MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

ऑगस्ट क्रांती दिन-सत्ता संपवण्याचा इशारा ब्रिटिशांना दिला.

9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व सांगायचे झाले तर ब्रिटिशांच्या राजकीय पारतंत्र्यातून स्वतंत्र मिळवण्याच्या शेवटच्या टप्प्यातल्या घटणाऱ्या घटना मधील महत्त्वपूर्ण घटना आहे. ८ ऑगस्ट रोजी महात्मा गांधी यांनी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा केली आणि 9 ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळायचं ठरलं. स्वातंत्र्यानंतरही हा दिवस क्रांती दिन म्हणून पाळला जातो. त्यामुळे या दिवसाची महती जाणून घ्यायला हवी.

काय आहे ऑगस्ट क्रांती दिन?

एका वाक्यात सांगायचं झालं तर ऑगस्ट क्रांती हे असं व्यापक जन आंदोलन होतं ज्याने ब्रिटिशांच्या सत्तेला हादरावले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याची दिशाच बदलली.स्वातंत्र्याच्या संघर्षा तील ही एक ठिणगी होती. ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वाला लागणारा वणव्याची एक ठिणगी म्हणजे क्रांती दिन.९ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या या आंदोलनाने ब्रिटिश साम्राज्याला गळती लागली. आणि पुढे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने स्वराज्य मिळवले.इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांच्या आठवणींचा दिवस – ९ ऑगस्ट !

क्रांती दिनाची पूर्वतयारी ?

9 ऑगस्ट रोजी भारत छोडो म्हणून आंदोलन छेडायचे याचा प्रस्ताव कॉंग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत मांडण्यात आला. परंतु या प्रस्तावाला धरूनही महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू सहित काही नेतेमंडळीं मध्ये मतभेद होते. सुरुवातीला महात्मा गांधी यांचा भारत छोडो ला पाठिंबा होता तर जवाहरलाल नेहरू यांचा विरोध. त्यानंतर मात्र ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानात राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली. आणि नऊ ऑगस्ट रोजी आंदोलन झालं.

आंदोलनात काय झाले? आणि कसे होते?

ब्रिटिश शासनाच्या विरोधात लोकांनी निदर्शनं करायला सुरुवात केली. हजारो, लाखो तरुणांनी यात भाग घेतला आणि संपूर्ण देशच तुरुंग बनला. विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या प्रमाणात या या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. तसेच मुंबई,अहमदाबाद आणि जमशेदपूर येथील कामगारांनी आंदोलनात भाग घेतला.परंतु सर्व मान्यवर नेत्यांना अटक झाल्यामुळे या आंदोलनाला कोणीही नेता नव्हता त्यामुळे त्याला लीडरलेस मास मुमेंट असेही म्हणतात. मात्र अशा परिस्थितीतही काही भूमिगत नेत्यांनी या आंदोलनाला वळण बांधण्याचे काम केले. ज्यामध्ये सुचिता कृपलानी, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण,अच्युत पटवर्धन आणि उषा मेहता,अरुणा असत आली सारख्या क्रांतिवीर सहभागी होते.अहिंसक आंदोलनाला नेत्यांना झालेल्या अटकेने हिंसक रूप प्राप्त झाले, परिणामतः काही ठिकाणी रेल्वे स्टेशन आणि पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली, तारायंत्रे उखाडण्यात आली.रेल्वे पटऱ्या उखडण्यात आल्या.

परिणाम:

९ ऑगस्ट १९४२ रोजी मध्यरात्री पासून मुंबई आणि देशभारत पोलिसांच्या धाडी पडल्या. पहाटेपर्यंत तर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाईपटेल, मौलाना आझाद यांच्या बरोबरच अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. एवढेच नाही तर काँग्रेसला असंवैधानिक संस्था म्हणून घोषित करण्यात आले. तसेच 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये गवालिया टॅंकच्या मैदानात फडकवलेल्या तिरंग्याने या मैदानाला ‘ ऑगस्ट क्रांती मैदान’अशी ओळख दिली.एवढेच नव्हे तर गोवालिया टँकवर म्हणजेच आताच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर या लढ्याचा स्मृती स्तंभ आजही त्या स्मृती जागवत उभा आहे. अहिंसक आंदोलनाला हिंसेचे वळण लागले. देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रतिसरकारची स्थापना करण्यात आली. जसे की महाराष्ट्रातील सातारा या भागात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले. तसेच पश्चिम बंगाल मध्ये मिदनापूर, उत्तर प्रदेश मध्ये बलिया, बिहार मध्ये बगलपुर, ओडिसा मध्ये बसुदेवपुर आणि इतरही काही भागात अशा प्रकारची प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली.

ब्रिटिशांचा प्रतिसाद?

ब्रिटिशांनी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला होता पण ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया असणाऱ्या पोलीस आणि लष्करी व्यवस्थेवरील त्यांचे नियंत्रण संपलेल होत.निशस्र आंदोलकांवर ब्रिटिश सोजिरांनी लाठीचार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.

या आंदोलनाने ब्रिटिश सत्ता संपवण्याचा इशारा ब्रिटिशांना दिला आणि भारताला स्वतंत्र राज्य निर्माण करायचंच अशी चेतना लोकांमध्ये जगवली.राष्ट्रीय स्वातंत्र्य, लोकशाही आणि जनकल्याण ऑगस्ट क्रांतीतल्या कळीच्या बाबी नंतर स्वतंत्र भारतातही प्रामुख्याने कोरल्या गेल्या.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.