सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आशिष शेलार म्हणतायेत ते खरंय, २०१७ ला राष्ट्रवादी-भाजप सरकार बनता बनता राहिलं

महाराष्ट्राच्या राजकारणाचे विश्लेषण करणारे सर्व विश्लेषक एक गोस्ट सांगतात कि राष्ट्रवादी पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्याच्या पक्षात काम करणारे सर्व नेते आणि कार्यकर्ते सत्तेसाठीच आहेत असं बोललं जात. ह्याची जाणीव शरद पवार यांना देखील आहे. त्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडी नावाचा प्रयोग करून दाखवला. महाविकास आघाडीचा प्रयोग जरी २०१९ ला यशस्वी झाला असला तरी तो काही शरद पवारांचा पहिला प्रयत्न नव्हता. त्याआधी देखील त्यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. फक्त जनतेला त्याची माहिती नाही. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी एक वक्तव्य केलं कि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची 2017 मध्येच सगळी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने विरोध केल्याने त्रिपक्षीय सरकार तेव्हा स्थापन झालं नाही. एकदंरीत काय तर महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग फसला.
आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण त्याच्या बोलण्यात एक तथ्य असल्याचं अनेक जाणकार सांगत आहेत. त्यामुळे ह्या प्रकरणाचा डिटेल मध्ये आढावा घेऊ

सुधीर सूर्यवंशी म्हणतायेत हे सर्व खरं आहे

इंडियन एक्सप्रेस या इंग्लिश वृत्तपत्रासाठी काम करणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर लिहणारे सुधीर सूर्यवंशी म्हणतात कि, आशिष शेलार म्हणतायेत ते सर्व खर आहे. सूर्यवंशी त्यांच्या म्हणण्यानुसार , “2014 च्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा महाराष्ट्रातले चार ही पक्ष एकत्र लढले होते. भाजपने सरकार स्थापन केलं तेव्हा त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. तेव्हा त्यांनी अल्पकाळासाठी राष्ट्रवादीची कास धरली. त्यानंतर शिवसेनेशी युती केली. मात्र शिवसेना भाजपाचं सरकार एकत्र आल्यावर त्यांचं फारसं सख्य नव्हतं. शिवसेनेने कायमच सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली होती.”
अशा परिस्थितीत राष्ट्रवादीशी युती झाली तर शरद पवारांच्या रुपाने एक ज्येष्ठ व्यक्तीचं नेतृत्व सरकारला लाभेल असं भाजपा नेत्यांना वाटलं होतं. त्याप्रमाणे दिल्लीत बैठकाही झाल्या होत्या. तेव्हा अमित शहा शरद पवारांना म्हणाले होते की तुम्ही सत्तेत या, तुम्हाला केंद्रातही पदं देऊ. राष्ट्रवादीला शिवसेना सरकारमध्ये असल्याचा आक्षेप होता. त्यांना फक्त भाजपा आणि राष्ट्रवादी यांचं सरकार हवं होतं. त्याचवेळी भाजपाला शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करायचं होतं कारण शिवसेनेला सत्तेबाहेर काढलं तर राष्ट्रवादीने खूप मोठ्या प्रमाणात वाटाघाटी केल्या असत्या. ते भाजपाला नको होतं. आणि पुढे जाऊन ती बोलणी फिसकटली. त्यामुळे आशिष शेलार जे म्हणालेत ते 100 टक्के खरं आहे.” .

भाजपाची अविश्वासाच तयार करायचा हि स्ट्रॅटेजी असू शकते ?

आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले कि आज पाच वर्षानंतर शेलार हि गोस्ट का सांगत आहेत. त्या वेळीच सांगायला हवी होती. फक्त अविश्वासाच वातावरण तयार करण्यासाठी हा सर्व खटाटोप चालला असल्याचं ते बोलले. अजित पवार यांच्या बोलण्यात अनेक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांना सत्यता वाटत आहे.  “शिवसेना हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेली त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. हे सतत विविध मार्गाने उजवून देण्यासाठी आशिष शेलार यांनी अत्यंत हुशारीने हे वक्तव्य केलं आहे. मात्र 2017 मध्ये असं काय झालं होतं की ज्यामुळे भाजपला शिवसेनेबरोबर युती करावीशी वाटली हेही शेलार यांनी हे स्पष्ट केलं नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे.

आशिष शेलार खरं सांगत आहेत कि त्यांचा काही दुसरा इरादा आहे हे फक्त ते आणि राष्ट्रवादीचे नेतेच सांगू शकतील. पण राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार यांनीच प्रतिक्रिया आली आहे. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी आशिष शेलार यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणालेत , राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये जाण्याचा प्रस्ताव तेव्हा होता. तसा एक विचारही सुरू होता. तो एक मोठा विचार प्रवाह होता. पण त्यावेळी शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत जाणं हे योग्य नाही. शिवसेना आपला मित्र आहे, विचारामध्ये समानता आहे. हे खरं आहे की ती चूक होती. त्या चुकीचं प्रायश्चित्त आम्ही आत्ताही भोगतोय.
सुधीर सूर्यवंशी आणि भाजपच्या नेत्याच्या वक्त्यव्यावर विश्वास ठेवला तर २०१७ ला राष्ट्रवादी-भाजप सरकार बनता बनत राहील हाच निष्कर्ष निघतो. आणि आपल्या सर्वाना माहिती आहे कि राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन कि मित्र नसतो. त्यामुळे आशिष शेलार यांच्या वक्तव्याला नाकारून जमणार नाही.


कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.