सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

‘मनुस्मुर्ती’ बद्दल वाद का आहेत.

आपल्या देशात काही वाद कायमचे आहेत त्यातला एक ‘मनुस्मृती’ बद्दलचा पण आहे. डाव्या विचाराचे लोक मनुस्मृतीला विरोध करतात तर उजव्या विचाराचे रूढीवादी लोक मनुस्मृतीचे समर्थन करतात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला का जाळले होते आणि भिडेसारखे लोक मनुस्मृती लिहणाऱ्या मनूची संत ज्ञानेश्वरांसोबत का तुलना करतात हे समजून घेणं गरजेचं ठरत.

मनुस्मृती काय आहे ?

अंदाजे ख्रिस्तनंतर १०० ते २०० वर्ष दरम्यान ‘मनू’ नावाच्या ऋषीने ‘मनुस्मृती’ नावाचा ग्रंथ लिहला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रासारखी मनुस्मृती आहे पण मनुस्मृती मध्ये हिंदू धर्माच्या नियमांवर जास्त भाष्य केलं आहे. हिंदू धर्माच्या चालीरीती, हिंदू धर्मातील वर्ण पद्धतीची सुरुवात मनुस्मृती पासूनच झाली. सनातनी हिंदूंनी महिलांना कसे वागवले पाहिजे ह्या बद्दल मनुस्मृती मध्ये लिहले आहे.वर्ण व्यवस्थेवर भाष्य केले आहे .मनुस्मुर्ती ला हिंदू धर्मात अधिकृत दर्जा मिळाला नाही परंतु हिंदू धर्मातील उच्च वर्णीय मनुस्मुर्तीला धर्म ग्रंथाच्या बरोबरीने दर्जा देतात.

‘मनुस्मुर्ती’ मध्ये काय आहे वादग्रस्त ?

स्मृतीचा साधा मराठी अर्थ असा होतो कि जे लक्षात आहे. मनूने मनुस्मृती मध्ये हिंदू धर्माचे नियम लिहण्याचा प्रयन्त केला आहे. मनुस्मृती मध्ये बारा अध्याय आणि चोवीशेच्या वर श्लोक आहेत. मनूने मनुस्मृती मध्ये वेगवेगळ्या विषयावर लिखाण केले आहे. राज्य कसे चालवावे, राजाने जनतेशी कसे वागावे, लग्न विधी कसे असावे इत्यादी. मनुस्मृतीचा अध्याय क्रमांक पाच, दहा आणि अकरावर मात्र अक्षेप घेतले आहेत. त्यामुळेच मनुस्मृती नेहमी वादामध्ये येते.

महिलांनी लहान असताना वडिलांच्या छायेत राहावे, तरुण असताना नवऱ्याची सेवा करावी आणि म्हतारे झाल्यावर मुलांच्या साह्याने जगावे. पुरुषांच्या सुखातच महिलांचे सुख असल्याचे मनुस्मृतीच्या पाचव्या अध्ययामध्ये लिहले आहे. तर दहाव्या अध्ययामध्ये मनूने वर्ण व्यवस्थेवर भाष्य केले आहे. हिंदू धर्माला चार वर्णांमध्ये विभागले आहे त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र.वर्णानुसार लोकांचे काम देखील मनुस्मृती मध्ये विभागले आहे .ब्राह्मणाने धर्माचे काम करावे, क्षत्रियाने लढाईला जावे, वैश्य असल्यास शेती करावी आणि शूद्र असल्यास इतर बाकी वर्ण असणाऱ्यांची सेवा करावी. अकराव्या अध्ययामध्ये गुन्हे आणि त्याची शिक्षा यावर भाष्य केले आहे. शिक्षापण वर्ण व्यवस्थेनुसार विभागली आहे. ब्राह्मणांना कमी शिक्षा तर शूद्रांना कठोरतातली कठोर शिक्षा मनुस्मृतीमध्ये लिहली आहे.

बाबासाहेबांचा का होता मनुस्मृतीला विरोध

बाबासाहेब स्वतः हिंदू धर्मातील महार जातीत जन्माला आले होते .जात आणि वर्ण व्यस्थेमुळे बाबासाहेबाना अन्याय सहन करावा लागला होता.आणि नंतरच्या काळात बाबासाहेबानी हिंदू धर्माचा अभ्यास केल्यावर या सर्व वर्णव्यवस्थेचे मूळ मनुस्मृती असल्याचे शोधले. भारतातील दलित समाजाला विकासाच्या प्रगतीच्या मार्गवर आणायचे असल्यास मनुस्मृतीला आव्हान करणे गरजेचे होते. दलित समाजाला मनुस्मृतीच्या वर्ण व्यवस्थेने अडकून ठेवले होते. वर्ण व्यवस्थेमधून दलित समाजाला बाहेर काढण्यासाठीच बाबासाहेब मनुस्मृतीचा विरोध करत. महाडच्या सत्याग्रहात बाबासाहेबानी १९२७ ला मनुस्मृती जाहीर जाळली.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.