बसपा, भाजपा आणि कम्युनिष्ट पार्टी हे तीन पक्ष केडर बेस आहेत. तिन्ही पक्षांना आधार देणारी मातृसंघटना आहे. सध्या भाजपा सोडता इतर पक्षांचे केडर कमकुवत झाले आहे. बहुजन समाज पक्षाने बामसेफ या त्यांच्या मूळ संघटनेशी फारकत घेतली आहे तर कम्युनिस्ट पक्षाचे केडर बंगाल आणि केरळ मध्ये फक्त सक्रिय आहे. भाजपला मात्र संपूर्ण देशात पोहचवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे योगदान आहे. हे तीन पक्ष सोडले तर इतर पक्ष केडर बेस प्रक्रियेत कमी पडतात. काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाला अजून केडर निर्माण करता आले नाही. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टी सारखा नवखा पक्ष संघाच्या धर्तीवर १० हजार तिरंगा शाखा काढणार असल्याची घोषणा करतोय तर तिरंगा शाखेचं स्वरूप कसं असणार हे एकदा बघायला पाहिजे.
आम आदमी पार्टीचे खासदार आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी संजय सिंग यांनी भाजपवर टीका करताना असं म्हटलं आहे कि, ‘भाजपा हा पक्ष द्वेषाचं राजकारण करतोय. या द्वेषाच्या राजकारणाला थांबवावं लागेल. जर हे थांबलं नाही तर भारताची मूळ ओळख संपेल. शिवाय भारतीय संविधान कमकुवत होईल. संविधान कोणत्याही परिस्थितीत वाचवावं लागेल म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार आहे. या शाखा संघाच्या शाखांच्या एकदम उलट असतील. तिरंगा शाखांमध्ये तिरंगा लावला जाईल त्यानंतर भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचली जाईल. संविधानाची मूल्ये समजून घेतली तर सामान्य लोक विभाजनकारी शक्तीपासून दूर राहतील.’
फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या धोरणाला अनुसरून भाजपा काम करतंय असं देखील संजय सिंह म्हणले. या सगळ्यावर उत्तर म्हणून तिरंगा शाखांमध्ये भगत सिंग, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी या महापुरुषांचे चरित्र तिरंगा शाखांमध्ये शिकवले जाईल. फक्त घोषणा न करता तिरंगा शाखा कधी पासून सुरु होणार यावर संजय सिंग म्हणाले तिरंगा शाखा पुढील सहा महिन्यात सुरु होणार. १ जुलैपासून शाखा प्रमुखांची नियुक्ती सुरु होईल. येणाऱ्या सहा महिन्यात १० हजार शाखा प्रमुख तयार केले जातील.
आम आदमी पक्षाच्या तिरंगा शाखेच्या निर्णयानंतर भाजपचे परवेश सिंग यांनी संघाच्या शाखेकडून केजरीवाल यांनी राष्ट्रवाद शिकावा आणि त्यासाठी संघाचा तीन वर्षाचा कोर्स करावा असं उत्तर दिलं आहे. संघाच्या दिल्ली शाखेत केजरीवाल यांना येण्याचं निमंत्रण सुद्धा त्यांनी दिलं आहे. केजरीवाल किती राष्ट्रवादी आहेत हे आम्हाला माहित आहे असा उपहासात्मक टोला त्यांनी .
उत्तरप्रदेश मध्ये होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम आदमी पक्ष लढवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तिरंगा शाखेची घोषणा आणि वास्तव कसं असेल हे येणारा काळ सांगेलच. तुर्तास केडर बेस पार्टी राजकारणात गरजेची आहे का तुमचं मत काय ?
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !