सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मोबाईल प्रेमींसाठी काही चांगल्या तर काही वाईट बातम्या

१) वन प्लस कडून एक चांगली व एक वाईट बातमी.

चांगली बातमी अशी कि वन प्लस कडून क्लिप्ट नावाचं ॲप लॉन्च करण्यात आलं आहे. हे अँप तुम्हाला प्ले स्टोर मध्ये सापडेल. हे ॲप टॅबलेट मध्ये आणि लॅपटॉप मध्ये सुद्धा वापरू शकता. या सगळ्या डिवाइस मधून दुसऱ्या डिवाइस मध्ये फार आरामाने फाईल ट्रान्स्फर, मेसेज ट्रान्सफर किंवा फोटो ट्रान्सफर करू शकता. हे ॲप अशा लोकांसाठी फार महत्त्वाचे आहे जे लोक लॅपटॉप ,मोबाईल असे दोन किंवा अधिक डिवाइस वापरतात आणि त्यांना त्या डिवाइस मध्ये काही गोष्टी मोबाईल मधून लॅपटॉप मध्ये किंवा लॅपटॉप मधून मोबाईलमध्ये घेताना अडचण येते.
वाईट बातमी अशी की वन प्लस नाईन सिरीज जी हल्लीच भारतामध्ये लॉन्च झाली आहे, त्यामध्ये ५ जीचे दोन बँड दिले गेले होते आणि असं सांगण्यात आलं होतं की भविष्यात अपडेट द्वारे याचे बँड वाढवले जातील. मात्र आता कंपनीकडून अशी माहिती मिळत आहे की यामध्ये हे अपडेट येणार नाही. ज्यांनी या मोबाईलसाठी इतके जास्त पैसे मोजले आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच वाईट बातमी आहे.

२) मोबाईलच्या चाहत्यांसाठी मे महिना ठरणार निराशाजनक

मे महिन्यामध्ये बरेचसे मोबाईल लॉन्च होणार होते आणि प्रत्येक कंपनीचा महत्त्वकांक्षी मोबाईल मे महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार होता, मात्र आता अशी बातमी मिळते की आसुसची जी नवीन सिरीज आयजी भारताबाहेर उद्या लॉन्च होणार आहे ती भारतामध्ये नाही येणार. सोबतच रियल मी एक्स सेवन मॅक्स हा मोबाईलही मेमध्ये लॉन्च होणार होता मात्र त्याचेही आता काही खरे दिसत नाही. तसेच पोको आणि विवो कडून सुद्धा मोबाईल लॉन्च करण्यात येणार नाही. नक्कीच मोबाईल चाहत्यांसाठी मे महिना निराशजनक असणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे निर्णय कंपनीने घेतले आहेत, असं सांगण्यात येत आहे.

३) शाओमी कंपनीचा नवीन कॅमेरा टेक्नॉलॉजी करणार धमाल.

शाओमी कंपनीने एका तुफान अशा कॅमेरा टेक्नॉलॉजी साठी पेटंट मिळवले आहे. तुम्ही लोकांनी अंडर डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजी साठी पेटंट यादी ऐकले असणार ज्यामध्ये तुमचा फ्रंट कॅमेरा हा मोबाईलचा डिस्प्लेच्या आत असणार पण तो वरून दिसणार नाही मात्र डिस्प्लेच्या आतून तो फोटो घेणार. नुकतेच शाओमीने फ्लीप अंडर डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजी साठी पेटंट रजिस्टर केल आहे यामध्ये तुमचे सर्व मोबाईलचे कॅमेरा हे तुम्ही सेल्फी कॅमेरा साठी सुद्धा तसेच बॅक कॅमेरा साठी सुद्धा वापरल्या जाणार,म्हणजे तुमचा कॅमेरा सेंसर मोबाईलच्या आतूनच फ्लीप होऊन तो फ्रंट कॅमेरा व तसेच बॅक कॅमेरा या दोन्हींचे काम करणार.

४) लावा झेड टू मॅक्स भारतीय बाजारात लॉन्च.

हा मोबाईल ७७९९ रूपांमध्ये मिळणार यामध्ये तुम्हाला सात इंची मोठी स्क्रिन मिळणार तसेच यामध्ये मीडिया टेक चे हॅलो जी ३५ हा प्रोसेसर दिलेला आहे. आणि या मध्ये २ जीबी रॅम व 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळणार आहे त्यामुळे ज्यांचे बजेट हे सात ते आठ हजाराचे असणार त्यांच्यासाठी हा मोबाईल एक चांगला पर्याय असणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.