सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

महाराष्ट्राला मोठा दिलासा: ७१,७३६ कोरोनामुक्त

महाराष्ट्राला मोठा दिलासा: ७१,७३६ कोरोनामुक्त

कोरोना रोज नवे धक्के देत असताना ही आशादायक बातमी आली आहे. महाराष्ट्रासह पुणे मुंबई दोन्ही महानगर पालिकांमधील कोरोना रुग्णाची संख्या कमी होताना दिसत आहे. शिवाय कोरोनामुक्त रुग्णाची संख्या देखील वाढत आहे.

७१,७३६ कोरोनामुक्त.

आज २६ एप्रिल रात्री उशिरा हाती आलेल्या आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात नवीन ४८,७०० कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आहेत. या महत्वाची आणि महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी म्हणजे आज ७१७३६ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या ५२४ आहे तर आजतागायत ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६७४७७० इतकी आहे. आतापर्यंत एकूण संख्या ४३४३७२७ असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३६०१७९६ आहे. आतपर्यंत मृतांची एकूण संख्या ६५२८४ आहे. एकूण २,५९,७२,०१८ लोकांनी टेस्ट केली. घरीच विलगीकरणात असणाऱ्या रुग्णाची संख्या ३९,७८,४२० आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्यांची संख्या ३०,३९८. कोरोनामुक्त होण्याचा दर ८२.९२ % तर मृत्यू दर १.५ % आहे.

पुणे आघाडीवर

एकूण महाराष्ट्रांनांतर मुख्य शहराचा विचार केला तर पुणे आणि मुंबई शहरातील रुग्णाची संख्या पण कमी होताना दिसत आहे. सध्या पुणे महानगरपालिकेत एकूण उपचार सुरु असणारे ४७,४२० आहेत. सोमवार २६ एप्रिल, २०२१ रोजी नवीन रुग्णांची २,५३८ नोंद झाली तर बरे झालेल्या रुग्णाची संख्या यापेक्षा अधिक म्हणजे ४३५१ इतकी आहे. तर दिवसभरात ५६ मृत्यू झाले. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ५५४ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४७ हजार ४२० रुग्णांपैकी १,३७१ रुग्ण गंभीर तर ६,६३० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

मुंबई पण मागे नाही

मुंबईमध्ये सुद्धा दिलासादायक बातमी आहे. मुंबईच्या कोरोना केसेस मध्ये मागच्या तीन आठवड्यातील सर्वात मोठी घट झाल्याची बातमी आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या २४ तासातील आकडेवारीनं मुंबईकरांना काहीसा दिलासा दिला आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. २४ तासात मुंबईत ३८७६ रुग्ण आढळले तर तब्बल ९१५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १२ हजार ७१९ झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६२ दिवसांवर गेला आहे. तर १९ एप्रिल ते २५ एप्रिल या काळात रुग्णवाढीचा दर १.०९ टक्के एवढा आहे.

सर्व आकडेवारीनुसार चित्र आशावादी आहे. अजून ही लढाई संपली नाही आपल्याला सतर्क राहावे लागेल. काळजी महत्वाची आहे. सुरक्षित राहा.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.