सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नसरुद्दीन शहा याना ओनोमॅटोमॅनिया झालाय पण हा कोणता रोग आहे.

हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध कलाकार नसरुद्दीन शहा यांनी त्यांच्या इंटरविव मध्ये मोठा खुलासा केला आहे. नसरुद्दीन शहा यांनी त्यांना ओनोमॅटोमॅनिया झाला असल्याचं सांगितलं आहे. नसरुद्दीन यांनी ओनोमॅटोमॅनिया बद्दल सांगितल्यापासून सगळे जण ह्या अवघड नाव असलेल्या आजारा बद्दल चर्चा करत आहेत. आपल्या ओळखीच्या पैकी तर कोणाला झाला नाही किंवा आपले डॉक्टर पण कधी या रोगा विषयी बोलले नाहीत. ओनोमॅटोमॅनिया फार गंभीर आजार नाही पण आपल्याला त्याच्या बद्दल माहिती असायला पाहिजे.

ओनोमॅटोमॅनिया नेमका काय असतो ?

ओनोमॅटोमॅनिया हा बोलण्याची व्याधी आहे. बोलताना व्यक्तीला त्रास होतो. एकच वाक्य माणूस परत परत उच्चारतो. आपल्या मराठी भाषेत आपण त्याला बोबळी वळणे म्हणतो. पण बोबळी वळणे हे कधी कधी होत. हा काही आजार नाही पण ओनोमॅटोमॅनिया हि मात्र व्याधी आहे. जे लोक खूप जास्त विचार करतात, त्यांच्या विचारात स्वतःला हरवून बसतात अश्या लोकांना ओनोमॅटोमॅनिया होण्याची शक्यता असते. दोन तीन विचार एकाच वेळेस डोक्यात आल्याने ओनोमॅटोमॅनिया तयार होतो. ओनोमॅटोमॅनिया झालेला व्यक्ती जे काही बोलत असतो त तो खूप जास्त वेळ बोलतो. एकच वाक्य परत परत बोलतं असतो. नसरुद्दीन शहा यांचा स्वभाव पण आपल्याला असाच दिसतो. स्पस्ट वक्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे पण त्यांच्या जास्त विचार करण्याने त्यांना ओनोमॅटोमॅनियाने गाठले आहे.

ओनोमॅटोमॅनिया बद्दल डॉक्टर काय सांगतात.

कविता करणारे , भाषण करणारे किंवा अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या लोक यांच्यात साधारण पणे ओनोमॅटोमॅनिया आढळून येतो. आयुष्यच्या उतार वयात त्यांना ओनोमॅटोमॅनिया होतो. कलाकार हा नेहमी त्याच्या भावविश्वात असतो. त्याचे एक वेळेस अनेक विचार चालू असतात आणि त्यात वय झाल्यामुळे विचार आणि बोलणे ह्यात फरक पडतो. झालेला फरक त्यांना जाणवत नाही.

ओनोमॅटोमॅनिया फार गंभीर व्याधी नाही. ओनोमॅटोमॅनिया झाल्यामुळे व्यक्तीला काहीही नुकसान होत नाही फक्त बोलताना आपल्याला खूप गतीने बोलायचं वाटतं. ज्या लोकांना ओनोमॅटोमॅनिया झाला आहे त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्याला काही झाले आहे याची जाणीव करून नाही दिली तर तो/ती व्यवस्थित राहू शकतो/शकते पण जर त्यांना व्याधीची जाणीव करून दिली तर मात्र त्यांचा आत्मविश्वास जाऊ शकतो. त्यामुळे ओनोमॅटोमॅनिया झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांनी काळजी घेणे गरजेचं आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.