सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

यावर्षीच्या उष्णता वाढीचा आर्थिक फटका सगळ्यात जास्त शेतकऱ्याला बसला

economic-impacts-of-heat-wave-in-india

मार्च २०२२ हा भारतातील १२२ वर्षांतील सर्वात उष्ण मार्च होता ! आणि त्यानंतर पुढचा महिना एप्रिल आला, १९०१ नंतरचा तिसरा सर्वात उष्ण हा एप्रिल महिना ठरला. भारतात उष्णतेची लाट आता नाकारण्यात अर्थ नाही नाही. भारत प्रचंड प्रमाणात उष्णतेची लाट अनुभवत आहे आणि यामुळे एका मोठ्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. उष्माघाताची नेमकी व्याख्या कशी करायची? इथून सुरुवात करू.

भारतीय हवामान विभागातील (IMD) हवामान तज्ञांकडे एक नजर टाकू. गुणात्मकदृष्ट्या उष्णतेच्या लाटेची व्याख्या ही हवेच्या तापमानाच्या स्थितीवरून ठरवली जाते जे तापमान मानवी जीवनास घातक असते . एखाद्या प्रदेशातीळ सामान्य तापमानाच्या आधारावर उष्णतेची लाट आहे कि नाही हे ठरवलं जातं. उदाहरणार्थ तुम्ही मैदानी प्रदेशात राहात असाल आणि उष्णतेची लाट कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचली असेल तर उष्णतेची लाट आली, असं समजलं जातं. शिवाय सामान्य तापमान जे असते त्यापेक्षा ६.४ अंश सेल्सिअस ने तापमान वाढले असेल तर समजून घ्या तुम्ही उष्णतेची लाट अनुभवत आहात.

यंदा उष्णतेची लाट तीव्र आहे, यात शंका नाही. पण ती अपेक्षेपेक्षा लवकर आली आहे. ११ मार्चला पहिल्यांदा उष्णतेची लाट घोषित केली. एका अभ्यासात असे दिसून आले आहे कि या उष्णतेच्या लाटा पूर्वीपेक्षा जास्त दिवस टिकताना दिसत आहेत. १९८१ ते १९९० दरम्यान उष्णतेची लाट ४१३ दिवस होती, २००१-२०१० दरम्यान ५७५ दिवस आणि २०११-२०२० दरम्यान ६०० दिवसांवर उष्णतेची लाट गेली. यावरून काय तो अंदाज घ्या.

ग्लोबल वॉर्मिंगला दोष दिल्याशिवाय पर्याय नाही. औद्योगिक काळापासून पृथ्वीचे तापमान १.२ अंशांनी वाढले आहे. भारताचे उत्सर्जन एका विशिष्ट थ्रेशोल्डच्या खाली राहिले असले तरी भारत आज जगातील तिसरा सर्वात मोठा कार्बन उत्सर्जित करणारा देश आहे. देश दरवर्षी सुमारे २.४६ अब्ज मेट्रिक टन कार्बन प्रदूषक उत्सर्जित करतो. जे एकूण जागतिक उत्सर्जनाच्या अंदाजे ६.८% आहे. आणि जर असंच चालू राहीलं तर भारतातील उष्णतेच्या लाटा जास्त काळ टिकण्याची शक्यता आहे.

AC खोल्यांमध्ये बसून या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं सोपी गोष्ट आहे. एसीत बसून गप्पा मारल्या तर उन्हापासून वाचतोय पण वाढलेल्या उष्णतेच्या लाटेपासून बसलेला आर्थिक फटका कोणालाच सोडणार नाही. कारण गोष्ट अशी आहे की उष्णतेची लाट तुमच्यापर्यंत नाही पोहोचली तरी आर्थिक परिणाम पोहचतो.

पहिला आर्थिक फटका म्हणजे वीज समस्या ! उन्हाळा आला कि विजेची मागणी वाढते. त्यात कोळशाची कमतरता असली तर वारंवार वीज कपात होते. ज्यामुळे औद्योगिक उत्पादनावर परिणाम व्हायला लागतो. फक्त मोठे उद्योगच नाहीत तर लहान उद्योग देखील विजे अभावी उत्पादन थांबवतात. अनेक शेतकरी शेतीची कामे पुढे ढकलतात. हे नुकसान किती होतं याची सरकार दरबारी तरी काही नोंद नाही.

दुसरा थेट आर्थिक परिणाम कामगारांवर होतो. उष्णतेच्या लाटेचा परिणाम अशा लोकांवर होतो जे दररोज उन्हात काम करतात. बांधकाम कामगार आणि शेतमजूर जेव्हा त्यांची उत्पादकता कमी होते तेव्हा संपूर्ण देश मंदावतो. हा आर्थिक प्रभाव तुमच्यापर्यंत देखील पोहचतो. बरं उन्हात काम करणाऱ्या कामगारांची संख्या ही लहान नाही. एका अंदाजानुसार ही संख्या एकूण कामगार संख्येच्या ४९ % इतकी जास्त असू शकते किंवा सुमारे २३१ दशलक्ष हे लोक आहेत. उष्णतेच्या लाटा कायम राहिल्यास २०३० पर्यंत आपण एकूण कामाच्या तासांपैकी ५.८ % कामाचे तास गमावू शकतो. एवढ्या कामाचं नुकसान म्हणजे ३४ लाख कामगारांचं आयुष्य धोक्यात आहे असं समजा.

काही झालं तरी पाहिलं नुकसान शेतकऱ्याचं

युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून गहू या कमोडिटीचा पुरवठा कमी आहे. पुरवठा कमी होत असताना आशा होती की भारत त्यात उडी घेईल आणि कमतरता भरून काढेल. पण आता हे होईल असं वाटत नाही. उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश यांसारख्या गहू उत्पादक राज्यांमध्ये तापमानात अचानक वाढ झाल्याने गव्हाच्या काढणीवर गंभीर परिणाम झाला आहे. भारत सरकारने या वर्षी गव्हाचे उत्पादन १२२ दशलक्ष टनांपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु आता काही अंदाजानुसार या पिकांपैकी जवळपास १५% पीक असाह्य उष्णतेमुळे सुकून गेले आहे. त्यातच काही अहवाल सूचित करतात की भारत या मुख्य वस्तूच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.

हा परिणाम फक्त गव्हावर नाही तर जिरे देखील याच मार्गावर आहे. CRISIL च्या अहवालात असे दिसून आले आहे की जिऱ्याचे उत्पादन घटले आहे- राजस्थानमध्ये सुमारे २०% आणि गुजरातमध्ये १५% जिऱ्याचे नुकसान झाले आहे. IMD च्या म्हणण्यानुसार भारतात गेल्या ५० वर्षांत तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १७००० हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाला आहे. आणि इंडियास्पेंडच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की २०१० ते २०१८ दरम्यान सुमारे ६१६७ लोकांनी आपला जीव गमावला आहे.

हे सोडून अजून काही नुकसान झालं असेल तर नक्की तुमचं मत नोंदवा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.