शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीकडून धाड पडली आहे. दादर, अलिबाग आणि 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणीही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
संपत्ती जप्त केल्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरला ट्विट केले आहे.
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, “अशा कारवायांपुढे शिवसेना झुकणार नाही. मी कष्टाने कमवलेली संपत्ती आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन.” यापूर्वी ईडीच्या धाडी आणि तपासाबाबत संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर करण्यासाठी वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले होते. ईडीने नोटीस न देता ही मालमत्ता जप्त केल्याचंही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
‘कधीही गुडघे टेकणार नाही’
संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने ताब्यात घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सरकार पाडण्यासाठी मला विचारणा झाली होती मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून हा राजकीय दबाव आहे असंही राऊत म्हणाले आहेत. “दादरसाख्या भागात माझं फार फार तर टू रुम किचनचं घर आहे. एखाद्या मराठी माणसाचं असतं तसं. अलिबागला माझं गाव आहे. तिकडे साधारण 50 गुंठ्याची जमीन आहे. याला कोणी संपत्ती म्हणत असेल तर तेवढी संपत्ती आहे.”
“मी झुकणार नाही, वाकणार नाही. यापूर्वी भाजपच्या काही लोकांनी मला सरकार पाडण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. तेव्हाच मी म्हटलं की काहीही करा हे काम होणार नाही. यापुढे कधीही गुडघे टेकणार नाही. माझी संपत्ती कष्टाच्या पैशांची आहे. हा राजकीय दबाव आहे,”आपल्याकडे एकही रुपया बेकायदेशीरपणे कमवलेला नाही असंही यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
’55 लाख परत का केले?’
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर याप्रकरणी यापूर्वीच आरोप केले होते. ते म्हणाले, “संजय राऊत यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. गोरेगाव येथील पत्रापाळ संपत्ती गैरव्यवहारात संजय राऊत यांचे आर्थिक पार्टनर प्रवीण राऊत यांनी घोटाळा केला. याप्रकरणात संजय राऊत यांनी मदत केली असावी, सहकार्य केले असावे असे दिसते. ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी ईडीला 55 लाख रुपये परत केले होते. ईडी आणि सोमय्या खोटं बोलत होते तर संजय राऊत यांनी 55 लाख परत का केले?”55 लाख चेकने परत केले मग कॅश किती मिळाले असतील असाही प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
ईडीने प्रवीण राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. संजय राऊत प्रकरणातही ईडीने आता इथेच थांबू नये, त्यांचे विमान तिकीट, हॉटेल बिल्स अशा सर्व गोष्टींची चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट केलं होतं की महाराष्ट्रातील सरकारने कितीही दबाव आणला तरी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करतील असंही यावेळी सोमय्या म्हणाले.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !