सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पुणे शहरासाठी नवी नियमावली जाहीर काय सुरु, काय बंद ? (Pune lockdown guidelines today)

१ जूननंतर शासनाने निर्बंध शिथिल होण्याचे संकेत दिले होते. वीकेंड लॉकडाउन या आधीच थांबवला होता. १० टक्के पेक्षा जास्त रुग्ण दर असणाऱ्या ठिकाणी निर्बंध अधिक कडक असणार होते. पण जिथे यापेक्षा कमी रुग्ण संख्या आहे तिथे नियम शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार पुणे महानगरपालिकाने निर्बंध शिथिल केले आहेत. १ तारखेपासून खालील पद्धतीने नियम असतील.

आता दुकानांची वेळ ७ ते दुपारी २ असेल.

उद्यापासून (१ जून) सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी !
पुणे मनपा हद्दीतील सर्व दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु करण्यास परवानगी दिली असून शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. PMPML, हॉटेल्स, उद्याने, जिम आदी आस्थापना बंदच राहतील. महत्वाची गोष्ट म्हणजे अत्यावश्यक सेवांशिवाय इतर दुकाने सुद्धा चालूच राहतील.

कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.

पुणे महानगरपालिका क्षेत्रात ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.

महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक १४.०४.२०२१ च्या आदेशानुसार सुरु राहतील.

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस (Working days ) सुरु राहतील.
सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक/कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त ) २५% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. खासगी कार्यालये मात्र बंद राहणार ! पुणे मनपा हद्दीत नव्या आदेशानुसार खासगी कार्यालये पूर्णपणे बंद असणार आहेत.

पुणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज दुपारी ०३.०० नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण (valid reason) / अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध (संचारबंदी) राहील. तसेच घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी असेल

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.