सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

५५ वर्षे झाली तरी लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचं सत्य बाहेर आलं नाही.

lal bahadur shastri information in marathi

देशाचे दुसरे पंतप्रधान आणि ‘जय जवान जय किसान’ चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांचा ११ जानेवारी १९६६ ला कझाकिस्तानच्या ताशकंद येथे मृत्यू झाला. शास्त्रीजींच्या मृत्यूला ५५ वर्ष झाली तरी देखील त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.

काही घटना अश्या असतात ज्यांच्या बद्दल इतिहासात नोंद तर असते पण ती का झाली याची माहिती नसते. त्या घटनेला जबाबदार कोण होते या बद्दल पण काहीही माहिती उपलब्ध नसते. भारताच्या इतिहासात पण अश्या दोन घटना आहेत, ज्यांच्या बद्दल भारतीयांना पूर्ण माहिती नाही. सुभाष बाबु आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू बद्दल अधिकृत माहिती नाही. परदेशी दौऱ्यावर गेलेल्या शास्त्रींचा भारत भूमीच्या बाहेर मृत्यू झाला हे अजूनही न उलघडणारं कोडं आहे.

पंडित नेहरूनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले.

२७ मे १९६३ ला पंडित नेहरूंचा मृत्यू झाला. पंडितजींच्या मृत्यूनंतर पंतप्रधान पदासाठी अनेक जण दावेदार होते. गुजरातचे मोरारजी देसाई यांचे पारडे जड होते. मोरारजी भाईच पंतप्रधान होणार असे दिसत होते. पण त्यावेळचे काँग्रेस नेते के. कामराज, नीलम संजीव रेडी आणि इतर नेत्यांनी लाल बहादूर शास्त्री यांचे नाव पुढे केले. शांत स्वभावाचे, साधारण दिसणारे पण प्रचंड अनुभवी असेलेल्या शास्त्री यांच्या नावावर काँग्रेस मध्ये एकमत झाले. मोरारजी देसाई यांचा विरोध असून देखील लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली.

अमेरिकेच्या धमकीला शास्त्रींनी भीक घातली नाही.

शास्त्री देशाचे पंतप्रधान झाल्यावर काही दिवसातच १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाले. त्या वेळेला अमेरिका आणि रशिया यांच्यात शीत युद्ध चालू होते. पाकिस्तानने अमेरिकेची बाजू निवडली होती. त्यामुळे साहजिकच अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेतली. भारताने जर युद्ध नाही थांबवले तर अमेरिका जो गहू भारताला निर्यात करते आहे तो थांबवला जाईल, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन्सन लिंडेन यांनी दिली होती. भारत अन्नधान्य बनवण्यात आत्मनिर्भर नव्हता. त्यामुळे भारतापुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले होते. एका बाजूला देशाची सुरक्षा होती तर दुसऱ्या बाजूला अन्नधान्याचा प्रश्न होता. लाल बहादूर शास्त्री यांनी मात्र देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. लिंडोन यांना संदेश दिला कि भारत युद्ध थांबवणार नाही.भारत एक वेळ उपाशी राहणं पसंद करेल पण देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही. शास्त्रींनी लिंडेन यांच्या धमकीला भीक घातली नाही. भारत १९६५ चे युद्ध तर जिंकलाच पण सोबत अन्नधान्य बनवण्याच्या बाबतीत पण स्वयंपूर्ण झाला.

जय जवान जय किसान नारा क्रांतिकारी ठरला.

१९६५ ला भारतात मोठा दुष्काळ पडला होता. अन्नधान्याची अडचण झाली होती. बाहेर देशातून अन्न मागवणे परवडणारे नव्हते. त्यामुळे भारतापुढे आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नव्हता. शास्त्रींनी एम एस स्वामिनाथन यांना सोबत घेऊन अन्नधान्यात भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी धोरण बनवले. मेक्सिको, इंडोनेशिया सारख्या देशातून तंत्रज्ञान आणले गेले. पण मिशन पूर्ण करण्यासाठी सगळ्यांसाठी गरज होती. शेतकऱ्यांच्या मदती शिवाय ते शक्य नव्हते. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा नारा दिला. ह्या नाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवली. १९६९ ला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. जय जवान जय किसानचा नारा क्रांतिकारी ठरला.

ताशकंद मधून बातमी आली, शास्त्रींचा मृत्यू झाला !

१९६६ च्या जानेवारी मध्ये रशियन सरकारने ताशकंद शहरात जागतिक परिषद भरवली होती. जभरातले नेते बोलावले होते. पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान अयुब खान देखील परिषेदेला उपस्थित होते. परिषेदेच्या पहिल्या दिवशी सगळे ठीक होते. दिवस भर काम झाले. दिवसाचे काम संपल्यावर सगळे नेते आराम करण्यासाठी गेले होते. पण सकाळी परिषदेच्या ठिकाणी बातमी आली कि भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला म्हणून. सगळ्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. भारतीय दूतावासाला ती बातमी कळवली आणि मग ती बातमी तेथून भारतात आली. टाइम्स ऑफ इंडियाने, “शास्त्री डायज इन ताशकंद” नावाने बातमी छापली होती.

मृत्यूवर शंका उपस्थित केल्या गेल्या.

लाल बहादूर शास्त्री यांचे पार्थिव भारतात आल्या पासूनच त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. शास्त्रींचा मृत्यू नसून ती हत्या असल्याचा देखील आरोप झाला. शास्त्रींच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी देखील लोक करत होते .सरकारने मात्र चौकशी केली नाही. सरकारी दाव्यानुसार शास्त्रींचा मृत्यू हार्ट अटॅकनेच झाला आहे. सरकारने चौकशी बसवली नसल्यामुळे लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरून आज देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. आज पण भारतीयांना आपल्या पंतप्रधानांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.