अमृता फडवणीस हे नाव महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने माहित झालं २०१४ च्या डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री फडवणीस यांनी शपथ घेतल्यावर. फडवणीस कार्यकाळ जसा जसा पुढे सरकत गेला तश्या अमृता ताई ऍक्टिव्ह होत गेल्या. आधी बँकेत कर्मचारी असलेल्या अमृता ताई गायिका असल्याचं महाराष्ट्राला कळलं. मग काय दोन चार महिन्यात त्यांची गाणी यायला लागली. हिंदी , मराठी गाणे त्या गायला लागल्या. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सोबत देखील त्यांनी एक गाणं केलं आहे.
मुख्यमंत्र्यांची बायको गाणे गाते बघून सगळ्यांना त्यांचं अप्रुक वाटत होत. अनेक जण त्यांच्या गाण्यावर टीका देखील करायचे. अमृता फडवणीस यांचे गाणे आवडो कि ना आवडो त्यांना तुम्ही नाकारू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. इंग्रजी मध्ये एक म्हण आहे , “You Can Hate me or Love me But you can’t ignore me “. अमृता ताईंनी नवीन गाणे आणले कि त्याची चर्चा होतेच. अमृता फडवणीसांचा विषय घेण्याचे प्रयोजन यासाठी कि त्यांचा आज ४३ व्वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निम्मिताने त्यांच्या आयुष्याचा घेतलेला आढावा.
कोण आहेत अमृता फडणवीस ?
अमृता फडणवीस या मूळ नागपूरच्या. त्यांचे वडील शरद रानडे हे नेत्ररोगतज्ज्ञ आहेत तर चारुलता रानडे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी जी.एस.कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतली. त्यानंतर फायनान्स या विषयात MBA पूर्ण केलं. 2003 साली त्यांनी अक्सिक्स बँकेमध्ये एक्झिक्युटीव्ह कॅशिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. सध्या त्या अक्सिक्स बँकेमध्ये व्हाईस प्रेसिडन्ट-कॉर्पोरेट हेड (वेस्ट इंडिया) या पदावर कार्यरत आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. त्यानंतर बँकिंगमधली आपली कारकीर्द सांभाळतानाच त्यांनी गायनातही आपलं करिअर घडवलं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेला अल्बम, प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटात गायलेलं गाणं, विविध कार्यक्रम अशी गायनातलंही त्यांचं करिअर सुरू आहे. न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांनी रँपवॉकही केला.
अक्सिक्स बँकेचा वाद
अमृता फडणवीस सतत कोणत्या न कोणत्या वादात असतात किंवा आपण असं म्हणून शकतो वाद त्यांचा पिच्छा सोडत नाही. तर अक्सिक्स बँकेच्या बाबतीत झालं असं , महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अक्सिक्स बॅंकेत वळवल्याचा. अमृता फडवणीस या अक्सिक्स बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा निर्णय त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचा आरोप आल्याचा आरोप शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी केला होता.
अक्सिक्स बॅंकचा वाद समोर आल्यवर अमृता फडवणीस यांना टीकेला सामोरे जावे लागले होते.
शिवसेनेवरील टीका आणि वाद
भाजपच्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षानं बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. भाजपाला जशास तसं उत्तर कशा पद्धतीनं देतात हे ठाऊक आहे. आमच्यामध्ये तेवढे सामर्थ्य आहे.”
यावर आदित्य यांनी ट्वीट करत उत्तर दिलं होतं की, “देवेंद्र फडणवीसजी, सामान्यपणे मी टीकेला उत्तर देत नाही. मात्र या बांगड्या घातल्या आहेत टीकेबद्दल तुम्ही माफी मागायला हवी. सर्व शक्तीशाली, सामर्थ्यवान महिला बांगड्या घालतात. आपलं राजकारण सुरु राहिलं, पण आपल्याला अशापद्धतीने टीका करणं बंद केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांनी अशी टीका करणं अपमानास्पद वाटतं.”
त्यावर अमृता फडणवीस यांनी आदित्य यांचं हेच ट्वीट रिट्वीट करत म्हटलं होतं, “कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे.”
आदित्य यांच्या आधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली होती. मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी अमृता यांच्यावर उलट टीका केली होती. फक्त आडनाव ठाकरे असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही असं त्यांनी ट्विट केलं होत.
अमृता ताईचे गाणे नेहमीच चर्चेत येतात
अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांवरून ट्रोल करण्यात येतं. पण त्यांनी गाण्याचा छंद जोपसलाच नाही तर त्याचं करिअरमध्ये रूपांतर केलं. आज त्या व्यावसायिक गायिका झाल्या आहेत. अमृता फडवणीस यांचे गायक गुरु त्यांच्या बद्दल सांगतात कि , अमृता यांना खूप आधीपासून गाण्याची आवड होती. पण एक काळ असा होता, की त्यांना गाण्यात करिअर करायचं होतं. काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. त्यांनी ती पॅशन सोडली नाही. त्या गाणी गात राहिल्या. त्यांनी चित्रपटांसाठी गायलेली गाणी चांगली आहेत. पण आपल्याकडे राजकारण्यांना नावं ठेवण्याची सवय आहे आणि त्यांच्या बायकोनं काही केलं की नाकं मुरडतो.”
अनिरुद्ध जोशी आणि इतर गायक देखील अमृता फडवणीस यांना प्रोत्सहान देण्याचं काम करतात पण अनेक गायक आणि कलाकार त्यांच्यावर खूप कठोर शब्दात टीका देखील करताना दिसतात. २०१९ ला अमृता यांचं ‘तिला जगू द्या’ हे गाणे आल्यावर दिग्दर्शक आणि निर्माते योगेश टिळेकर यांनी त्यावर टीका केली होती..ते म्हणाले होते ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !