सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पेटीएमचा IPO मार्केट गाजवणार ?

प्रतीक गांधीच्या SCAM १९९२ नंतर शेयर मार्केट, यांची काम करण्याची पद्धती, त्यातले धोके आणि एकूणच शेयर मार्केट या वेब सिरीज मुळे चर्चेत आले. एक वेळ होती जेव्हा फक्त ठराविक लोक शेयर मार्केट मध्ये काम करायचे, पण आत जवळपास संपूर्ण देशातील सर्वच छोट्या-मोठ्या शहरातील तरुण आणि तरुणी शेयर मार्केटकडे एक संधी म्हणून बघत आहेत. नवीन पिढी मध्ये शेयर मार्केट बद्दल एक उत्सुकता आहे. त्यामुळे शेयर मार्केटमध्ये होणारी प्रत्येक घटना मह्त्वाची होत आहे. आता डिजिटल पेमेंट्स करणारी पेटीएम हि कंपनी देखील शेयर मार्केट मध्ये त्यांचा IPO आणत आहे म्हणून सर्व प्रथम IPO ची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे ठरते.

काय असतो IPO ?

IPO चा अर्थ इनिशिअल पब्लिक ऑफेरींग असा होतो. शेयर मार्केट व्यवस्थापन सेबी(SEBI) ही संस्था बघते. शेयर मार्केट मध्ये वेगवेगळ्या कंपनी स्वतःला रजिस्टर करतात आणि त्यानंतर सेबी त्यांना शेयर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याची परवानगी देते. ट्रेडिंग करण्यासाठी कंपनी सेबी कडे परवानगी साठी अर्ज करतात, त्या नंतर जर त्या कंपनीने गरजेच्या अटी पूर्ण केल्यांनतर सेबी त्यांना सुरुवातीला IPO बाजारात आणण्याची परवानगी देते. सोप्य्या भाषेत IPO म्हणजे कंपनीला आपले शेयर विकण्याची परवानगी देणे होय. IPO यामध्ये सेबी कंपनीला त्यांच्या शेयरची विभागणी करायला सांगून विकायची परवानगी देते. त्यात संस्थात्त्मक (इन्स्टिट्यूशनल) ग्राहकांना ७५% भाग विकत घेता येतो आणि बाकीचा हा छोट्या ग्राहकांना विकत घेण्याची परवानगी सेबी देते.

झोमॅटोचा IPO ने मार्केट गाजवलं होतं.

ऑगस्ट २०२१ मध्ये हॉटेल्स मधून घरपोच जेवण देणारी झोमॅटो ह्या कंपनीने देखील तिचा IPO शेयर मार्केट मध्ये आणला होता.झोमॅटो ह्या कंपनीने IPO मधून जवळजवळ १० हजार करोड रुपयेच्या किमतीचे शेयर विकले,आणि भारतीय शेयर मार्केटला वेगळी झळाळी मिळाली. ह्या अगोदर कुठल्याही भारतीय कंपनीचे शेयर एवढ्या मोठ्या प्रमाणात विकले गेले नव्हते. भारतीय कंपनी पण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करत आहेत हा संदेश लोकांपर्यंत गेला. झोमॅटो मूळे IPO सामान्य ग्राहकांच्या चर्चेत आला.

पेटीएमचा IPO तशीच कमाल करणार ?

डिजिटल पेमेन्टस मध्ये काम करणारी पेटीएम हि कंपनी भारतीय मार्केटमध्ये आता प्रस्तापित झाली आहे. पेटीएमचे भारतात २० कोटी पेक्षा पण जास्त ग्राहक आहेत. त्यामुळे साहजिकच पेटीएमची कुठल्याही बातमीवर साऱ्यांचं लक्ष असत. पेटीएमचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा यांनी बातमी दिली कि पेटीएमला पण सेबीने शेयर मार्केट मध्ये त्यांचा IPO आणण्याची परवानगी दिली आहे. सेबीच्या सर्व अटी पेटीएम ने पूर्ण केल्या आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये मुंबई शेयर मार्केट(BSE) आणि राष्ट्रीय शेयर मार्केटमध्ये(NSE) ग्राहकांना विकत घेता येईल. ६५ % IPO हा संस्थात्मक ग्राहकांसाठी तर बाकीचा ३५% सामान्य ग्राहकांना घेता येईल. पेटीएम येणाऱ्या IPO मधून २० कोटी चे शेयर्स विकणार आहेत. शेयर्स मार्केट मध्ये काम करणाऱ्या ग्राहक आणि ट्रेडर यांना पेटीएम चे शेयर्स विकत घेण्याची संधी IPO मध्ये मिळणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.