शुक्रवार ८ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. तेंव्हापासून महाराष्ट्रातले राजकारण तापले आहे. सांगायचं मुद्दा हा आहे कि शरद पवार सध्या खूप चर्चेत आहेत. त्यातचं काँग्रेस पक्षाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती मध्ये मोठे विधान केले आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना त्यांनी शरद पवार मुख्यमंत्री असायला हवे होते अश्या आशयाचे विधान केले आहे.
भाजप आणि मनसे एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तीव्र शब्दांत टीका करत असताना दुसऱ्याबाजूला सरकारमधील मंत्र्यांनीच ‘शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत आणि ते काळाची गरज आहेत’ असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
अकोला विद्यापीठात कार्यक्रमासाठी शरद पवार अमरावतीत होते
देशाचे माजी कृषी मंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अकोला कृषी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी शरद पवार अकोल्यात आले होते.
अकोल्याच्या खासदार नवनीत राणा, मंत्री सुनील केदार आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. याच कार्यक्रमांत मनोगत व्यक्त करताना यशोमती ठाकूर यांनी शरद पवार मुख्यमंत्री होणे काळाची गरज असल्याचं वक्तव्य केले.
यशोमती ठाकूर म्हणाल्या कि ,” शरद पवार जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं राहील असतं. शरद पवार काळाची गरज आहे. कोणी कितीही तिर मारले तरी महाविकास आघाडी सरकार अस्थिर होणार नाही.”
यशोमती ठाकूर यांच्या मताशी काँग्रेसचे इतर मंत्री सहमत आहेत कि नाही यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यांनी २०२४ ला महारष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशी गर्जना केली आहे. त्यामुळे ते यशोमती ठाकूर यांच्या वक्त्यव्या वरून ते कशी प्रतिक्रिया देतात बघणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या नंबरला आहे. त्यात पण काँग्रेसचे मंत्री दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्ष मुख्यमंत्री होण्याची मागणी करत आहेत. या सर्व प्रकरणावरून काँग्रेस मध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समजतं..
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !