सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पक्षातल्या बंडखोरीमुळे पंजाब नंतर राजस्थान पण काँग्रेसच्या हातातून जाण्याची चिन्हे आहेत

काम नसलेले पोर आणि काँग्रेस यांच्यात बरेच साम्य आढळत आहेत. दोघाच्याही आयुष्यातून संघर्ष काही थांबायचं नाव घेईना झालाय. एक वेळ बेरोजगार पोराला कुठे तरी जॉब मिळेल पण काँग्रेस त्याच काही खरं वाटतं नाही . मागच्या दोन तीन दिवस अगोदर प्रशांत किशोरने काँग्रेस जॉईन करायला नकार दिला त्यामुळे काँग्रेस चर्चेत होती आणि आता एनडीटीव्हीने राजस्थानच्या घडामोडींवर बातमी छापली आहे. त्यामुळे काल पासून राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नव्या धमकी मुळे काँग्रेस चर्चेत आहे. सचिन पायलट यांनी नेमकी काय धमकी दिली आहे आणि त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर कसं पंजाब सारखंच राजस्थान काँग्रेसचं पण होऊ शकत हे समजून घेऊ.

सचिन पायलटने कोणती धमकी दिली आहे ?

२०१८ ला भाजपाला सत्तेतून हटवून राजस्थान मध्ये सचिन पायलटच्या नेतृत्वात लढलेल्या काँग्रेस सत्तेत आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या सचिन पायलट यांना मुख्यमंत्री न करता काँग्रेसने जुने नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री केलं. अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री केल्यापासूनच सचिन पायलट पक्ष नेतृत्वावर नाराज आहे. २०२० च्या डिसेंबर मध्ये त्यांनी पक्षात बंड करायचा प्रयत्न देखील केला. पण मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी तो मोडून काढला. बंड केल्यापासून सचिन पायलट राजस्थानच्या मंत्रिमंडळात नाहीत. बंड थांबण्यासाठी त्यांना काँग्रेस नेतृत्वाने दोन वर्षानंतर मुख्यमंत्री करण्याचे वचन दिले होते.
नेतृत्वाने दिलेला वेळ संपला आहे. त्या हिशोबाने सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे पण काँग्रेसच्या गोटात तश्या काही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे सचिन पायलट यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचं एनडीटीव्ही ने बातमी दिली आहे. सचिन यांच्या मागणीला हिंदी बातम्यांमध्ये धमकी बोललं जात आहे. कारण जर मुख्यमंत्री केलं नाही तर पक्ष सोडण्याची तयारी सचिन यांनी केली असल्याचं बोललं जात आहे.

अशोक गहलोतला काढणं काँग्रेसला शक्य नाही

अशोक गहलोत हे राजस्थान काँग्रेसचे खूप जुने नेते आहेत. दोन टर्म ते राजस्थानचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. त्यामुळे सचिन पायलट यांच्या पेक्षा गहलोत यांना मानणारा मोठा वर्ग राजस्थान मध्ये आहे. त्या सोबत राजस्थान काँग्रेसचे जास्त आमदार गहलोत कॅम्प मध्ये आहेत. ह्या सर्व कारणांमुळे मुख्यमंत्री पदावरून गहलोत यांना काढणं शक्य नाही पण सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करायचे असेल तर त्यांना काढण्याचा कठीण निर्णय घेणं काँग्रेसला गरजेचं आहे.

पंजाब सारखी स्थिती का होऊ शकते ?

राजस्थानच्या आधी पंजाबमध्ये नेमकं काँग्रेसचं काय झालं होत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल त्याशिवाय राजस्थानची स्थिती समजणार नाही. तर असो पंजाब यामध्ये असं झालं कि निवडणुकीच्या आधी सहा महिने काँग्रेसने त्यांचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना पदावरून हटवले आणि चरणजित सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केलं. परिणाम असा झाला कि अमरिंदर सिंह हे काँग्रेसच्या विरोधात गेले आणि काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला. या सर्व घडामोडींचा पक्षावर वाईट परिणाम झाला. आणि ह्या सगळ्यात नवजोत सिंह सिद्धू यांनी देखील भर घातली. काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत भांडणे वाढली होती आणि त्याचा परिणाम सत्ता जाण्यात झाला. काँग्रेसला हरवत आम आदमी पक्ष पंजाबात सत्तेत आला.

राजस्थान मध्ये पण सध्या सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री केलं तर अशोक गहलोत पक्षाच्या विरोधात जाऊ शकतात. पक्षामध्ये मतभेद वाढू शकतात. पक्ष कार्यकत्यांना वेगळा संदेश जाऊ शकतो आणि पक्षाला हानी होऊ शकते. पण काँग्रेस कडे सध्या पर्याय नाही. मुख्यमंत्री नाही केलं तर सचिन पायलट पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच बोललं जात आहे तर त्यांना मुख्यमंत्री केलं तर अशोक गहलोत पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. ह्या सर्व स्थितीत काँग्रेसला हानीच सहन करावी लागणार आहे. राजस्थान मध्ये आम आदमी पक्ष सध्या तरी मजबूत नाही पण भाजप राजस्थान मध्ये चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे काँग्रेस मध्ये जर अंतर्गत भांडणे झाली तर विरोधी पक्ष म्हणजेच भाजपाला फायदा होऊ शकतो. .

येत्या काळात काँग्रेस नेतृत्वाला काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे. जर निर्णय पंजाब सारखा झाला तर परिस्थिती पंजाब सारखी होऊ शकते असं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व काय निर्णय घेत हे बघावं लागेल आणि काँग्रेसचं पंजाब सारखी स्थिती होते की नाही हे पण समजेल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.