पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरखपूर दौऱ्यावर होते. त्यांची तिथे जाहीर सभा झाली. गोरखपूरच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशसाठी लाल टोपी वाले ‘खतरे कि घंटी’ असल्याची टीका केली. नरेंद्र मोदींनी समाजवादी पक्षाच्या लाल टोपीवर केलेल्या टीकेनंतर देशभर लाल टोपीची चर्चा आहे. कधीपासून समाजवादी पक्ष लाल टोपी वापरायला लागला आणि मोदी का करत आहे ‘लाल टोपी’ वर हल्ले समजून घेणे महत्वाचे आहे.
समाजवादी पक्षाचा इतिहास
४ ऑक्टोबर १९९२ ला मुलायम सिंग यांनी लखनऊमध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. राम मनोहर लोहिया यांचे समाजवादी विचार पुढे नेण्यासाठी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. समाजवादी पक्षाच्या सुरुवातीच्या काळात पक्षाचे सर्व नेते गांधी टोपी वापरायचे.मुलायम सिंग स्वतः गांधी टोपी मध्ये दिसायचे. समाजवादी पक्षाने त्यांच्या पक्षाच्या टोपीकडे विशेष लक्ष दिले नाही. २००८ नंतर मात्र लाल टोपी समाजवादी पक्षाची ओळख झाली आहे.
अखिलेश यादवच्या लाल टोपीची हवा.
नरेंद्र मोदींनी लाल टोपीवर टीका केल्यावर समाजवादी पक्षाचे सर्व खासदार लोकसभेत लाल टोपी घालून आले होते. अखिलेश यादव म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळ्या टोपीला क्रांतिकारक लाल टोपीची भीती दाखवत आहे. लाल टोपी खऱ्या अर्थाने समाजवादी पक्षाने वापरायला सुरुवात केली त्यांच्या २००८ च्या अधिवेशनात. अखिलेश यादव सुरुवातीला लाल टोपी परिधान करून यायचे. २०१३ मध्ये अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यावर अखिलेश नेहमीच लाल टोपी मध्ये दिसायचे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील लाल टोपी वापरायला सुरुवात केली.२०१५ पासूनच समाजवादी पक्षाच्या सर्व कार्यक्रमात लाल टोपी वाले नेते आणि कार्यकर्ते दिसायला लागले होते.
आता २०२२ च्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. समाजवादी पक्षाने पूर्ण ताकतीने प्रचार सुरु केला आहे. अखिलेश यादव यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अखिलेश यादव यांच्या सभेला येणारे सर्व लोक लाल टोपी परिधान करून येत आहेत. अखिलेश यादव यांच्या सभेमध्ये लाल टोप्यांचा महापूर येत असल्याचे दृश्य दिसत आहे.
लाल टोपीला महान इतिहास आहे. महान समाजवादी नेते राम मनोहर लोहिया आणि जय प्रकाश नारायण त्यांच्या आंदोलनात लाल टोपीचा वापर करायचे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !