सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

साऊथ च्या सिनेमांचा दर्जा कळण्यासाठी हे चार चित्रपट पाहून बघा.

साऊथ म्हणजे फक्त मारधाड समजणाऱ्यानी हे चार पिक्चर एकदा बघा दर्जा कशाला म्हणतात ते कळेल.

१) रतसासन

२०१८ मध्ये तामिळ मध्ये आलेला हा चित्रपट जर बघितला नसेल तर तुमच्या लिस्ट मध्ये एकदम टॉपला ठेवा. यु ट्युब वर हा हिंदीत उपलब्ध आहे. विष्णू विशालने यात मुख्य भूमिका केली आहे. याच चित्रपटासाठी तामिळ फिल्म फेअर अवॉर्ड दिग्दर्शक राम कुमारला मिळाला आहे. गेल्या दीड वर्षात या चित्रपटाने चांगलीच वाहवा मिळवली आहे. IMDB रेटिंग मध्ये पण ८.७ रेटिंगच्या जोरावर अव्वल आहे. हा एक crime थ्रिलर आहे. या चित्रपटाची कथा शेवट्पर्यंत खिळवून ठेवणारी आहे. पहिला अर्ध्या तासानंतर एक मिनिट पण तुम्ही उठणार नाही याची खात्री देऊ शकतो इतका चांगला हा चित्रपट आहे. ही कथा सुरु होते शाळेत जाणाऱ्या मुलींना अपहरण करून विचित्र पद्धतीने मारून टाकण्यापासून. या खुनाचा तपास करतोय पोलीस अधिकारी ज्याला खरं तर चित्रपट दिग्दर्शक व्हायचं आहे, पण यश न मिळाल्याने पोलीस होतो. या पोलिसांची भूमिका केली आहे विष्णू विशालने. संपूर्ण कथा खूप वास्तविक लिहिली आहे. कुठेच भडक, डायलॉग, सिन, ऍक्शन अजिबात नाही. पटकथा थ्रिल बरोबर भावनिक अंग पण चांगलं सादर करते. अशा पद्धतीने चित्रपटाचं दिग्दर्शन हॉलिवूड सारखंच वाटेल. हा चित्रपट बघितल्यानंतर आपण हे डोक्यातून काढायला हरकत नाही कि आपल्याकडे चांगले दिग्दर्शक, अभिनेते लेखक नाहीत.

२) एजन्ट साई श्रीनिवासा अथ्रेया

शेरलॉक होम्सचे कट्टर फॅन असणाऱ्यांनी हा चित्रपट तर बघायलाच पाहिजे. कारण पिक्चर मधला हिरो पण शेरलॉक होम्सचा फॅन आहे. गंमत म्हणजे हा हिरो पिक्चर बघूनच कोणती पण मर्डर मिस्ट्री सोडवता येते या मताचा आहे. सुरवातीला थोडं वाटू शकतं हे पण काही तरी फालतू स्टोरी आहे, पण जसं जसे प्रेत सापडायला सुरवात होते आणि आपला एजन्ट तपास करायला चालू करतो तेव्हा कळेल कि शेरलॉक होम्सला पण टक्कर देणारा हा डिटेक्टिव्ह आहे. एक महत्वाची गोष्ट अशी कि हिरो सहा फुटी आहे, कधीच मार न खाणारा, बुक्कीत दहा डोकी फोडणारा, असलं अजिबात यात काही नाही. विशेष म्हणजे या चित्रपटातील मुख्य ऍक्टर नवीन पॉलिशेट्टी हा त्याच वर्षी आलेल्या छिछोरे चित्रपटात त्याने ‘ऍसिड’ चा रोल केला आहे. छिछोरे मध्ये इतक्या हिरोच्या गर्दीत हा ऍक्टर तुमच्या लक्षात राहिला का माहित नाही. पण हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही त्याला अजिबात विसरणार नाही. ऍक्टर म्हणून तर त्याने भूमिका केलीच आहे पण याचबरोबर त्याने दिग्दर्शक स्वरूप RSJ सोबत पटकथा सुद्धा लिहिली आहे. अथ्रेया का बघावा तर हा मनोरंजनाबरोबर एका गंभीर सामाजिक विषयाला पण हात घालतो. अंधश्रद्धेला मान्यता मिळाल्यानेच गुन्हेगारी वेगवेगळ्या रूपात तुमच्यासमोर येत राहते. कोणावरही टिप्पणी न करता त्यांनी हा विषय उत्तम मांडला आहे. फार स्टोरी सांगत नाही लगेच बघायला चालू करा. Amazon Prime वर हा चित्रपट आहे.

