नोव्हेंबर 13, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

बळीराजा आणि त्याचा इतिहास थोडक्यात

Baliraja-Information-In-Marathi

Baliraja Information In Marathi

दिवाळीच्या सणातील बलिप्रतिपदा म्हणजेच बळीचा पडावा म्हटलं कि आपल्याला बळी राजा आठवतो तो फक्त त्याच दिवस पुरता. आपल्याला बळीराजा जो काहीप्रमाणात माहित आहे ते पौराणिक कथांमधून आणि आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून मौखिक रूपात मिळालेल्या संस्कारातून.

त्याच बळीराजा बद्दल आपण आज थोडी अधिक माहिती इथे उपलब्ध करून देत आहोत. जी ऐतिहासिक दृष्टीकोनातून आपल्या ज्ञानात भर टाकेल अशी अशा करूयात.

संस्कृत भाषेतील पुराणे, वेड, उपनिषदे आणि समकालीन साधनांच्या अभ्यासकांच्या मते बळीराजा कालखंड हा साधारणतः साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वी चा कालखंड असावा.

बळीराजा हा हिरण्यकशिपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचन राजाचा पुत्र, कपिल राजाचा पुतण्या आणि बाण राजाचा वडील होता. वरील हे सगळे राजे काही प्रमाणात आपल्याला माहित असतील हि कारण या सर्वांचा उल्लेख आपण नेहमी राक्षस वंशामध्ये ऐकत आलेलो आहोत आणि ते कसे वाईट होते आणि त्यांनी कसा ब्रह्मन् सामाज्यावरती अन्याय केला, त्यांच्या यज्ञामध्ये व्यत्यय आणून त्यांच्या व्रतांचा तापस्यांचा भंग केला याच कारणांसाठी, बरोबर ना ?

पण या पडद्यावरी दिसणाऱ्या गोष्टींमागे एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे इतद्देशीय भूमिपुत्रांच्या इतिहासाची जी पुराणे आणि तत्सम संस्कृत ग्रंथांमध्ये थोडेबहुत पुरावे सोडत गेलेला आहे आणि अभ्यासकांनी शोधून शोधून एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.

बळीराजा एक असा महान सम्राट, प्रशासक, न्याय, समता, समानतावादी व्यवस्थेचा अधिपती, कि ज्याच्या बद्दल शत्रूगोटात आणि त्यांच्या कित्येक पिढ्यांमध्ये तिरस्कार असूनही त्यांना बळीराजाबद्दल थेट अपशब्द वापरता आला नाही. किंबहुना काही ठिकाणी त्याचा उल्लेख राक्षस गणातील उदार, दानशूर राजा म्हणून आढळतो आणि त्याचच उदाहरण म्हणजे वामनाला दिलेला शब्द

बळीराजा याचा कालखंड जर आपण पाहिलात तर आपल्याला कळते कि बळीराजा हा प्रगत अश्या सिंधू संस्कृतीचा एक वाहक किव्वा आपण त्याला त्याचाच एक भाग म्हणू शकतो. हि अशी संस्कृती कि सर्वच समकालीन क्षेत्रात निपुण होती त्याचा सर्वोच्च टॅप म्हणजे कृषी क्षेत्र, अतिशय प्रगत म्हणजे काही संस्कृत ग्रंथामध्ये, राक्षस म्हणजेच बळीराजा आणि त्याचा वंश यांच्याबद्दल असा शब्दप्रयोग पाहायला मिळतो कि त्यांना पाणी अडवण्याचे ज्ञान होते ज्याचा वापर धान्य पिकवण्यासाठी ते करायचे म्हणजेच आपण आज धरणे, बंधारे बांधतो जलसिंचनासाठी याचा ज्ञान त्यांना त्यावेळी होत.

बळीराजा आणि त्याच राज्य साधारणतः दक्षिण भारताच्या भागात असल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात ते म्हणजे काही प्रमाणात संस्कृत पुस्तकांतून आणि स्थानिक लोकांच्या पारंपरिक संस्कृतीतून. आर्य लोकांच्या आक्रमणानंतर बळीराज्याच्या पुर्वाज्यान्नी सिंधू प्रदेशातून भारताच्या इतर प्रदेशात त्यांचं स्थलांतर झालं आणि दक्षिण व मध्य भारतामध्ये त्यांनी आपली राज्य प्रस्थापित केली.

बळीराजाच्या राज्यातील एक कायदा आपल्याला सापडतो जो म्हणजे शेती उत्पन्नाचे समविभाजन. शेतीचा मालक आणि शेतीत राबणारा प्रत्येक कष्टकरी अगदी तो कामगार असेल किव्वा वाटेकरी असेल तरी सर्वांना शेती उत्पन्नातील सामान विभाजन केलं जायचं. म्हणूनच बळीराजाचा उल्लेख आपल्याला समविभागी म्हणून देखील काही ठिकाणी मिळतो.

