“काशी इतिहासापेक्षा पण जुनी आहे. सगळ्या संस्कृतीपेक्षा काशी जुनी वाटते. जगातल्या सगळ्या महान गोष्टीपेक्षा काशी अनुभवी भासते” हे काशीचे वर्णन केले आहे अमेरिकेचे प्रसिद्ध साहित्यिक ‘मार्क ट्विन’ यांनी. काशी भारताची सांस्कृतिक राजधानी आहे. बाबा विश्वनाथचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक काशी मध्ये येत असतात. बाबा विश्वनाथच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम २०१९ मध्ये सुरु झाले होते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे उदघाटन केले. उदघाट्नच्या भाषणात नरेंद्र मोदींनी बाबा विश्वनाथ मंदिराच्या इतिहासावर भाष्य केले.
काशीचा इतिहास
काशीचा इतिहास ५००० वर्षांपासून सुरु होतो. गंगा नदीवर वसलेली काशी हिंदू धर्माची राजधानी आहे. हिंदू धर्मातील साधू संत काशीमध्ये वास्तवाला होते. महान संत शंकराचार्य यांनी त्यांच्या आयुष्यातला मोठं काळ काशी मध्ये व्यतीत केलं आहे. बाबा विश्वनाथाच्या दर्शनाने सनातनी हिंदू स्वतःला पवित्र करून घेतात. बाबा विश्वनाथाचे मंदिर देशातल्या बारा जोतिर्लिंगामध्ये येते.
बाबा विश्वनाथ मंदिराचे जीर्णोद्धार
प्राचीन बाबा विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराला पूर्वीची ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने २०१९ साली काम सुरु केले होते. मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये बाबा विश्वनाथ मंदिराला गंगा नदीचा घाट जोडला जाईल जेणेकरून भाविक गंगा नदीमध्ये स्नान करून बाबा विश्वनाथचे दर्शन घेतील. बाबा विश्वनाथच्या मंदिरासोबत त्याच्या बाजूच्या इतर ४० मंदिरांचा देखील जीर्णोद्धार केला जाईल आणि काशीला तिचे पूर्वीचे वैभव येईल अशी अपेक्षा आहे. बाबा विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारत सरकारने ८०० कोटी रुपयेचा निधी दिला आहे.
नरेंद्र मोदी यांचे भाषण (Narendra modi and Kashi Vishwanath mandir)
जीर्णोद्धारचे उदघाटन झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. काशी आणि बाबा विश्वनाथ मंदिराच्या इतिहासावर नरेंद्र मोदी यांनी प्रकाश टाकला.”बाबा विश्वनाथ मंदिर आणि काशीला उध्वस्त करण्याचे अनेक प्रयन्त झाले. ज्यांनी काशीला उद्धवस्त करण्याचा पर्यंत केला ते लोक उद्धवस्थ झाले. काशी मात्र आज देखील अभिमानाने भारताला मार्गदर्शन करण्याचे काम करते आहे. मुघल शासक औरंगजेबने काशीवर हल्ला केला होता. बाबा विश्वनाथ मंदिर तोडून तिथे मस्जिद बांधणायचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. भाषणात पुढे मोदी म्हणाले, “आपल्या भारतामध्ये जेंव्हा जेंव्हा औरंगजेब सारखा क्रूर शासक येतो तेंव्हा तेंव्हा या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेतात.
हे खास आपल्यासाठी
बळीराजा आणि त्याचा इतिहास थोडक्यात
आपल्या प्रत्येकाला सिंधू संस्कृतीबद्दल काय माहिती आहे?
पहिल्या भारतीय संसद भवनाचा इतिहास – History of first The Parliament House of India