सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा’ वाजपेयींचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं

इंदिरा गांधींना हरवून १९७८ ला जनता सरकार आलं होत. जनता सरकारमध्ये तीन महत्वाचे पक्ष होते एक म्हणजे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा काँग्रेस , जॉर्ज यांचा समाजवादी पक्ष आणि अटल बिहारी, लाल कृष्ण अडवाणी नेतृत्व करत असलेला जनसंघ. इंदिरा गांधी यांना हरवण्यासाठी हे तिघे एकत्र आले होते. इंदिरा गांधी यांना हरवलं देखील पण पुढे काय ? कोणाकडेच काही प्लॅन नव्हता. प्लॅन नसल्यामुळे तीन पक्षांमध्ये वाद सुरु झाले. एकमेकांच्या चुकांवर जाहीर बोट ठेवायला लागले. एक व्यक्ती एकाच संघटनेशी संलग्न असला पाहिजे असा अजब नियम समाजवादी नेते मधू लिमये यांनी शोधला. पंतप्रधान मोरारजी देसाई आणि जॉर्ज याना तो ऐकायला लागला. पण त्यामुळे जनसंघाच्या नेत्यांची गोची झाली. जनसंघाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते संघाचे कार्यकर्ते होते. जनता दलाच्या छत्रछायेत राहून सरकार चालवायचे असेल तर संघाचे सदस्यत्व सोडावे लागणार होते. पण अटल बिहारी आणि लाल कृष्ण अडवाणीं यांनी सरकार सोडणे पसंद केले पण संघाला सोडले नाही. मग काय? जे होणार असे वाटतं होते तेच झाले. १९८० ला दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून जनता सरकार पडले. इंदिरा परत सत्त्तेत आल्या.

१९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी प्रचंड बहुमत मिळवलं होतं. जनतेनं दोन वर्षाच्या आतच इंदिरा गांधींना बोलवले होते. इंदिरा खूप मजबूत झाल्या होत्या. त्यामुळे आता इंदिरा गांधी यांना हरवण्याची क्षमता जनता दल यांच्यात उरली नव्हती. इंदिरा गांधींचा मुकाबला करायचा असेल तर नवीन पर्याय द्यावा लागेल याची गरज अटल बिहारी आणि जनसंघाच्या नेत्यांना जाणवली आणि तिथून भाजप नावाच्या पक्षाचा प्रवास सुरु झाला. जनसंघाला बंद करून संघाच्या नेत्यांनी दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर भाजपाची स्थापन केली. पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर अटल बिहारी यांनी भाषण केलं त्या भाषणात अटल बिहारी म्हणाले, अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा’ त्या वेळी मुंबईत असणारे लोक सांगतात, अटल बिहारींची नवी घोषणा क्रांतीसाठी हाक दिल्याची भावना देऊन गेली होती.

६ एप्रिल १९८० ला सुरु झालेला भाजपचा प्रवास आज ४२ वर्षानंतर स्थिर झाल्याचा जाणवत आहे. पण त्यासाठी भाजपच्या हजारो नेत्यानी प्रचंड कष्ट घेतले आहेत . १९८४ ला दोन जागेवर असणारा पक्ष २०१९ च्या निवडणुकीत ३०३ जागा जिंकत निवडून आला आहे. भाजप नावाचं वादळ समजून घ्यायचं असेल तर त्यांचा इतिहास वाचवा लागेल. भाजपच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊ.

भाजपला जन्म देणाऱ्या दोन संघटना

भाजपची मुळं सापडतात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (RSS) च्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या जनसंघात. सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. मात्र 5 मे 1951 रोजी जनसंघाची स्थापना होईपर्यंत संघाची कुठलीच राजकीय शाखा नव्हती. सेवा दलाच्या संस्थापकांपैकी एक ‘नारायण हर्डीकर’ आणि तत्कालीन हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर या दोघांनी संघाला राजकीय पक्ष म्हणून समोर येण्याची विनंती केली होती. मात्र संघ सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरच काम करेल, असं म्हणत पहिले सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवारांनी राजकीय पक्ष स्थापनेला विरोध केला.
मात्र, 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची नथुराम गोडसेनं हत्या केली. या घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्यात आली. या काळात माधवराव सदाशिवराव गोळवलकर सरसंघचालक होते. संघावरील बंदीमुळे राजकीय पक्षाची आवश्यकता अधिक भासू लागली. गोळवलकरांनाही स्वत:ला असं वाटत होतं. मात्र, संघाला पूर्णपणे राजकीय पक्षात रूपांतरीत करण्यास त्यांचा विरोध होता.
राजकीय पक्षाच्या स्थापनेला बळ मिळत नसल्याचं पाहून, 2 नोव्हेंबर 1948 रोजी गोळवलकरांनी पत्रक काढलं आणि संघ स्वयंसेवकांना सांगितलं की, “संघ ही राजकीय संघटना नाही, त्यामुळे तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करण्यास मोकळे आहात.

