सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

लसीकरण पॅकेज विकणाऱ्या हॉटेल वर कारवाई होणार (Hospital and hotel can not offer vaccination package)

hotel and hospital offering vaccination package

लॉकडाउन मध्ये अनेक व्यावसायिकांना खूप नुकसान सहन करावं लागलं होतं. पैसे कमवणे महत्वाचे आहेच, पण काही झालं तरी पैसे कमवण्याची संधी अनेकजण शोधात असतात. त्याचाच एक परिणाम म्हणून कि काय लोकांना लस मिळत नाही म्हणून प्रचंड गोंधळ असताना हॉटेल व्यावसायिकांनी मात्र लस उपलब्ध करून चक्क टूर पॅकेज जाहीर केले आहेत. हॉटेल मालका बरोबर डॉक्टर आणि खाजगी दवाखाने यांनीही यात उडी घेतली आहे. अनेक ठिकाणी याच्या जाहिराती तुम्ही पहिल्या असतील.

या लसीकरण पॅकेजचे स्वरूप कसे होते?

काही हॉटेल मालकांनी खाजगी दवाखाने आणि डॉक्टर यांच्याशी हात मिळवणी करून लसीकरण पॅकेज योजना सुरु केली. या पॅकेजच्या किंमतीनुसार इतर सुविधा तुम्हाला मिळणार असल्याचे सांगितले गेले आहे. पुणे आणि मुंबई शहरी भागात ही योजना चांगलीच चर्चेला आली. सहलीला गेल्यासारखे हे पॅकेज बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तीन हजारापासून हे पॅकेज सुरु होते. सर्वात कमी घेतल्यास तीन चार तास हॉटेलवर थांबण्याची सोय त्याबरोबर खाण्याची सोय असं हे पॅकेज होतं. अधिक पैसे मोजल्यास राहण्याची सोय आणि इतर सुविधा दिल्या जाणार असल्याच्या जाहिराती चांगल्याच फिरत आहेत. हे लसीकरण डॉक्टर आणि आवश्यक काळजी घेऊनच केले जाईल असाही या जाहिरातींचा दावा होता.

कोणत्या नियमांचा भंग केल्यामुळे कारवाई होणार ?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधी जाहीर केले कि अशा प्रकारे हॉटेल मध्ये लसीकरण करणे लसीकरणासंबंधी सांगितलेल्या नियमाचे हे उल्लंघन आहे. असे पॅकेज देणाऱ्या हॉटेलवर गंभीर कार्यवाही केली जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. लसीकरण कुठे केले जाऊ शकते यासंबंधी आरोग्य मंत्रालयाने चार पर्याय सांगितले आहेत. ते चार पर्याय असे आहेत,

१) शासकीय लसीकरण केंद्र
२) खाजगी लसीकरण केंद्र जे खाजगी दवाखान्यांमार्फत चालवली असतील.
३) कामाच्या ठिकाणी सरकारी किंवा खाजगी कार्यालय जे सरकारी किंवा खाजगी कंपनीमार्फत चालवले जातील.
४) दिव्यांग बांधव, वृद्ध आश्रम, शाळा, सोसायटी, अशा ठिकाणी लसीकरण केंद्राच्या जवळ लसीकरण केले जाईल.

या नियमावलीत हॉटेल मध्ये लसीकरण बसत नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.