मराठवाड्यातला परभणी जिल्हा. त्यात छोट्याश्या गंगाखेड तालुक्यात कधी काळी मोठा डाकू होता, त्याची दहशद फक्त परभणी आणि मराठवाड्यातच नाही तर कर्नाटक पर्यंत होती असं सांगितलं तर आज विश्वास बसणार नाही. आजच्या काळात डाकूच संपले आहेत त्यामुळे विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे रुकम्या डाकू नाव होत त्याचं. चोरी करायच्या आधी रुकम्या गावात हलकी लावून सांगायचा आज रात्री त्याची गॅंग चोरी करायला येणार आहे म्हणून..
श्रीमंत लोकांच्या घरी चोरी करून गरीब लोकांना वाटायचा.
रुकम्या डाकुचा काळ होता १९७० ते १९८० च्या मधला. त्या काळात आपला देश किती गरिबी होती हे आपल्याला माहिती आहे. गरीब लोकांना खायला पण मिळत नसे. रुकम्याच्या घरी देखील गरिबी होती. काम करून देखील आपल्या हक्काचं आपल्याला मिळत नाही हे समजू लागल्यावर हा पठ्या चोऱ्या करायला लागला. आधी मजबुरी म्हणून सुरु केलेल्या चोऱ्यांमध्ये खूप कमी काळात रुकम्या डाकू चोरी करण्यात प्रो झाला. त्याने त्याची टोळी बनवली होती. रुकम्या दर दिवशी एक श्रीमंत माणूस शोधायचा त्यांची सर्व माहिती मिळवायचा. एकदा ठरलं कि ह्याच्या घरी चोरी करायची आहे. मग त्या माणसाच्या गावात हलगी लावून दवंडी दिली जायची कि आज रात्री ह्या माणसांच्या घरी चोरी होणार आहे…
विचार करा ज्याच्या घरी चोरी होणार असेल त्याचं काय होत असेल. पोलिसांना सांगायची सोय नाही कारण जर का पोलिसांना सांगितलं तर घरच्यांना मारायची धमकी रुकम्या डाकू कडून अगोदरच त्यांच्या पर्यंत गेलेली असायची. त्यामुळे ज्याच्या घरी चोरी होत आहे त्याला चोरी होताना बघण्याशिवाय काहीही पर्याय राहायचा नाही. चोरी केलेले सर्व सामान रुकम्या डाकू गरीब लोकांना वाटायचा. त्यामुळे गरीब लोकांमध्ये रुकम्या डाकू बद्दल खूप आदर होता.
चोऱ्या खूप केल्या पण बाईवर कधीही वाईट नजर टाकली नाही.
म्हातारे लोक असं सांगतात कि रुकम्याला लहान असताना एका मुलीवर प्रेम झाले होते. त्या मुलीचे वडील काय रुकम्याला आपली पोरगी द्यायला तयार नव्हते मग काय रुकम्याने त्या मुलीला पळवून आपली बायको केली. एकदा लग्न केल्यावर रुकम्याने कधीही दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघितले नाही. चोरी करताना पण त्याने ते तत्व पाळले. घरातले सर्व सामान तो चोरी करताना घेऊन जायचा पण घरातल्या स्त्रीला तो कधीही हात लावत तसे . एकदा तर असे झाले होते, त्याच्या गॅंग मधल्या माणसाने एके ठिकाणी चोरी करताना मंगळसूत्र चोरून आणले होते. हि गोष्ट ज्या वेळेस रुकम्या डाकूला कळली तेंव्हा तो स्वतः त्या घरी गेला आणि मंगळसूत्र परत करून आला. चोरी करताना मंगळसूत्र चोरायचे नाही असा त्याच्या गँगचा नियम होता. चोरी करणारा दरोडेखोर फक्त मंगळसूत्र द्यायला परत आल्यामुळे रुकम्या डाकूंची लोकांमध्ये एक वेगळी प्रतिमा बनली होती.
रुकम्या डाकूंची पॉवर भावांच्या डोक्यात गेली..
रुकम्या डाकू चोऱ्या करायचा त्यामुळे त्याची परिसरात एक दहशद होती. सर्व लोक त्याला घाबरायचे. साहजिकच आपला भावाची एवढी पॉवर असल्यावर कोणताही भाऊ उडणारच. रुकम्याचे भाऊ पण हवेत जायला लागले आणि त्यातच रुकम्या डाकुचा अंत झाला. तर झालं असं, आपल्याला कोणी बोलणार नाही म्हणून रुकम्याचे भाऊ त्याच्या गावातल्या लोकांना त्रास द्यायला लागले. रुकम्या डाकू मुळे लोक त्यांचा अत्याचार सहन करायचे पण एकदा त्यांनी मर्यादा ओलांडली. रुकम्या डाकूंच्या चार भावांनी मिळून एका महिलेची अब्रू लुटली. गावातल्या लोकांना ह्या घटनेमुळे धक्काच बसला. ह्यांचा काही तरी निकाल लावावा म्हणून गावातले लोक त्यांना भेटायला गेले आणि त्यांच्यात भांडण झालं. गावकर्यांनी त्या चारही जणांचा खून केला. १९८२ चं अंतरवेली हत्याकांड म्हणून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं.
अंतरवेली हत्याकांडातच रुकम्या डाकूला पोलसांनी अटक केली. आज प्रयन्त ज्या रुकम्या डाकूला पोलीस हात घालू शकले नव्हते त्याला भावांच्या वाईट कामांमुळे पोलिसांनी अटक केली. काही दिवसानंतर रुकम्या डाकू जेल मधून बाहेर आला मात्र त्याचा दरारा संपून गेला होता. तिथून पुढे रुकम्याने साधे आयुष्य घालवले. सरकारने त्याला देशी दारूचा परवाना दिला होता. गंगाखेड मध्ये आजही रुकम्या डाकूने चालवलेले दारूचे दुकान आपल्याला पाहायला मिळते. फक्त ते आता दुसऱ्याच्या मालकीचे आहे.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?