२ एप्रिलच्या गुडीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण दिलं. भाषणात त्यांनी हिंदू मुस्लिम विषयाला देखील हाथ घातला. मुस्लिम समाजातील धार्मिक लोक सकाळी भोंग्यावर अजाण वाचतात यावर त्यांनी आक्षेप घेतला. मुस्लिम समाजातल्या लोकांनी अजाण भोंग्यावरून बंद केली नाही तर त्यांच्या धार्मिक स्थळावर हनुमान चालीसा लावण्याची धमकी राज ठाकरेंनी दिली होती.
राज ठाकरेंच्या याच भूमिकेचं भाजप नेते मोहित कंबोज यांनी स्वागत केले आहे. नवाब मलिक प्रकरणातून मोहित कंबोज प्रसिद्धीस आले होते. समीर वानखेडे यांच्या सोबतीने मोहित कंबोज यांनी आर्यन खानला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं आरोप नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केला होता. राज ठाकरेंच्या समर्थनात मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे. मनसैनिकानांना कंबोज यांनी हनुमान चालीसा लावण्यासाठी फ्री भोंगे देण्याची ऑफर दिली आहे.
या प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याची यांनी भाजप आणि मोहित कंबोज यांच्या टीका केली आहे. गृहमंत्री पुढे म्हणाले , मुंबई महापालिकेच्या निवडणूक आल्यामुळे भाजप आणि मनसे शिवसेनेला घेरण्यासाठी अजाण आणि हनुमान चालीसाचा मुद्दा काढत आहेत. पण ह्या सर्व प्रकारामुळे समजत द्वेष पसरवत आहे. राज्य सरकारची ह्यावर नजर आहे आणि भाजप आणि मनसेनी लक्ष्यात ठेवावे कि मस्जिदी पुढे अजाणच्या वेळेस हनुमान चालीसा लावण्याला बाबासाहेब ठाकरेंनी स्वतः विरोध केला होता.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !