सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

जिन्ना जर जुनागड वर दावा करणार असेल तर आम्ही काश्मीर का घेऊ नये-पटेल

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. देश स्वतंत्र झाल्यावर छोट्या मोठ्या ५५० राज्यांना भारतामध्ये विलीन करण्याचे श्रेय सरदार वल्लभाई पटेलांना जाते. जम्मू आणि काश्मीरला भारतामध्ये घेण्यासाठी जर लोहपुरुष वल्लभाई पटेल यांना जबाबदारी दिली असती तर काश्मीरचा प्रश्न उभा झालाच नसता असा काही लोक दावा करतात. विशेष म्हणजे भाजप आणि संघाचे लोक असा दावा करतात. जम्मू काश्मीरच्या प्रश्नासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार मानले जाते पण सरदार पटेल यांच्या जम्मू काश्मीर प्रश्नाबद्दल भूमिकेची चर्चा होत नाही. जम्मू काश्मीर बद्दल सरदार वल्लभाई पटेल यांचे काय मत होते समजून घेणे गरजेचे आहे.

काश्मीर भारतामधे सामील करून घ्यावे महात्मा गांधींची इच्छा होती

सरदार पटेलांचे सचिव राहिलेले व्ही. शंकर यांनी सरदर पटेलांचा जीवन ग्रंथ लिहला आहे त्यात ‘व्ही. शंकर’ असे म्हणतात ,”महात्मा गांधींना अशी अपेक्षा होती कि जम्मू काश्मीर भारतात सामील होईल आणि द्वि राष्ट्राची कल्पना मोडून काढेल”. त्याउलट सरदार पटेलांची भूमिका स्पष्ट होती. जम्मू काश्मीरचा राजा हरी सिंग जो निर्णय घेईल तो पटेलांना मान्य होता. पाकिस्तान मध्ये विलीन होऊन जर काश्मीरचे भले होत असेल असे राजा हरी सिंगला वाटत असेल तर सरदार पटेलांना काही आक्षेप नव्हता.

राजा हरी सिंगला माऊंटबेटन कडून पटेलांचा निरोप

भारताचा गव्हर्नर माऊंटबेटनचे सचिव राहिलेले व्ही.पी. मेनन यांनी भारताच्या विलीनीकरणावर ‘इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट’ नावाने पुस्तक लिहले आहे. इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट मध्ये मेनन लिहतात, “माऊंटबेटन जून १९४७ मध्ये काश्मीर दौऱ्यावर गेले होते. काश्मीर दौऱ्यामध्ये माऊंटबेटन आणि राजा हरी सिंग यांच्या भेटी मध्ये माऊंटबेटने सरदार पटेलांचा निरोप दिला होता कि जर काश्मीर पाकिस्तान मध्ये सामील झाला तर भारत काश्मीर सोबत संबंध तोडणार नाही.

जिन्नाच्या जुनागढच्या भूमिकेमुळे सरदार पटेलांची काश्मीर बद्दलची भूमिका बदलली

सुरुवातीला सरदार पटेलांची काश्मीर बाबत कठोर भूमिका नव्हती. पण पाकिस्तान आणि मोहंमद अली जिन्नाने जुनागड बद्दल त्यांची भूमिका जाहीर केली. मोहंमद अली जिन्ना जुनागड पाकिस्तान मध्ये घेण्यासाठी आतुर झाले होते. पाकिस्तान जुनागडावर हल्ला करण्याची तयारी करत होता. जुनागड मध्ये राजा मुस्लिम होता मात्र बहुतांश लोक हिंदू होते. त्यामुळे जुनागडवर पाकिस्तान दावा करणार नाही अशी सरदार पटेलांना अपेक्षा होती. पाकिस्तानने जुनागड बद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे सरदार पटेलांनी त्यांची काश्मीर बद्दलची भूमिका बदलली. हिंदू बहुसंख्य असलेल्या जुनागडवर जर पाकिस्तान दावा करणार असेल तर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या काश्मीरला भारतात सामावून घेण्यास काही अडचण येणार नाही अशी सरदार पटेलांनी आक्रमक भूमिका घेतली.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.