सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मेलो तरी MIM सोबत युती नाही म्हणणाऱ्या शिवसेनेने मुस्लिम लीग सोबत आघाडी केली होती

भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत एमआयएमचे ( MIM ) औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत आघाडी करायची तयारी दर्शवलीय. जलील यांच्या या ऑफरनंतर महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्यात, सोबत भाजपमधूनही शिवसेनेवर टीका सुरू झालीय.
” एमआयएम (MIM) ही भाजपची B टीम आहे. अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तींसोबत भाजप सत्तेत सहभागी झाला होता. तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणे शक्य नाही. त्यामुळे MIM सोबत आघाडी करण्याचा प्रश्नच नाही, मेलो तरी MIM शी युती नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

शिवसेनेची एमआयएमबाबत भूमिका विरोधाची आहे , असा सूर शिवसेनेतूनच असला तरी इतिहासात डोकावल्यास शिवसेना विरोधी विचारांच्या पक्षांसोबत सत्तेत सहभागी झाल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांशी शिवसेनेनं आजवर संघर्ष केला होता, मात्र 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत जाऊन बसलीय. असाच शिवसेनेचा इतिहास मुस्लीम लीगसोबत देखील आहे तो आपल्याला माहिती असायला हवा.

मुस्लीम लीग-शिवसेना युती

1972-73 साली शिवसेनेनं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सोबत मुंबई महापालिका निवडणूक लढवली. मात्र, महापौर करण्यास शिवसेनेला काही जागा कमी पडत होत्या. त्यावेळी शिवसेनेनं मुस्लीम लीगचा पाठिंबा घेतला आणि शिवसेना नेते सुधीर जोशी हे मुंबईचे महापौर झाले. या दोन्ही पक्षांची जवळकी अगदीच अल्पायुषी ठरली. मात्र, शिवसेनेच्या इतिहासातील महत्वाची घडामोडी म्हणूनच या युतीकडे पाहिलं गेलं. कारण पुढे नव्वदच्या दशकात जेव्हा शिवसेनेनं हिंदुत्वाचं राजकारण करण्यास सुरुवात केली आणि तेंव्हा पासून मुस्लिम संघटना सोबत शिवसेनेचा छत्तीसचा आकडा आहे म्हंटल तर चुकीचं होणार नाही.

मुंबईच्या ‘मस्तान तलाव’ मैदानात शिवसेना सेना-मुस्लीम लीगची सभा झाली होती.

शिवसेना-मुस्लिम लीग युतीची एक सभा मुंबईच्या नागपाड्यातील मस्तान तलाव मैदानात झाली होती. हा सर्व परिसर भगव्या आणि हिरव्या झेंड्यांनी बहरला होता. नेबरहूड हॉलपासून मस्तान तलाव मैदानात व्यासपीठापर्यंत मुस्लीम तरुणांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वागत केलं होतं. ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘मुस्लीम लीग जिंदाबाद’, ‘बाळासाहेब जिंदाबाद’ अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमला होता. मस्तान तलाव पटांगणातील व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लीम लीगचे ‘गुलाम मेहमूद बनातवाला’ यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळासाहेब भाषणात म्हणाले होते, “यापुढे शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकसाथ लढा उभारतील. आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूने किंवा देवाणघेवाणीतून झालेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता कुठे निवडणूक नाही की काही नाही. ना आगे ना पिछे ! कोणाच्या मतांचा विचार करायचा तर तसंही नाही. आजच्या या जुलूसमध्ये मी सामील झालो. शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी सर्व जातीजमातीमधील बांधवांना आवाहन केलं होतं. धर्माच्या नावाखाली कोणीतरी भडकवतो. डोक्यात शांतता ठेवून आणि एक दिलाने काम कर. जातपात विसरून जा.”

आज ४० वर्षानंतर मात्र शिवसेना मुस्लिम पक्षा सोबत कसलाही संबंध दाखवायला नाकारतो. याच कारण पण तगड आहे कारण शिवसेनेने १९९० पासून हिंद्त्वाची भूमिका घेतली आणि आता तर भाजपाला रोखायचा असेल तर हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही. भाजप मात्र शिवसेनेला एमआयएमच्या ऑफर वरून घेरत आहे. पण आणखी तरी भाजपने शिवसेनेनं मुस्लिम लीग सोबत युती केली होती याची आठवण करून दिली नाही. मुस्लिम लीग बरोबरच्या युतीची भाजप शिवसेनेला आठवण करून देईल कि नाही माहित नाही पण मात्र शिवसेनेला त्यांचा इतिहास बदलता येणार नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.