मात्र, इथेच राजकीय पक्षाच्या स्थापनेसाठी एक माणूस प्रयत्न करण्यास पुढे आला, तो माणूस म्हणजे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वात स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या अंतरिम मंत्रिमंडळात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्योग आणि पुरवठा मंत्री होते. हिंदूंच्या हितासाठी लढणारे नेते म्हणून डॉ. मुखर्जींची ओळख सर्वत्र झाली होती. तेवढ्यात अगदी काही महिन्यातच वादाची पहिली ठिणगी पडली. 1950 साली पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या संरक्षणाबाबत तेथील सरकार प्रयत्न करतं नसल्याचा आरोप होऊ लागला. भारताने हिंदूच्या संरक्षणाबाबत पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे, असं डॉ. मुखर्जींचं म्हणणं होतं.

याच काळात 8 एप्रिल 1950 रोजी भारत आणि पाकिस्ताननं आपापल्या देशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची हमी देणारा करार केला. नेहरू-लियाकत पॅक्ट नावानं ओळखला जाणारा करार तो हाच. मात्र, या करारानं फारसं काही साध्य होणार नसल्याचं डॉ. मुखर्जींचं म्हणणं होतं. परिणामी करारा आधीच 1 एप्रिल 1950 ला डॉ. मुखर्जींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

यानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी नव्या राजकीय पक्षाची चाचपणी करण्यास सुरुवात केली. डॉ. मुखर्जी हे स्वत: हिंदू महासभेचे नेते होते. हिंदू महासभेचं राजकीय पक्षात रुपांतर करण्यास त्यांनाच पसंत नव्हतं. कारण त्यांचे मतभेद झाले होते. या मतभेदाची कारणं होती, महासभेचं ब्रिटीश समर्थक भूमिका, कमकुवत संघटना आणि हिंदूंव्यतिरिक्त इतर कुणालाही सदस्य करून घेण्यास नकार.

याच दरम्यान डॉ. मुखर्जींनी सरसंघचालक गोळवलकरांना गाठलं. मात्र, संघालाच राजकीय पक्षांत रुपांतरीत करण्यास गोळवलकर तयार नव्हते. त्यात आधीपासून अस्तित्वात असलेल्या हिंदूंच्या बाजूनं भूमिका घेणाऱ्या संघटनांनाही (हिंदू महासभा आणि राम राज्य परिषद) समर्थन देण्यास त्यांनी नकार दिला. अखेर एका बैठकीत गोळवलकर आणि डॉ. मुखर्जी राजकीय पक्षाच्या स्थापनेच्या मुद्द्यावर सहमत झाले आणि त्यातूनच 5 मे 1951 रोजी जनसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे 21 ऑक्टोबर 1951 रोजी दिल्लीतल्या रघुमल आर्य कन्या हायर सेकंडरी स्कूलच्या आवारात पहिलं अधिवेशन झालं आणि त्यात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जनसंघाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली.

जनसंघाच्या स्थापनेच्या दोन वर्षांनी डॉ. मुखर्जींचं निधन झालं. त्यांच्या नेतृत्वातच फक्त लोकसभा निवडणूक जनसंघ लढला आणि त्यात देशभरात 3 जागा मिळाल्या. 1951 ते 1971 या काळात जनसंघानं 5 लोकसभा निवडणुका लढल्या. त्यात 1951 (3 जागा), 1957 (4 जागा), 1962 (14 जागा), 1967 (35 जागा) आणि 1971 (22 जागा) असा जागांचा चढता-उतरता आलेख दिसतो.

