सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

एकेकाळचे फायरब्रॅन्ड नेते वरुण गांधींनी भाजप सोडण्याची तयारी केलीय.

असं म्हणतात, यशाला हजार बाप असतात अपयश मात्र नेमी अनाथ असते . एकदम सोप्या आणि आमच्या मराठवाडी भाषेत सांगायचं झालं तर हरणाऱ्याला घरचे पण विचारत नाहीत. भारतीय राजकारणात पण सध्या असच चालू आहे. २०१४ साली भाजप आणि नरेंद्र मोदी जिंकल्यापासून सर्व जण मोदी यांचे गुणगान करत आहेत. २०१४ पर्यंत सत्तेत असलेल्या काँग्रेसला मात्र वाईट दिवस भोगावे लागत आहेत. काँग्रेस मधून कोणी छोटा मोठा नेता जरी पक्ष सोडून गेला तर राष्ट्रीय बातमी होती. त्याची चर्चा केली जाते, पण वरुण गांधी भाजपा सोडत असताना कोणी त्याची चर्चा देखील करायला नाही. पण असच म्हणत नाहीत ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी मराठी मिरर उभे राहतं.

२०१७ ला योगीनी वरुण गांधींना मात दिली.

इंदिरा गांधी यांच्याशी वाद झाल्यावर संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी भाजपात आल्या. मेनका यांच्या पाठोपाठ २००४ पासून त्यांचे पुत्र वरुण गांधी देखील भाजपात आले. तरुण नेतृत्व म्हणून भाजपाने वरूण गांधींना पुढे केले होते. २०१४ पर्यंत सर्व ठीक होते पण नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर मात्र भाजपात सर्व काही बदलले. नवीन नेत्यांना संधी देण्यात आली. वरुण गांधी मागे पडले. नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांना जुळवून घेता आले नाही. केंद्रात काही मिळणार नाही हे तर पक्कं होत मात्र वरुण यांचं ध्येय होत युपीच्या मुख्यमंत्री पद. २०१७ पर्यंत वरुण यांनी त्यांच्या साठी उत्तरप्रदेशात नेत्यांची लॉबी बनवली होती. वरुण यूपीत मुख्यमंत्री होतील असा प्रचार चालू होता.

२०१७ च्या निवडणूक झाल्या भाजप प्रचंड बहुमताने जिंकला. मुख्यमंत्री निवडीच्या वेळी अनेक जण स्पर्धक होते पण वरुण यांचे पारडे सर्वात जड होते कारण भाजपासाठी ते २००४ पासून काम करत होते. सोबत गांधी नावाचा प्रिव्हिलेज पण होता. वरुण गांधी मुख्यमंत्री होऊ शकतात अश्या बातम्या यायच्या. पण योगी आदित्यनाथची एन्ट्री झाली आणि गेम बिघडला. योगी यांनी राज्यभर मुख्यमंत्री पदासाठी लॉबी तयार केली. केंद्रीय भाजपवर योगी आदित्यनाथने दबाव तयार केला. योगी आदित्यनाथच्या दबावापुढे भाजप झुकली आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली. योगी यांच्या सोबतच्या लढतीत वरुण यांची २०१७ साली हार झाली आणि मुख्यमंत्री पद गेले.

वरुण भाजपच्या विरोधात गेल्यामुळे मेनका गांधींचं मंत्रिपद गेले.

मुख्यमंत्री पद गेल्यामुळे वरूण गांधी भाजपच्या नेतृत्वावर नाराज होते. भाजपाच्या केंद्रीय नेत्यांकडे ते नाराजी व्यक्त करत. वरुण गांधी नाराज आहेत अश्या बातम्या यायच्या पण तस काही नाही म्हणून भाजप त्या बातम्या दाबायचा. वरुण यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली . २०१९ च्या निवडणुकीत वरुण यांच्या वर नरेंद्र मोदी खुश नव्हते पण फक्त एक जागा जाऊ नयेत म्हणून वरुण गांधी याना “पिलिभीत” मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. वरुण गांधी जिंकले मात्र त्यांच्या पक्ष विरोधी कामांमुळे त्यांची आई मेनका गांधी याना २०१९ ला नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात जागा दिली नाही. २०१४ ते २०१९ मेनका गांधी महिला आणि बालविकास मंत्री होत्या.

२०२२ च्या निवडणुकीत भाजपाविरुद्ध उघड भूमिका.

वरुण यांची आई मेनका गांधी यांचे मंत्रिपद गेल्यापासून वरुण उघडपणे पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेऊ लागले. निवडणूक नसल्यामुळे ते जास्त त्यांचे मत व्यक्त करत नसतं. पण लखीमपूर हत्याकांडाच्या पासून वरुण गांधींनी भाजपच्या विरोधात गेले. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते टेनी मिश्रा यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली. तेंव्हापासून वरुण सतत भाजप सरकारच्या निर्णयांचे विरोध करत आहेत. २०२२ च्या निवडणुकांमध्ये तर वरुण पक्षाच्या विरोधात काम करत आहेत. फक्त योगी नाही तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर पण वरुण गांधी हल्ला करत आहेत.

https://twitter.com/varungandhi80/status/1498157231157948421

भाजप वरुण गांधींना पक्षातून काढत का नाही ?

वरुण गांधी यांच्या भूमिके वरून तर स्पस्ट दिसत आहे कि पुढच्या काळात ते भाजपात राहणार नाहीत. पण मग प्रश्न उरतो कि भाजप वरुण गांधी याना भाजपातून काढत का नाहीये. याच उत्तर हे आहे कि वरुण सध्या भाजपचे खासदार आहेत. त्यांना पक्षातून काढताना त्यांची खासदारकी जाईल. त्यातून भाजपचाच एक खासदार कमी होईल. सोबत मेनका गांधी पण पक्ष सोडतील. आणि त्यांच्या पक्ष सोडण्याने भाजपाला काही फायदा देखील होणार नाही. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक झाल्यावर मात्र भाजप वरुण गांधींना बाहेरचा रास्ता दाखवू शकतं. पण त्यासाठी ऊतरप्रदेशच्या निवडणूक संपण्याची वाट पाहावी लागेल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.