बळीराजाचं राज्य हे नऊ खंड (९ भाग ) यामध्ये विभागलेले होते त्यासाठी एक अधिकारी नियुक्त असायचा कि जो पूर्ण एका खंडाचा कारभार सांभाळायचा. तसेच महसूल पद्धतीसाठी प्रत्येक खंडामध्ये उपविभाग केलेले होते त्यांना सुभे म्हणायचे आणि काही सुभ्याचा ग्रुप करून त्याला महासुभा असे म्हणायचे त्यासाठी देखील एक अधिकारी होता कि जो महासुभा सांभाळून त्याचा सर्व कारभार पाहत असे.

यांच्या अधिकाऱ्यांची नाव जर आज आपण पहिली तर कंदाची आपल्याला आश्चर्य वाटेल ते म्हणजे, जो अधिकारी एका खंडाची जबाबदारी सांभाळायचा त्याला आज आपण खंडोबा म्हणतो, जो महासुभा सांभाळायचा त्याला आपण म्हसोबा म्हणतो. या खेरीज बळीराजाचे इतर अधिकारी देखील एलीया आसपास आहेत ते म्हणजे जोतिबा, भैरोबा ज्यांची ओळख आपल्याला वैदिक पुराणांमध्ये काही वेगळीच पाहायला मिळते म्हणून कदाचित आपण या सर्वांकडे हे सर्व आपल्या भूमीतील जन्माला येऊन गेलेले आपलेच पूर्वज ज्यांनी इतकं लोककल्याणकारी काम केलं कि लिकांनी त्यांना देव मानलं हे विसरतो.

मग विचार करा कि एक असा राजा कि ज्याच्या अधिकाऱ्यांना लोक देव म्हणून पूजत असतील तर तो स्वतः कसा असेल त्याची प्रशासन, न्याय, समानता याबद्दलची व्यवस्था कशी असेल. हि विचार करायला भाग पडणारी गोष्ट नक्कीच आहे.

म्हणूनच आजहि कुणब्याच्या (शेतकऱ्याच्या) कुळातील आयाबाया आपल्या नवऱ्याला याच दिवशी ओवाळतात आणि “इडा पीडा टाळू दे बळी च राज्य येऊ दे” म्हणत बळीराजाचं राज्य परत मागतात.

राजधानी : असे सांगण्यात येते कि आज जे महाबलीपूरम शहर आहे तेच शहर बळीराजा ची राजधानी होती.

वामन कथा: बळी राजाच राज्य आर्य लोकांना जिंकता येत नव्हते म्हणून वामनाने कपटाने बळी राजाचा खून केला असे अभ्यासक नोंदवतात. तसेच कृष्ण लोकप्रिय असल्याकारणाने वामनाला कृष्णाशी जोडून श्रेष्ठ ठणवण्याचा प्रयत्न केला गेला. एक शेतकऱ्यांचा न्यायप्रिय राजा त्याचे राज्य आर्य लोकांनी कपात करून बळकावले हेच वामनाच्या इच्छेतून दिसते असेच मध्ये आभासकांचे आहे.

प्रा. पी. गुरुराज भत्ता यांनी एकाठिकाणी कर्नाटकातील तुळूनाडू ठिकाणचा एक संदर्भ नोंदवला आहे तो असा कि, तुळू भाषेमध्ये बाली हा शब्द वंश याच्याशी संबंधित आहे आणि तिथल्या ब्राह्मण वगळता सर्व समाज कोणत्या ना कोणत्या बळी शी संबंधित आहे.

स्वतः तुकाराम महाराज त्यासाठी विष्णू म्हणजेच श्रीहरीला बोल लावतात कि

हरी तू निष्ठुर निर्गुण |
नाही माया बहू कठीण |
नव्हे ते करिसी आन |
कवणें नाही केले ते || १ ||

बळी सर्वस्वे उदार |
जेणे उभारीला कर |
करुनि काहार |
तो पाताळी घातला || ६ ||

ज्योतिराव फुले त्यांच्या एका पोवाड्याध्ये म्हणतात कि बळी हाच आपला कुलस्वामी आहे म्हणजे आपण सर्व त्याचेच लेकरु आहोत त्याचा मानसन्मान कारण आपलं कर्तव्य आहे.

आपल्या पुर्वाज्यांबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असायला हवं आणि त्यांच्या बद्दल अपानजनक किव्वा अपप्रचाराला अधीन जाऊ नये. आपल्या पुर्वाज्यांबद्दलचा इतिहास शोधण्यासाठी आपल्याकडे फारशी साधने नाहीत पण वैदिक पुस्तकांमधूही आपण तो शोधावा याचसाठी हा खटाटोप.

बळीराजा आणि त्याचा वंश या संदर्भातील विस्तृत माहिती डॉ. अ ह साळुंखे यांनी त्यांच्या बळीवंश या पुस्तकातून आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.