सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

ऑफ स्पिनने क्रिकेटचं मैदान गाजवलेला हरभजन सिंह राज्यसभेत जातोय

कोणताही मोठा माणूस किती फेमस आहे हे बघायचं असेल तर किती लोक त्याच्या सारखी स्टाईल करतात ह्यावरून तपासावं. क्रिकेट मध्ये खूप खेळाडू फेमस आहेत पण भज्जीची लोकप्रियता सगळ्यांपेक्षा खास होती. भज्जीची बॉलिंग स्टाईल सर्वानी कधी ना कधी कॉपी केलेली असतेच. बाकीच्या बद्दल काय बोलावं माझं स्वतःच सांगतो, माहित नाही लहान असताना क्रिकेट कसं आवडायला लागलं. भारताची मॅच मी कधीच मिस करत नव्हतो. एकदा मॅच संपली कि मग काय पोरांना घेऊन मैदानावर माझा दिवस जायचा. बॅटिंग काय मला जमत नव्हती म्हणून बॉलिंग करायचो पण त्यात पण फास्ट जमायची नाही. त्यामुळे चालाकी करून मधला मार्ग काढला आणि भज्जीची बॉलिंग स्टाईल कॉपी केली. मला फास्ट बॉलिंग करता येत नाही हे पण कोणाला कळलं नाही अन माझी बॉलिंग पण चालू राहिली. तेंव्हापासून भज्जी माझा फेव्हरेट खेळाडू आहे. मागच्या वर्षी भज्जीने क्रिकेट मधून सन्यास घेतला मात्र या वर्षी भज्जी त्याची राजकारणाची नवी इंनिंग चालू करतोय म्हंटल्यावर आनंद होणारच ना ..

पंजाब जिंकल्यामुळे आम आदमी पक्षाचे पाच खासदार वाढलेत.

नुकत्याच पंजाब विधानसभा निवडणूक संपल्या. आम आदमी पक्षाने एकूण ११७ पैकी ९२ जागा जिंकत पंजाबमध्ये सरकार बनवले आहे. आम आदमी पक्षाला पंजाब मध्ये बोनस मिळाला आहे. विधानसभेच्या निवडणूक झाल्याच्या वीस दिवसातच पंजाबच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आमदारांचे मतदान घेतले जाते. विधासभेत आम आदमी पक्षाकडे सर्वात जास्त आमदार असल्यामुळे निवडून येण्या साठी लागणारे संख्याबळ आम आदमी पक्षाकडे आहे. राज्यसभेचे पाच पैकी पाच खासदार आपचे निवडून जाणार आहेत. सध्या राज्यसभेत आम आदमी पक्षाचे तीन खासदार आहेत त्यात पंजाब मधून पाच वाढणार आहेत. काँग्रेस , भाजप , तृणुमूल काँग्रेस यांच्यानंतर राज्यसभेत आपचे मोठे संख्याबळ झाले आहे.

हरभजन सिंह आणि अभिनव बिंद्रा यांच्या नावाची चर्चा आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शपथ झाल्यापासून राज्यसभा निवडणुकीचे संभावित उमेदवारांची चर्चा होत आहे. पंजबाच्या जालंधर शहरात आम आदमी पक्ष क्रीडा विद्यापीठाची स्थापना करणार आहे. जालंधर मध्ये होणाऱ्या क्रीडा विद्यापीठासाठी आपला एका अनुभवी खेळाडूची गरज लागणार आहे. त्यासाठी पाच पैकी एका जागेवर आप खेळाडूला खासदार करणार असल्याचं इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने बातमी छापली आहे. जालंधर शहराचा सुपुत्र हरभजन सिंह याची आपने राज्यसभेसाठी निवड केली असल्याचं ‘द हिंदू’ ने बातमी छापली आहे. पण हरभजन सिंह यांच्या सोबतच ऑलम्पिक मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळूवुन देणारा ‘अभिनव बिंद्रा’ याच्या नावाची पण बातमी पंजाब टाइम्सने छापली आहे.

मागच्या वर्षी सन्यास या वर्षी संसद..

२०११ च्या विश्वचषकानंतर हरभजन सिंहाचा फॉर्म चांगला नव्हता. २०११ नंतर अनेक दिवस भज्जीने क्रिकेट खेळले पण २०१५ चा विश्वचषक आणि २०१७ च्या चॅम्पियन ट्रॉफीत भज्जीला जागा मिळाली नाही. भारतीय संघात जागा मिळत नसली तरी भज्जीने आयपीएल मध्ये मात्र खेळत होता. २०२१ च्या आयपीएल मध्ये कोलकत्याच्या संघाकडून भज्जी खेळाला होता. पण २३ वर्षाचं करियर संपवत २४ डिसेंबर २०२१ ला सर्व क्रिकेट मधून सन्यास घेतला.
क्रिकेट मधून सन्यास घेतल्यावर भज्जी काही दिवस त्याच्या परिवारा सोबत सुट्टी वर होता. जानेवारी महिन्यात सुट्टीवरून आल्यावर त्याने त्यावेळच्या पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांची भेट घेतली होती. सिद्धूची भेट घेतल्यापासून भज्जी राजकारणात येणार अश्या बातम्या येत होत्या. भज्जी पंजाब विधानसभा लढवणार अश्या बातम्या पण येत होत्या पण तो लढला नाही.
आता निवडणुकीनंतर मात्र हरभजन सिंह आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. भज्जी जर राज्यसभेवर गेला तर जालंधरच्या क्रीडा विद्यापीठाची जबाबदारी पण भज्जी कडे दिली जाऊ शकते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची 2१ मार्च शेवटची तारीख आहे तर मतदान ३१ मार्चला होणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.