1971 नंतरची अपेक्षित लोकसभा निवडणूक झाली नाही, कारण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. या आणीबाणीविरोधात देशव्यापी ‘संपूर्ण क्रांती’चा नारा दिला आणि आंदोलन उभं केलं. यात जनसंघाचे अनेक नेते होते. अनेकजण तुरुंगातही गेले होते.आणीबाणी उठवल्यानंतर इंदिरा गांधींनी निवडणुका जाहीर केल्या. हे वर्ष होतं 1977.

यावेळी आणीबाणीविरोधात लढणारे चार पक्ष ‘जनता पार्टी’ नावाच्या एका छताखाली एकत्र आले. त्यात मोरारजी देसाईंच्या नेतृत्वातील काँग्रेस (संघटना), जॉर्ज फर्नांडीसांच्या नेतृत्वातील सोशालिस्ट पार्टी, चरणसिंगांच्या नेतृत्वातील भारतीय क्रांती दल आणि लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वातील जनसंघाचा समावेश होता. इंदिरा गांधींविरोधात देशभरात संताप होता. याचं प्रतिबिंब 1977 च्या निवडणुकीत उमटलं. 542 जागा लढवलेल्या इंदिरा काँग्रेसला अवघ्या 154 जागांवर जिंकता आलं. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचाही यात पराभव झाला. चार पक्षांनी एकत्रित येत केलेल्या ‘जनता पार्टी’नं 298 जागांसह घवघवीत यश मिळवलं. यात एकट्या जनसंघाचे 93 उमेदवार जिंकले होते. खरंतर जनसंघ जनता पार्टीतला सर्वाधिक खासदारांचा पक्ष होता. मात्र, जनसंघाला स्वीकारार्हता कमी असल्याने जनसंघाचा पंतप्रधान होऊ शकला नाही.

याच काळात मार्च 1978 मध्ये जनता पार्टीतल्या जनसंघाच्या नेत्यांच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्याला समाजवादी नेते मधू लिमये यांनी हात घातला. याच मुद्द्याची परिणिती जनता पार्टी फुटण्यात झाली आणि याच मुद्द्यामुळे पुढे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली.

वाजपेयी पोस्टर बॉय तर अडवाणी पडद्या मागून काम करणारे चाणक्य

जनता दलाचा प्रयोग फसल्यावर भाजप नावाचा प्रयोग सुरु केला होता. जनता नव्या पक्षाला किती प्रतिसाद देईल याची काही अंदाज नव्हता. पण एकदा सुरुवात केली म्हंटल्यावर प्रवास तर करावाच लागणार होता. नव्या पक्षाचे पोस्टर बॉय झाले अटल बिहारी तर पडद्या मागून काम करणारे अडवाणी. भाजपने पहिली निवडणूक लढवली १९८४ ची लोकसभा पण २ जागांवर समाधान मानावं लागलं. पण त्यानंतर २००४ आणि २००९ सोडता भाजपचा ग्राफ कधीही खाली आला नाही. २०१४ आणि २०१९ ला तर मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने प्रचंड बहुमत मिळवले आहे.

भाजप, मोदी आणि त्यांचे इतर कार्यकतें जे यश भोगत आहेत त्यासाठी खूप नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. अटल बिहारी, लाल कृष्ण अडवाणी . मनोहर जोशी , उमा भरती, अरुण जेटली, प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे आणि लाखो करोडो कार्यकतें.
१९९७ ला अवघ्या दोन मतांनी अटल बिहारी यांचं सरकार पडले. तेंव्हा संसदेत पंतप्रधान अटल बिहारींनी भाषण दिल होत कि विरोधकांना म्हणाले होते, आज आमचं सरकार पडलं आहे म्हणून तुम्ही हसत आहेत पण काही प्रॉब्लेम नाही एक दिवस आमच्या पक्षाचं बहुमताच सरकार येईल”.
अटलजीच्या भाषणाने भाजपच्या कार्यकर्त्यांना खूप दुःख झालं होत पण २०१४ ला नरेंद्र मोदींनी वाजपीयेचं स्वप्न पूर्ण केलं. आज भाजप देशातला सर्वात मोठा आणि मजबूत पक्ष आहे. आज भाजप ४२ वर्षाचा झाला आहे.


कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.