सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

गडकरींच्या विनंतीमुळे महाराष्ट्राला आंध्र प्रदेशकडून ३०० व्हेंटिलेटर.

गडकरींच्या विनंतीमुळे महाराष्ट्राला आंध्र प्रदेशकडून ३०० व्हेंटिलेटर

कोरोना मुले दिवसेंदिवस आपल्या आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर कमी पडत असल्याच्या बातम्या रोज वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत काही नेते प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहे. महाराष्ट्रात वाढती रुग्ण संख्या पाहता सध्या पक्ष, विचार, प्रदेश यापुढे विचार करणे गरजेचे होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याना व्हेंटिलेटरसाठी विनंती केली होती. आंध्राचे मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी यांनी देखील गडकरींच्या विंनतीला गंभीरतेने घेत मदत पाठवण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची पूर्तता म्हणून YS जगन मोहन रेड्डी यांनी आज ३०० व्हेंटिलेटर महाराष्ट्र्रात पाठवून दिले. हे ३०० व्हेंटिलेटर पोहोच झाल्याची बातमी नितीन गडकरींनी समाज माध्यमांवर दिली.

सध्याच्या काळात राज्यांनी एकमेकांना अश्या पद्धतीने मदत करणे गरजेचे आहे. काळ खराब आहे आता एकजुटीने या प्रश्नाला उत्तर शोधलं पाहिजे. केंद्र -राज्य वाद न करता या प्रश्नावर लक्ष दिले पाहिजे. नितीन गडकरींनी यानंतर मुख्यमत्री YS जगन मोहन रेड्डी यांचे आभार मानले. सर्वानी हातभार लावला तर हा काळ निघून जाईल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.