दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या उत्परिवर्तनाला (MUTANT) WHO ने ‘ओमिक्रॉन’ असे नाव दिले आहे. WHO ने अशी माहिती दिली आहे की कोरोनाचा नवा उत्परिवर्तन (MUTANT)आढळला आहे. तो खूप मोठ्या गतीने पसरत असल्याने जगभरात वेगवेगळ्या अफवा पसरायला सुरुवात झाल्या. भारतामध्ये पण खूप अंदाज लावले जात आहेत. परत एकदा कोरोनाची नवी लाट येईल अशी भीती पसरली आहे. अश्या अफवा पसरत असताना WHO ने ह्या ओमिक्रॉन बद्दल नेमकं काय म्हणलंय हे समजून घेतलं पाहिजे.
ओमिक्रॉन बद्दल संशोधन कुठवर आलंय?.
आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन बद्दल आफ्रिकेतील आणि जगभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. ओमिक्रॉन बद्दल पूर्ण संशोधन होणे आणखी बाकी आहे. WHO ने आफ्रिकेतल्या आणि इतर वैज्ञानिकांना आव्हान केले आहे कि जर त्यांच्या कडे ओमिक्रॉन बद्दल माहिती असेल असेल तर WHO कडे दयावी.
ओमिक्रॉन कसा पसरतो?
आतापर्यंत ओमिक्रॉन नेमका कसा पसरत आहे याची पूर्ण माहिती वैज्ञानिकांना मिळाली नाही. कोरोनाच्या पूर्वीच्या उत्परिवर्तनापेक्षा ( MUTANT ) ओमिक्रॉन मोठ्या वेगाने पसरत असल्याचं प्रथम लक्षणी दिसत आहे. तोपर्यंत पूर्ण माहितीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
ओमिक्रॉनचा धोका किती आहे?
ओमिक्रॉनच्या संक्रमातून लोकांना दवाखान्यात भरती करावे लागत आहे. बाकी कोरोनाच्या उत्परिवर्तनापेक्षा (MUTANT ) ओमिक्रॉनचा धोका सध्या मोठा दिसत आहे. ओमिक्रॉन तरुणांमध्ये जास्त पसरत आहे. विद्यापीठांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ओमिक्रॉनचे लक्षणे बाकी कोरोना उत्परिवर्तनापेक्षा वेगळे आहेत. परंतू ही लक्षणे नेमकी ओमिक्रॉनची आहेत कि इतर कशामुळे दिसत आहेत हे आणखी स्पष्ट होणे बाकी आहे. त्यामळे WHO ने आव्हान केले आहे कि सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे जेणे करून ओमिक्रॉनचा प्रसार रोखला जाईल.
अगोदर कोरोनाची लागण झालेल्याना परत ओमिक्रॉनची लागण होऊ शकते का?
साधारणपणे कुठल्याही विषाणूची एक वेळेस लागण झाल्यावर त्याच विषाणूची लागण परत होत नाही. ओमिक्रॉनच्या बाबतीत मात्र वेगळी लक्षणे दिसत आहेत. ज्या लोकांना अगोदर कोरोनाची लागण झाली होती त्या लोकांना परत ओमोक्रॉनची लक्षणे आढळत आहेत. हे का होत आहे याबाबत वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. ओमिक्रॉनचा धोका ज्यांना अगोदर कोरोनाची लागण झाली होती त्यांना किती आहे यासाठी आणखी जास्त संशोधन होईपर्यंत वाट पाहावी लागेल.
लस प्रभावी ठरत आहे का ?
WHO कोरोनाच्या यापूर्वीच्या उत्परिवर्तनावर लस जशी प्रभावी ठरत होती तशीच ओमिक्रॉनसाठी प्रभावी ठरेल का यासाठी अभ्यास करत आहेत. ओमिक्रॉनवर पूर्ण संशोधन झाल्यावर लस प्रभावी ठरेल का नाही हे समजेल. आधीच्या कोरोना उत्परिवर्तनावर लस घेतल्यावर कोरोना लागण झालेल्या रुग्णाला गंभीर धोक्यापासून रोखू शकते. लस घेतल्यामुळे रुग्ण दवाखाण्यात भरती करण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे WHO ने सर्वाना लस घेण्याचे आव्हान केले आहे.
ओमिक्रॉनसाठी सध्याचे उपचार प्रभावी आहेत का ?
कार्टिको स्टिरॉइड आणि आय एल ६ रिसेप्टर( IL6 ) ब्लॉकर हे उपचार कोरोना रुग्णांसाठी वापरले जात होते. ह्या उपचारातून रुग्ण बरे होत आहेत परंतु सध्या तरी ओमिक्रॉनचे रुग्ण ह्या उपचार पद्धतीमुळे पूर्णपणे बरे होतील कि नाही सांगणे कठीण आहे.
ओमिक्रॉनबद्दल वैज्ञानिकांना पूर्ण माहिती नसल्यामुळे ओमिक्रॉनचा सध्या तरी धोका आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. सरकारांनी आपापली यंत्रणा संभावित धोक्याची तयार ठेवायला हवी अश्या सूचना WHO ने त्यांच्या पत्रकात केल्या आहे.
khup ch chan mahiti aahe