सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

चंदीगडमध्ये केजरीवालची हवा ! पण सत्तेपासून दूर.

Chandigarh MC elections: Hung House as AAP wins 14 seats, BJP 12

चंदीगड महानगरपालिकेचे निकाल आले आहेत. ३५ नरगरसेवक असलेल्या महापालिकेत आम आदमी पक्ष १४ जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे तर भाजप १२ जागेवर आहे. काँग्रेस ८ जागेवर तर अकाली दल फक्त एक जागा जिंकला आहे. चंदीगड महापालिकेची पहिलीच निवडणूक लढवणारा आम आदमी पक्ष एक नंबरला आहे मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्षाकडे चार नगरसेवक कमी आहेत. त्यामुळे चंदीगड महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

झिरो वरून १४ पर्यंत आम आदमी पक्षाची मोठी मजल

अण्णा हजारे आंदोलनातून काही साथीदार सोबत घेऊन अरविंद केजरीवाल यांनी २०१२ ला आम आदमी पक्ष सथापन केला. दिल्ली सोडून आम आदमी पक्षाने पंजाब मध्ये आधीपासूनच लक्ष केंद्रित केले आहे. पंजाबच्या विधानसभेत आम आदमी पक्षाचे आमदार असताना देखील पंजाबची राजधानी असलेल्या चंदीगड महापालिकेत त्यांचा एकही नगरसेवक नव्हता. २०२१ च्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष ताकतीने उतरला होता. अरविंद केजरीवाल यांनी चंदीगडमध्ये जोरदार प्रचार केला होता. निवडणुकीच्या निकालामध्ये त्याची फळे आम आदमी पक्षाच्या विजयात दिसत आहेत. सत्ताधारी भाजपला मागे सोडून आम आदमी पक्षाने चंदीगड महापालिकेत झिरो वरून १४ जागा जिंकत मोठी मजल मारली आहे.

सर्वात जास्त जागा जिंकून पण सत्ता नाही

चंदीगड महापालिकेत ३५ नगरसेवक आहेत. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी १८ नगरसेवकांची गरज लागते. आम आदमी पक्षांनी १४ जागा जिंकल्या आहेत मात्र सत्ता मिळवण्यासाठी चार नगरसेवक त्यांना कमी पडणार आहेत. आम आदमी पक्षाला सत्ता मिळवायची असेल तर काँग्रेस सोबत युती करावी लागणार आहे. काँग्रेसचे आठ नगरसेवक जिंकले आहेत. पण काँग्रेस आम आदमी पक्षासोबत युती करते का याबाबत शंका आहेत. त्यामुळे आम आदमी पक्ष एक नंबरला असला तरी पक्षाला सत्ता मिळणे कठीण दिसत आहे.

भाजप काय करेल?

महापालिकेच्या निवडणुकीत भाजप दुसऱ्या नंबरला आहे. चंदीगड महापालिकेत भाजपचे १२ नगरसेवक जिंकले आहेत. भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये फक्त दोन जागांचे अंतर आहे. त्यामुळे भाजप पण सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करते का पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपाला सत्ता मिळवायची असल्यास सहा नगरसेवक लागणार आहेत. तेवढे नगरसेवक भाजपाला मिळणे कठीण आहे. कारण काँग्रेस भाजपाला समर्थन देण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे भाजपाला विरोधात बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.