सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पहिल्या भारतीय संसद भवनाचा इतिहास – History of first The Parliament House of India

history-of-first-the-parliament-house-of-india-in-marathi

पहिल्या भारतीय संसद भावनांचा इतिहास

The Parliament House म्हणजेच भारतीय संसद भवन हे स्तिथ आहे भारताची राजधानी नवी दिल्ली येथे. यामध्ये मुख्यतः दोन सभागृह आहेत ज्यांना आपण खालचं सभागृह म्हणजेच लोकसभा आणि वरचे सभागृह म्हणजेच राज्यसभा असे संबोधतो.

संसद भवनाचा इतिहास – History of first The Parliament House

या इमारतीचा आराखडा ब्रिटिश वास्तुविशारद (Architect) एडविन लुटयेन्स (Edwin Lutyens) आणि हर्बर्ट बेकर (Herbert Baker) यांनी १९१२-१९१३ मध्ये ज्यावेळी भारतासाठी एक नवीन प्रशासकीय राजधानी शहर बांधण्याच्या नियोजनाचा भाग तयार केला होता.

या इमारतीची परिणीती गोलाकार असून बाहेरील बाजूस १४४ स्तंभ आहेत जे आपल्याला सहज पाहायला मिळतात.

इमारतीच्या मध्यभागी वर्तुळाकार मुख्य चेंबर (central chamber) आहे या चेंबरच्या आजूबाजूला तीन वर्तुळाकार सभागृह आहेत, त्यामधील जे चेंबर ऑफ प्रिंसेस आहे ते आता लायब्ररी हॉल म्हणून वापरले जाते, स्टेट कॉउंसिल (State council) हे राज्यसभेच्या सत्रासाठी बांधण्यात आले आहे, तसेच केंद्रीय विधानसभा ( Central Legislative Assembly ) आता लोकसभा सत्रासाठी वापण्यात येते.

फेब्रुवारी १९२१ मध्ये एचआरएच प्रिन्स (HRH Prince) आर्थर, ड्यूक ऑफ कॅनॉट आणि स्ट्रेथर्न (Prince Arthur, Duke of Connaught and Strathearn) यांनी पायाभरणी केली, इमारत पूर्ण होण्यासाठी ५ वर्षे लागली.

१८ जानेवारी १९२७ रोजी सर भूपेंद्र नाथ मित्रा (Sir Bhupendra Nath Mitra), गव्हर्नर-जनरलची कार्यकारी परिषद सदस्य (Member of the Governor-General’s Executive Council), उद्योग आणि कामगार विभागाचे प्रभारी (in charge of the Department of Industries and Labour) भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन (Lord Irwin, then Viceroy of India) यांना इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. त्यावेळी १९ जानेवारी १९२७ केंद्रीय विधानसभेचे तिसरे अधिवेशन या सभागृहात पार पडले.

नंतरच्या काळात जागेच्या अधिक मानगीमुळे १९५६ साली दोन माजले अजून वाढवण्यात आले म्हणून त्यानंतर सदस्य आसन मर्यादा (Seating Capacity) ७९० झाली. 2006 मध्ये उघडलेले संसद संग्रहालय (The Parliament Museum), संसदीय ग्रंथालयाच्या इमारतीत संसद भवनाशेजारी उभे आहे.

क्रांतिकारी घटनांची साक्ष :

१. याच संसद भवनाच्या मध्यवर्ती संमेलनामध्ये शहिद सरदार भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी कमी तीव्रतेचे बॉम्ब अभ्यागतांची गॅलरी (visitors’ gallary) मधून फेकले आणि साम्राज्यवाद, सामंतवाद विरोधी तसेच इन्कलाब सारख्या घोषणा देत पत्रके भिरकावली आणि श्रमिक , कामगार यांना एकत्र होऊन सरकार विरुद्ध लढा असे आवाहन केले, यानंतर इथेच त्यांना अटक करण्यात अली.

२. याच संसदेत स्वातंत्र्य काळात भारतासाठी भारताचा कायदा मसुदा म्हणजेच संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले आणि २६ जानेवारी १९५० पासून लागू केले.

आतंकवादी हल्ला ( terrorist attack on Indian Parliament):

१३ डिसेंबर २००१ रोजी दोन दहशदवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांनी मिळून भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ला केला, यामध्ये संसदेबाहेर ५ दहशदवादी मारले गेले आणि ९ निष्पाप लोक शाहिद झाले.

आता नवीन इमारतीनंतर जुन्या संसद इमारतीचं काय होणार ?

२८ मे २०२३ रोजी नवीन संसद इमारतीचे उदघाटन झाल्यानंतर पहिल्या संसद इमारतीचे लोकशाही संग्रहालय म्हणजेच Museum of Democracy असे रूपांतर होणार आहे.

नवीन संसद इमारतीमध्ये काय वेगळं आहे ?

  • त्रिकोणी आकाराची भव्य इमारत उभारण्यात अली आहे.
  • बांधकामाचा संपूर्ण क्षेत्र हे ६५००० स्क्वे. मी. एवढे आहे
  • सभागृहाचा आकार पहिल्यापेक्षा मोठा बनवला आहे
  • ८८८ लोकसभा आणि ३८४ राज्यसभा सदस्यांची बैठक मर्यादा आहे
  • लोकसभा बैठक मर्यादा हि १२७२ पर्यंत वाढवता येऊ शकते
  • अंतर्गत कार्यालये आणि दलाने यांची क्षेत्रफळ वाढवण्यात आलेली आहेत.
  • भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कलाकृतीचा प्रभाव आत्मसात करण्यात आला आहे

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.