सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

कोविशिल्ड लशीमधील पहिला आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी १२ ते १६ आठवडे होणार.

केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीमधील कालावधी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पहिला आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी १२ ते १६ आठवडे ठेवता येणार आहे. सध्या हा गॅप ६ ते ८ आठवडे असा होता. कोरोना लसीचा तुटवडा देशभरात निर्माण झाला. यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समिती (NTAGI) गठीत करण्यात आली होती. या समितीने काही शिफारसी केल्या होत्या. त्यातील एक म्हणजे कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील कालावधी हा १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढविला गेला पाहिजे. केद्राने ही शिफारस मान्य केली आहे.

कोवॅक्सिन लसमध्ये बदल नाही.

कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमधील कालावधीबाबत काहीही बदल करण्यात आलेला नाही. पॅनलने असंही सांगितलंय की, गरोदर महिलांना लस निवडता येईल आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना लस घेता येईल. समितीने कोवॅक्सिनच्या डोसबाबत कोणताही बदल सुचविलेला नाही.

दुसरा डोस उशिरा दिल्याने कमी होऊ शकतो मृत्यूदर.

नव्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना लसीचा दुसरा डोस उशिरा घेतल्यास कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू कमी होतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परिस्थिती अनुकूल असल्यास या सर्व गोष्टी काम करू शकतात, कारण ही पण एक शक्यता आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश (Jayaram Ramesh) यांनी लसीकरण मोहिमेत पारदर्शकता हवी अशी मागणी केली आहे. जयराम रमेश म्हणाले, “सुरुवातीला दुसऱ्या डोससाठी ४ आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी निश्चित केला गेला. त्यानंतर आता आपण १२ ते १६ आठवडे हा दुसऱ्या डोससाठीचा नवा कालावधी आणू पाहत आहात. सध्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने आपण हा निर्णय घेतला आहे? की तज्ज्ञ वैज्ञानिकांनी हा कालावधी वाढवण्याचा सल्ला दिला आहे? मोदी सरकारकडून आम्ही पारदर्शकतेची आशा करावी का?”

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.