३)विक्रम वेदा

जबरदस्त स्क्रिप्ट, बाप ऍक्टर, आणि Unpredictable character या सगळ्यांचं योग्य मिश्रण म्हणजे हा चित्रपट. आर माधवनच्या आयुष्यातील हा एका मास्टर पीस आहे. पण माधवन पेक्षा सगळं मार्केट खातो ते विजय सेतुपती. सेतुपतीला जर तुम्ही पहिल्यांदा बघाल तर बहुतेकांना वाटेल याच वय वास्तवात पण एवढंच आहे, इतका भारी अभिनय विजय सेतुपतीने केला आहे. टिपिकल हिरो व्हिलन या शेड मध्ये चित्रपट पाहणाऱ्यांनी तर हा नक्की चित्रपट बघावा. सुरवातीलाच हिरो आणि व्हिलन ठरवणारे आपण दोन्ही पात्रांना माणसं म्हणून बघतच नाही. कोण हिरो-व्हिलन हा विचार ना करता हा चित्रपट बघा नक्की मजा येईल. नावावरून लक्षात आलच असेल विक्रम वेताळची कथा आणि चित्रपटाचा काही तरी संदर्भ घेतला आहे. पण तो संदर्भ आजच्या काळातला आहे. यु ट्युब वर हिंदीत पहायला मिळेल.

४)अवनी श्रीमन्नारायण

तामिळ तेलगू सारखी कन्नड चित्रपट फार कानावर पडत नाही. पण २०१९ मध्ये आलेला हा कन्नड चिंत्रपट तुम्ही नक्की बघा. या चित्रपटाच्या वेळेस हिंदी मध्ये गुड न्यूज आला होता. गुड न्यूजने हा चित्रपटाला आपल्याकडे थिएटर मिळू दिले नाहीत त्यामुळे हा फक्त साऊथ कडे रिलीज झाला. तिकडे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. काही दिवसांनी हिंदी मध्ये याचा रिमेक नाही आला म्हणजे झालं. पौराणिक ग्रंथाचा अतिशय बारकाव्याने संदर्भ वापरून कथा मांडली आहे. खजाना शोधणाऱ्या कथा ऐकल्या असतीलच. ही पण तशीच कथा आहे पण ज्या पद्धतीने मांडणी केली आहे आणि कथेला कलाकारांनी जो न्याय दिला आहे. त्यातून हा एका उत्तम चित्रपट तयार झाला आहे. विशेष म्हणजे याचे सगळे लेखक कमी वयाचे आहेत. मुख्य भूमिकेतला रक्षित शेट्टी ज्याने पटकथा पण लिहिली आहे. एकूण सहा लेखकांनी मिळून ही स्टोरी लिहिली आहे. स्टोरी बरोबर संगीत पण मस्त आहे.Amazon Prime वर उपलब्ध आहे. subtitle ने बघितला तरी तुम्हाला चांगला समजेल. स्टोरी सांगणार नाही पण काही काही सिन एकदम भारी घेतले आहेत. काही सिन बघताना हॉलिवूडचा सिन घेतला कि काय असं वाटेल. गंभीर घटनांना पण वेगळ्या पद्धतीने मांडलं आहे. कौतुक करावं लागेल ते रक्षित शेट्टीच थोडं फार तुम्हाला जॉनी डेफ सारखा फील येईल रक्षितला बघून.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.