आपल्या देशात राजकीय वाद कधी होतील काही सांगता येत नाही. म्हणजे असे वाद सुरु झाले...
राजकीय
महात्मा गांधी म्हणायचे विचाराशिवाय राजकारण होऊ शकत नाही . तुम्ही आता म्हणाल , राजकारणात कोणाला विचार आणि विचारधारा असते ? आज ह्या पार्टीत तर उद्या त्या पार्टीत हे सर्रास चालत कि. तर तुमचं खरंय. आजच्या राजकारणाकडे थोडं बारकाव्याने बघितलं कि असच दिसत. पैसे कमावणे हा एकमेव विचार शिल्लक राहिल्याचं वाटून जात. पण थांबा तुमचं लाल बावट्यावाले कार्यकर्त्यांबद्दल वाचायचं राहील आहे . आता हे लाल बावट्यावाले कोण तर कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते . जे एकमेकांना कॉम्रेड म्हणतात . कॉम्रेडला शुद्ध मराठीत आपण सहकारी म्हणू शकतो .पण कॉम्रेड मध्ये जी क्रांती आहे,जो जोश आहे तो सहकारी शब्दात कुठे . त्यामुळे ते एकमेकांना कॉम्रेड अशीच हाक मारतात . तर असो कार्ल मार्क्सचे समाजवादी विचार घेऊन राज्य करायचं हे त्यांचं ध्येय . लेनिनने ती क्रांती रशियामध्ये करून दाखवली. पण इतर ठिकाणी जमली नाही . इतर ठिकाणी क्रांती यशस्वी झाली नसली तरी आम्ही ती एक दिवस नक्की करून दाखवू असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे क्रांती करायची असेल तर क्रांतीला पूरक वागावे लागेल, जनतेची कामे करावी लागतील ,सरकारच्या विरोधात संघर्ष करावा लागेल ह्यावर सर्व कॉम्रेडच एकमत आहे . सरकार आपल्या संघर्षची धार कमी करण्यासाठी आपल्याला कधी कधी पुरस्कार सुद्धा देऊ शकत त्यामुळे कॉम्रेड्सनी सरकारी पुरस्कार स्वीकारायचे नाही असा एक अलिखित नियम केला आहे. त्यामुळे कुठलाही कॉम्रेड सरकारी पुरस्कार स्वीकारत नाहीत.बुद्धदेब भट्टाचर्यांनी पण त्याच नियमाचे पालन करून पद्मभूषण नाकारला आहे. बाकी पक्षातले लोक कितीही पार्ट्या बदलू द्या पण लालबावट्यावाले विचार आणि विचारधारा सोडत नाहीत हे बुद्धदेब भट्टाचार्यानी दाखवून दिलय.
महारष्ट्राचं राजकारण तीन ठिकाणावरून चालतं ,एक शिक्षण संस्था ,दुसरं साखर कारखाने आणि तिसरं जिल्ह्याच्या सहकारी बँका.राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही ठिकाणी मजबूत आहेत.त्या प्रमाणात भाजप आणि शिवसेना कमजोर आहेत.ह्या पक्षांच्या नेत्यांकडे ना शिक्षण संस्था आहेत ना कारखाने.भाजपने डायरेक्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेतेच त्यांच्या पक्षामध्ये घेतले त्यामुळे त्यांना ह्या संस्थासाठी वेगळी मेहनत करावी लागली नाही.भाजपाकडे आपोआप बऱ्याच संस्था आल्या.शिवसेना मात्र या खेळात मागे पडली आहे .त्या मुळेच शिवसेना मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संस्था उभा करण्याचे आदेश दिलेत.
आपल्या देशात सगळ्यात जास्त कोण जेल मध्ये जात असेल तर ते आहे चंद्रशेखर आझाद रावण...
केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीमध्ये अपर्णा सिंग यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे....
२०२२ साठी भारत सरकारने देखाव्यांची निवड जाहीर केली नाही पण २१ देखावे असणार आहेत अश्या...
संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारुतीराव कन्नमवार यांची आज जयंती आहे. पण ना कोठे त्यांच्या अभिवादनाचे...
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मोदींना रस्त्यातूनच परतावे लागले. नेमकी काय झाली होती पंतप्रधानांच्या सुरक्षितेत चूक ? जर...
सुरक्षितेच्या कारणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंजाबच्या फिरोझपूर मध्ये होणारी सभा रद्द करावी लागली. पंजाबच्या काँग्रेस...
कोरोनाचा नवा अवतार ओमायक्रोन भारतात मोठ्या प्रमाणामध्ये पसरत चालला आहे. ओमायक्रोनने राजकारणी लोकांना त्याच्या विळख्यात...