सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा

johny-lever-duplicate-in-johny-nirmal

नायक चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता. आपल्या जनतेला पण तशी स्वप्न पडत असतात म्हणून चित्रपट तुफान चालला. मुख्यमंत्री म्हणून अनिल कपूरने चांगली छाप सोडली होती. चित्रपटात अनिल कपूरचा मित्र जॉनी लिवर होता. नेहमीप्रमाणे त्याने लोकांना मस्त हसवलं होतं. अनिल कपूर मुख्य भूमिकेत असल्याने जॉनी लिवर चर्चेचा विषय नव्हता. पण नेहमीप्रमाणे जॉनी लिवर कडून जी अपेक्षा असते ती त्याने पूर्ण केली होती. अधून मधून आठवलं कि आजही युट्यूबवर नायक चित्रपटातली जॉनी लिवरचे कॉमेडी सीन बघत असतो. जॉनी लिवरला कोणी कॉपी करू शकत नाही हे त्याचा कोणताही पिक्चर बघितलं कि आजही वाटतं. पण जेव्हा कळलं नायक चित्रपटात जॉनी लिवर नाही तर त्याचा त्याच्यासारखा दिसणारा डुप्लिकेट जॉनी निर्मल आहे, हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. मोठं मोठ्या हिरोचे डुप्लिकेट असतात ते पण ऍक्शन सीनसाठी पण पूर्ण हिरोच डुप्लिकेट आहे आणि चित्रपट बघताना हे अजिबात लक्षात आलं नाही. मग म्हणलं जॉनी लिवर सारखा हुबेहूब दिसणारा हा जॉनी निर्मल नेमका कोण आहे हे डीप बघावं लागेल.

जगात एक माणसासारखे दिसणारे सात जण असतात. त्यामुळे प्रत्येकाचा डुप्लिकेट कुठे ना कुठे सापडेल. जॉनी लिवरचा डुप्लिकेट असला तर एवढं विशेष काय त्यात. पण जॉनी निर्मल हा जॉनी लिवर सारखा फक्त दिसत नव्हता तर तो हुबेहूब जॉनी लिवर सारखा अभिनय पण करायचा. अभिनयाची नक्कल करणारे लय आहेत पण हा गडी जॉनी लिवरला वेळ नसेल तेव्हा चित्रपटाचं उरलेलं शूटिंग पूर्ण करायचा. नव्वदच्या दशकात जॉनी लिवरला चांगली मागणी होती त्यामुळे त्याला प्रत्येक चित्रपटाला वेळ देणे शक्य व्हायचं नाही. अशा वेळेस स्वतः जॉनी काही चित्रपटाच्या शूटिंगला त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मलला पाठवून द्यायचा. एकवेळ तर अशी आली ओरिजिनल पेक्षा डुप्लिकेट जॉनी लिवरला जास्त महत्व मिळायला लागलं. मग काय कधी ना कधी हा विषय जॉनी लिवरला पचणारा नव्हता.

जॉनी निर्मल म्हणतो, ‘मी आज जो काही आहे तो फक्त आणि फक्त जॉनी लिवरमुळे आहे. त्याची डुप्लिकेट म्हणून जॉनी भाईनेच माझे नाव ‘जॉनी निर्मल’ ठेवले. जॉनी भाईनेच मला इंडस्ट्रीत प्रमोट केले, पुढे नेले. त्याच्यामुळे मला बॉलिवूडमध्ये काम मिळू लागले. त्याने मला त्याच्या धाकट्या भावासारखे वागवले. मी जॉनी भाईच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या अनुपस्थितीत जॉनी लिवरची भूमिका केली आहे.

जॉनी लिवरच्या आईला पण जॉनी निर्मल ओळखू आला नाही

जॉनी लिवर जॉनी निर्मलला बराच काळ आपला धाकटा भाऊ मानत होता. एके दिवशी जॉनी निर्मल काही कामानिमित्त जॉनी लिवरच्या घरी गेला असता जॉनी लिवरच्या आईने दरवाजा उघडला. तिने जॉनी निर्मलला आपला मुलगा समजून म्हटले, ‘तू पांढरा शर्ट घालून गेला होतास, हा लाल शर्ट कुठून घातलास’. असं म्हणतं तिने जॉनी निर्मलला खायला दिले. यांनतर जॉनी निर्मलने सांगितले की तो त्यांचा मुलगा जॉनी नसून त्याच्या सारखा दिसणारा जॉनी निर्मल आहे. जॉनी निर्मलने आपल्या मित्रांमध्ये कौतुकाने ही गोष्ट सांगितली होती, पण नंतर ही बातमी मीडियापर्यंत पोहोचली. या बातमीचे सत्य जाणून न घेता मीडियाने जॉनी लिवरच्या घडलेल्या घटनेत आई ऐवजी जॉनी लिवरच्या पत्नीचे नाव जोडले. इथूनच जॉनी लिवर आणि जॉनी निर्मल यांच्या नात्यात दुरावा आला.

अजून एका घटनेने जॉन लिवर आणि जॉनी निर्मल यांच्या नात्यात दुरावा आला. १९९९ ला मिथुन चक्रवर्तीच्या हिरालाल पन्नालाल या चित्रपटात जॉनी लिवरची मुख्य भूमिका होती. पण जॉनी लिवरला वेळ नसल्याने दिग्दर्शकाला शूटिंग साठी जॉनीच्या तारखा मिळत नव्हत्या. शेवटी वेळ न घालवता दिग्दर्शकाने जॉनी निर्मलाला संपर्क करून हिरालाल पन्नालालच शूटिंग पूर्ण केलं. इथं जॉनी निर्मलची एक गोष्ट चुकली कि त्याने जॉनी लिवरला कळवलं नाही. मग जॉनी लिवरला राग आला. रागात तो जॉनी निर्मलला बोलला, ‘असं करून तू माझं काम हिसकावून घेतोय हे बरोबर नाही.’

यांनतर एका शूटिंग दरम्यान अक्षय कुमार जॉनी निर्मलला बघून बोलला, ‘अरे तू तर जॉनी लिवरचा लहान भाऊ दिसतोस. त्यावर निर्मल म्हणाला हो जॉनी लिवर मला लहान भाऊच मानतात. यानंतर जॉनी निर्मल बद्दल अशी अफवा आली कि जॉनी लिवरचा लहान भाऊ असल्याचं सांगून जॉनी निर्मल काम मागतोय. हे ऐकून जॉनी निर्मलाला वाईट वाटले. त्याच दरम्यान जॉनी लिवरने जॉनी निर्मलला सल्ला दिला कि दुसऱ्याची नक्कल करून किती दिवस काम करणार काहीतरी स्वतःच अस्तित्व तयार कर. यांनतर त्याने जॉनी निर्मल हे नाव सांगणं बंद केलं आणि स्वतःच खरं नाव निर्मल गुनेरिया हे नाव धारण केलं. या नावाने तो काम मागू लागला पण त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. आणि पुढच्या काळात निर्मल गुनेरिया हे नाव कुठं गायब झालं काय माहित ?

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.