भारतीय आर्मीचे प्रमुख बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या Mi -17V -5 हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत यांच्यासह त्यांचा परिवार आणि कर्मचारी मिळून १४ जण प्रवास करत होते. बिपीन रावत प्रवास करत असलेले Mi-17V-5 हे जगातील सर्वोत्तम हेलिकॉप्टरांपैकी एक आहे. Mi-17V -5 ची सुरक्षा देखील खूप मुजबत असल्याचं बोललं जात. मात्र Mi-17V-5 चे मागच्या दोन तीन वर्षांमध्ये तीन अपघात झाले आहेत. त्यामुळे Mi-17V-5 हेलिकॉप्टर बद्दल जाणून घेणं गरजेचं आहे.
Mi-17V-5 भारतीय बनावटीचे नाही.
रशियन बनावटीचे Mi -17V -5 जगभरात त्याच्या सुरक्षेसाठी, त्याच्या योग्य किमतीसाठी प्रसिद्ध आहे. युद्धामध्ये वापरासाठी Mi -17V -5 ची निर्मिती रशियाने केली होती. युद्धामध्ये सैनिकांना जाण्यासाठी किंवा वजन मोठे असल्यामुळे युद्धाच्या वेळेला आर्मीसाठी साहित्याची ने आण करण्यासाठी देखील Mi-17V-5 चा वापर होतो. भारत सरकारने रशिया कडून २००८ साली Mi-17V-5 चे ८० हेलिकॉप्टर विकत घेतले होते. २०११ पासून रशियाने ती भारताला द्यायला सुरुवात केली आणि २०१८ मध्ये सर्व Mi-17V-5 भारताला मिळाले.
Mi-17V-5 हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य काय आहे ?
Mi -17V -5 हेलिकॉप्टरचे हे आर्मीच्या वाहतुकीसाठी विशेष बनवले आहेत. आर्मीच्या साहित्यासोबत जवानही प्रवास करू शकतील एवढी जागा त्यात आहे. Mi-17V-5 हे १३५०० किलोचे वजन घेऊन उडू शकते आणि ४५०० किलो वजनाचे बॉम्ब आणि इतर युद्धाचे साहित्य घेऊन प्रवास करू शकते. Mi-17V-5 हेलिकॉप्टर कुठल्याही स्थिती मध्ये प्रवास करण्यास सक्षम आहे, पाऊस असो किंवा एकदम वाळवंट असो.
Mi-17V-5 हेलिकॉप्टरचे पूर्वीचे अपघात
२०१८ मध्ये केदारनाथला महापूर आला होता, आर्मीचे जवान लोकांची मदत करत होते. मदत कार्य करत असताना भारतीय वायू दलाचे Mi-17V-5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. सहा जण त्यात जखमी झाले होते. २०१९ च्या फेबुरवारी मध्ये भारताने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोट मध्ये हल्ला केला होता. ह्या हल्ल्यात Mi-17V-5 पाकिस्तानच्या मिसाईलने पाडले होते. ह्या अपघातामध्ये भारतीय आर्मीचे सहा जवान शाहिद झाले होते.
नोव्हेंबर २०२१ मध्ये देखील अरुणाचल प्रदेश मध्ये दोन पायलट आणि तीन इतर जवानांसह प्रवास करणारे भारतीय वायू दलाचे Mi-17V-5 हेलिकॉप्टरच कोसळले होते. सुदैवाने त्यात सर्व जण सुखरूप वाचले. आणि आज आर्मी प्रमुख बिपीन रावत यांचा देखील तामिळनाडू अपघात Mi -17V-5 हेलिकॉप्टर मध्ये झाला
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !