रात सी व्ही रमण याना नोबेल घोषित झालं . १९३० पर्यंत फक्त भारतच नाही तर पूर्ण आशिया खंडातून सी व्ही रमण पहिलेच व्यक्ती होते ज्यांना केमिस्ट्री मध्ये नोबल मिळालं. रमन इफेक्टला साजरा करण्यासाठी भारत सरकार रमन इफेक्टचा ज्या दिवशी शोधला गेला त्या दिवसाला म्हणजे २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतं.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.