सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पंजाबसाठी बायको मुलांना सोडलं होतं आज भगवंत मान यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय

एक अमेरिकी लेखकाला त्याचं पुस्तकं प्रसिद्ध झाल्यावर वाचकाने विचारलं होत, ” लेखकजी एका रात्रीत तुम्ही प्रसिद्ध झालात. त्यावर तो लेखक वाचकाला म्हणाला होता , प्रिय मित्रा नक्कीच मी एका रात्रीत यशस्वी झालो पण हा एक दिवस खूप मोठा होता.”
तर सांगायचा उद्देश हा कि यशस्वी झाल्यावर तुम्हाला यश नशिबाने मिळालं असल्याचं लोक बोलतात किंबहुना त्यांना तसेच वाटतं. पण यश कोणाचं ही असो, छोटं असो कि मोठं त्यासाठी त्या व्यक्तीचे मोठे प्रयत्न आणि कष्ट असतात. यशस्वी झालेल्या लोकांच्या मागे खूप मोठे त्याग असतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याग करावे लागतात. कधी कधी ते जिव्हाळ्याच्या व्यक्तीचे देखील असतात.
पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांना देखील राजकारण करण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागला होता.

२०१५ ला बायको मुलांपासून दूर राहणं स्वीकारलं

भगवंत मान यांच्या कहाणीवर यायच्या आधी शेतकरी नेते ‘शरद जोशी’ यांच्या बद्दल सांगतो. तर एकदा असं झालं जोशी साहेब आणि त्यांच्या बायकोचे कशावरून तरी भांडण झाले. योगायोगाने त्याचं दिवशी जोशी यांचा एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाला जाऊ नका म्हणून जोशींची बायको त्यांना सांगत होती पण जोशींना ते शक्य नव्हते. भांडण न मिटवताच जोशी कार्यक्रमाला आले. दुर्दैव काय असतं बघा जोशी भाषण करायला उभे राहिले आणि त्यांच्याकडे संदेश आला कि त्यांच्या बायकोने आत्महत्या केली आहे. राजकारण आणि समाजसेवा करायची किंमत जोशींना द्यावी लागली. पण आपल्याला फक्त शरद जोशींचं यश दिसतं.
राजकारणात येण्याआधी भगवंत मान कॉमिडी करायचे. १९९२ ला त्यांचा पहिला अल्बम आला होता. २०१४ ला ते राजकारणात आले. आम आदमी पक्षाकडून पंजाबच्या संगरूर मतदार संघातून निवडणुकीला उभे राहिले. पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले. पण खासदार झाल्याचं यश त्यांना फार काळ आनंदाने साजरं करता आलं नाही. खासदार झाल्यामुळे भगवंत मान यांचा वेळ जनतेमध्ये जात होता. घरच्यांना त्यांना वेळ देता येत नव्हता. घरी मुलांना वेळ द्यावा म्हणून भगवंत मान आणि त्यांच्या बायकोत खटके उडत गेले. दुर्दैवाने त्यांचे मतभेद कमी झाले नाहीत. त्याच वर्षी त्यांची बायको इंदरप्रीत कौर भगवंत यांच्यापासून वेगळ्या झाल्या. मुलांना घेऊन त्या अमेरिकेत राहायला गेल्या. घटस्फोट घेतल्यावर भगवंत मान यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहली होती कि, पंजाबच्या जनतेसाठी मी घरच्याचं त्याग केला आहे.

वडिलांच्या शपथविधीला मुले पंजाबात आलेत.

भगवंत मान आणि इंदरप्रीत कौर यांना दोन मुले आहेत. १७ वर्षाचा दिलशान आणि २१ वर्षाची सीरत. दोन्हीही मुले त्यांच्या आईसोबत अमेरिकेत राहतात. आज १६ मार्चला भगवंत मान ‘शहीद भगत सिंग’ यांच्या ‘खट्टर कलन’ गावात मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. भगवंत मान यांच्या शपथ विधीला त्याची दोन्ही मुले अमेरिकेतून पंजाबात आले आहेत.
इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना इंदरप्रीत कौर म्हणाल्या आहेत, “मी आणि भगवंत वेगेळे झालो आहेत मात्र आम्ही दोघे पण एकमेकांसाठी प्रार्थना करत असतो. भगवंतची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. आमच्या मुलांना पण प्रचंड आनंद झाला आहे. भगवंतला भेटण्यासाठी ते पंजाबला गेले आहेत. भगवंतच्या शपथविधीला ते असणार आहेत.”

२०१५ ला भगवंत मान यांना कठीण निर्णय घ्यावा लागला पण सात वर्षानंतर पंजाबच्या जनतेने त्यांना मुख्यमंत्री केलं. भगवंत मान म्हणतात, पूर्ण पंजाब आता माझा परिवार आहे आणि मला त्यांची सेवा करायची आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.