गाडीला खरचटलं तरी ओरडणारे माणसं समोर माणूस रक्तात पडलाय तरी हळहळत नाही. माणसांपेक्षा वस्तूंवर प्रेम करणारे लोक या पृथ्वीवर राहण्याच्या लायकीचे नाहीत त्यांनी सरळ एखादा ग्रह शोधावा जिथे माणसं राहत नाहीत. वस्तूंवर प्रेम करणाऱ्या जमातीनंतर येतात कुत्रे आणि मांजरांवर प्रेम करणारे लोक. प्राण्यांवर प्रेम करणारे माणसं चांगली असतात असं वेब सिरीज मध्ये सांगितलं आहे तर खरं मानायलाच पाहिजे. शहरात कुत्र्यांना घेऊन डोंगरावर फिरायला जाताना काही माणसं या जगात फक्त कुत्री आणि मांजरी पाहिजेत अशा त्वेषात गप्पा मारत असतात. जगात सुख असेल तर कुत्र आणि दुःख असेल तर कुत्र्याचं दुःख यापलीकडे काही नाही. अशी श्रद्धा असणारे अनेक महान आत्मे आपल्या आसपास असतीलच तर मग आजच्या स्टोरीचं शीर्षक समजून विषय समजून आलाच असेल तरी संदर्भासहित विषयाला हात घालू.
पुण्यात कोंढव्यात एक श्वानप्रेमी जोडपं राहतं. या दोघांना कुत्र्यांची भलतीच आवड. घरात एखादा कुत्रा आणि दोन चार मांजरी असेल तर एवढं प्रेम समजू शकतो. पण या महान जोडप्याने एक दोन नाही तर चक्क २०-२२ भटकी कुत्री घरात आणली. यांच्या घरात लहान अकरा वर्षाचा मुलगा आहे. या लहान मुलाला या कुत्र्यांचा त्रास होईल, नाही होईल अजिबात विचार केला नाही. हा मुलगा दिवसभर अस्वच्छता आणि कुत्री यांच्यात राहायला लागला. परिणामी या मुलाची वर्तणूक कुत्र्यांसारखी झाली. शाळेत हा इतर मुलांसोबाबत सामान्य मुलांसारखा वागत नव्हता. शाळेत पोरा पोरांचे भांडण होतातच. अशाच एका भांडणात या मुलाने शाळेतल्या दुसऱ्या मुलाला तो चावला. घरी तक्रार आली. यांनतर आई वडिलांनी मुलाच्या सुधारणेकडे लक्ष द्यायचं सोडून त्यांनी मुलाला शाळेतच जाऊ दिलं नाही .
किशोरवयीन मुलांच्या मदतीसाठी चाईल्ड लाईन या संस्थेने १०९८ ही हेल्पलाईन सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने या नंबरला संपर्क करून कोंढव्यातील कृष्णाई बिल्डिंगमध्ये एका सदनिकेत २०-२२ भटके कुत्रे पाळली असल्याचं सांगितलं. याच २०-२२ कुत्र्यांबरोबर एका लहान मुलाला डांबून ठेवण्यात आल्याची तक्रार चाईल्ड लाईनकडे आली. यांनतर चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते मुलाच्या घरी पोहचले. मुलगा खिडकीत बसला होता. घरात २०-२२ कुत्रे होते. दुर्गंध येत होती. मुलाच्या वागण्यात खूप फरक पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. मुलगा कुत्र्यासारख्या हरकती करत होता. हे बघून मुलाच्या आई वडिलांना त्यांनी समज दिली. मुलाला शाळेत पाठवा आणि श्वानाच्या सहवासात ठेवू नका असं पण सांगितलं. यांनतर पालक सुधारतील ही अपेक्षा होती पण त्यांनी पुढेच काहीच केलं नाही.
यांनतर चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते शांत बसून जमणार नव्हतं. त्यांनी पोलिसात तक्रार केली. सदर घटनेची पोलिसांनी चौकशी केली. मुलाला दोन वर्षांपासून घरात कोंडून ठेवल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. मुलगा घराबाहेर पडत नाही. मुलाला शाळेतही पाठवत नाहीत. पोलिसांनी आई वडील दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. पुढील तापसानंतर अजूनही बऱ्याच गोष्टी बाहेर येतील.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !