नामदेव ढसाळ किती वर्णने द्यावी ह्या माणसाला. विद्रोही कवी, दिन दलित लोकांचा नेता आणि काय बोलावे अन लिहावे नामदेव ढसाळांबद्दल. काही माणसे एवढी मोठी असतात त्यांना आमक तमक म्हणणं त्यांचा अपमान करण्यासारख आहे. नामदेव ढसाळांसारखी माणसे वर्णने तयार करतात. आज ७२ वी जयंती आहे नामदेव ढसाळांची.
देश स्वतंत्र झाल्याच्या काही दिवसानंतर ‘अण्णा भाऊ साठे’ म्हणाले होते , ” ये आझादी झूठी है , देश कि जनता भुकी है’. देशात स्वातंत्र्याचा जल्लोष चालू असताना अण्णाभाऊ गरीब लोकांचे प्रश्न मांडत होते. स्वतंत्र वैगेरे ठीक आहे पण आमच्या गरीब लोकांच्या जीवनात काय फरक पडला म्हणून विचारणारे अण्णाभाऊ साठे विद्रोहाचा मुख्य चेहरा होते. अण्णा भाऊंनी लेखणीची ताकत ओळखली. दिन दलितांच्या प्रश्नासाठी ती वापरली. अण्णा भाऊंच्या नंतर विद्रोही आवाज म्हणून ‘नामदेव ढसाळ’ पुढे आले. नामदेव ढसाळांनी आपली लेखणी दिन दलित, गरीब आणि रंडी खाण्यात राहणाऱ्या रांडांसाठी वापरली. भीती आणि भय यांच्या पलीकडे झेप घेतली होती नामदेव ढसाळांनी. मी जगतो तेच मी मांडतो म्हणायचे नामदेव.
हा भाकरीचा जाहीरनामा , हा संसदेचा रंडीखाना ,
हि देश नावाची आई , राजरोस निजते कुबेराच्या सोबत.
ह्या ओळी आहेत नामदेव ढसाळांच्या. विद्रोहाला आणखी कुठल्या दुसऱ्या प्रकारे मांडता येईल का ? नाहीच मांडता येणार. विद्रोहाचं नाव होतं नामदेव ढसाळ.
वडील नामदेवांना मुंबईत घेऊन आले.
पुण्याच्या खेड तालुक्यातल्या ‘पूर’ नावाच्या गावातले होते ढसाळांच्या घरचे. खेड्या पाड्यात आज देखील रोजगार मिळत नाही तेंव्हा काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्यात ढसाळ कुटुंब दलित. त्यामुळे नामदेव छोटे असतानाच नामदेव ढसाळांचे वडील परिवाराला घेऊन मुंबईत आले. मुंबई येणाऱ्या प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करते म्हणतात पण ते खरं नाहीये ज्यांच्या कडे पैसे नाहीत त्यांना सामावून घ्यायला मुंबई त्यावेळी देखील तयार नव्हती ती आज देखील नाही. मुंबईच्या कमाठीपुऱ्यात ढसाळांचे वडील परिवाराला घेऊन आले. कमाठीपुऱ्यात रंडी खाणे होते. कामठीपुऱ्यातच नामदेव ढसाळांचे बालपण गेलं. रांडांचे जीवन त्यांनी जवळून पहिले त्यामुळेच त्यांना ढसाळांनी कवितेत मांडले.
दलित पँथरचे रॉकस्टार झाले.
डिसेंबर १९५६ ला दिन दलितांसाठी जगणारा त्यांचा माय बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांना सोडून गेला. बाबासाहेब गेल्यावर खूप कमी वेळात त्यांनी उभा केलेला संघर्ष फिका झाला. नेते बेईमान झाले मात्र बाबासाहेबांचे विचार तरुण पोरांमध्ये वाढत जात होते. महाराष्ट्रात दलित अत्याचार वाढत होते. ते रोखण्यासाठी काही तरी केली पाहिजे हा विचार तरुणांमध्ये वाढत होता. त्या वेळेला अमेरिकेमध्ये काळ्या लोकांच्या विरोधातले अत्याचार, अन्याय थांबवण्यासाठी ब्लॅक पॅन्थर उभी राहिली होती. त्याच धरतीवर राजा ढोले, नामदेव ढसाळ आणि इतर सहकाऱ्यांनी मुंबईत १९७२ ला दलित पँथर सुरु केली. टीट फॉर टॅट म्हणजेच जशाच तसे या विचाराने दलित पॅन्थर काम करायची. अन्याय सहन करायचा नाही करू द्यायचा नाही हेच पँथरच ब्रीद वाक्य बनलं होत. नामदेव ढसाळांची विद्रोही भाषणे लोकांच्या काळजाला हात घालीत. कमी काळातच दलित पॅन्थर महाराष्ट्रात आणि देशात पोहचली. नामदेव ढसाळ दलित पँथरचे रॉकस्टार झाले होते.
ज्या दलित पँथरला ओळख दिली त्या पँथर मधून ढसाळांना काढले.
१९७२ ला स्थापन झालेल्या पॅंथरने कमी काळात मोठे काम केले होते. पण संघटना जशी मोठी झाली त्याच बरोबर संघटनेवर दावे करणारे अनेक जण पुढे आले. प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने पँथर पुढे न्यायाची होती. पँथर मध्ये एकमत राहिले नाही. १९७८ ला नामदेव ढसाळांनी दलित पँथरचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनामा डाव्या विचाराकडे झुकलेला असल्याचा त्यावर आरोप झाले. राजा ढोले आणि इतर सहकारी देखील नामदेव ढसाळांवर खुश नव्हते. नामदेव खूप कट्टर आहेत. पँथर त्याना डाव्या विचारासारखी करायची आहे असे देखील त्यांच्या वर आरोप झाले. त्याच वर्षी नामदेव याना पँथर मधून बाहेर केले गेले.
पँथर मधून ढसाळांना बाहेर केले खरे पण आजही पँथरची ओळख नामदेव ढसाळच आहेत. लोक त्यांच्या नावानेच दलित पॅंथरची आठवण काढतात.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !