सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

स्वतःचे दोन मंत्री जेल मध्ये जाऊन पण हालचाल न करणारे पवार राऊतसाठी मोदींना का भेटले ?

काल म्हणजे ५ एप्रिलला ईडीने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली. दादरचा एक फ्लॅट आणि कोकणातल्या आठ ठिकाणच्या १ हजार ३४ कोटीची संपत्ती जप्त केली. ईडीने कारवाही केल्यावर संजय राऊत आणि शिवसेनेने त्यावर प्रतिक्रिया देऊन निषेध केला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी देखील ईडीवर टीका केली.
आज महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार पंतप्रधान मोदींना संजय राऊत यांच्या साठी भेटले. भेट झाल्यावर प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्वतः पवारांनी याची माहिती दिली. मोदींनी देखील राऊत यांच्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचे वचन दिले आहे. स्वतःच्या पक्षाचे दोन मंत्री जेल मध्ये गेले तरी शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटले नाहीत. शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या साठी मात्र दुसऱ्याच दिवशी ते थेट पंतप्रधान मोदींना भेटले. पवार मोदींच्या भेटीच्या बातम्या आल्यावर सोशल मीडिया वर चर्चाना उधाण आले आहे. शरद पवार संजय राऊत यांच्यासाठी एवढी मेहनत का घेत आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे.

संजय राऊत गेले कि शिवसेना आऊट होऊ शकते

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांचा वाटा मोठा आहे. पुढे येऊन संजय राऊत मागचे तीन वर्ष भाजपशी मुकाबला करतं आहेत. महाविकास आघाडी सरकारचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत काम करत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षामध्ये समन्वय ठेवण्याचे काम संजय राऊत करतात. स्वतः शरद पवार यांचा सोबत संजय राऊत यांचे खूप जिव्हळ्याचे संबंध आहेत. महाविकास आघाडी सरकार कायम ठेवण्यासाठी संजय राऊत खूप महत्वाचे आहेत.
संजय राऊत याना टार्गेट करून भाजप महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. संजय राऊत जर हताश झाले, ईडीच्या धाडीना घाबरले तर महाविकास आघाडी सरकार पडू शकतं असं महाराष्ट्राच्या राजकारणावर लिहणारे जाणकार म्हणतात.
संजय राऊत यांचं महत्व शरद पवार चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळेच शरद पवार मोदींना भेटल्याचं सांगितलं जातं आहे.

नवाब मलिक, अनिल देशमुखच्या साठी पवारांनी हालचाल का नाही केली ?

अनिल देशमुखानाच्या रूपाने महाविकास आघाडीवर पहिल्यांदा झुकण्याची गरज पडली. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखानावर १०० कोटी खंडणी मागितल्याचा आरोप केला. स्वतः पोलीस आयुक्तच आरोप करतो आहे म्हंटल्यावर सरकारला देशमुखानाचा राजीनामा घ्यावा लागला. राजीनामा घेताना शरद पवार म्हणाले होते कि “आम्ही सर्व प्रकरणाची चौकशी करू . देशमुख जर दोषी आढळले तर त्यांना आम्ही माफ करणार नाही अस शरद पवार बोलले होते. अनिल देशमुखांना सोडवण्यासाठी शरद पवारांनी फार प्रयत्न केल्याचं जाणवल नाही.

अंडरवर्ल्डचा दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपाखाली मंत्री नवाब मलिक याना देखील ईडीने अटक केली आहे. अटक केल्यापासून नवाब मलिक जेल मध्येच आहेत. नवाब मलिक यांच्या अटकेवर शरद पवार म्हंटले होते कि,” भाजप सूडाच्या भावनेने मालिकांसोबत वागत आहे. पण ह्या सर्व आरोपांमधून मलिक बाहेर येतील. नवाब मालिकानासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढू असं देखील पवार म्हणाले होते. नवाब नमालिकांसाठी शरद पवारांनी सहानभूती दाखवली होती पण त्यांना देखील सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं दिसलं नाही.”

नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना जेल मध्ये जाऊन पण पवार शांत होते पण संजय राऊत यांच्यासाठी ते खटपट करत आहेत. ह्या सर्व गोष्टींवरून एक गोष्ट आपल्याला समजते कि महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राऊत खूप महत्वाचे नेते आहेत. त्यांना अटक होऊ नये म्हणून खुद्द शरद पवार उतरले असल्याने हे सिद्ध झाले आहे.


कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.