सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

१८ वर्षांपुढील लसीकरणासाठी कुठे आणि कशी नोंदणी करायची ?

१८ वर्षांपुढील लसीकरणासाठी कुठे आणि कशी नोंदणी करायची

लसीकरणाचा पुढचा महत्वाचा आणि मोठा टप्पा सुरु होत आहे. २८ एप्रिल पासून १८ वर्षांपुढील सर्वजण नोंदणी करू शकतात. नोंदणी प्रक्रिया २८ एप्रिल पासून असली तरी लसीकरण १ मे पासून सुरु होईल. सायं ४ वाजता नोंदणी प्रक्रिया सुरु होईल

पात्र असणाऱ्या नागरिकांनी शासनाच्या COWIN.GOV.IN या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा. किंवा मागच्या वर्षी आलेल्या आरोग्य सेतू अँप द्वारे सुद्धा नोंदणी करता येऊ शकते. दोनपैकी एक पर्याय निवडून लसीकरणासाठी पूर्व नोंदणी करा.
गोंधळ होऊ नये म्हणून सोप्या शब्दात आणि एकेक पायरीनुसार कशी नोंदणी करायची समजून घ्या

CoWin पोर्टलवर कशी नोंदणी कारवाई ?

१. www.cowin.gov.in लॉग इन करा.
२. तुमचा मोबाईल नंबर नोंद करा आणि OTP खात्री करून खाते (अकाउंट) बनवा.
३. यानंतर लसीकरण नोंदणी पेजवर इथून तुम्ही थेट पोहचतात. इथे आल्यानंतर ओळखपत्र पुरावा हा पर्याय निवड करा.
४. संपूर्ण नाव, वय, लिंग माहिती पूर्ण भरा आणि ओळखपत्र पुरावा अपलोड करा.
५. Register या बटनावर क्लिक करा.
६. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सिस्टिम तुम्हाला तुमच्या खात्याचा तपशील दाखवेल.,
७. नोंदणीकृत व्यक्ती एकाच मोबाईल नंबर द्वारे अजून तीन लोकांची नोंदणी करू शकतो . यासाठी Add more बटनावर क्लिक करा.
८.’Schedule appointment‘ इथे क्लिक करून तुम्हाला सोयीस्कर असणारी दिनांक आणि वेळ नोंद करा.
९.राज्य, ज़िल्हा, पिन कोड यावरून लसीकरण केंद्र शोधा.
१०. केंद्र निवडल्यानंतर लसीकरणाचा दिनांक आणि उपलब्धता दर्शवली जाईल. यानंतर BOOK बटनावर क्लिक करा.
११. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर संदेश येईल. हा संदेश लसीकरण केंद्रावर दाखवणे अनिवार्य आहे.

आरोग्य सेतू अँप आणि उमंग अँप इथूनही याच पद्धतीने नोंदणी करू शकता. दोन्ही अँप मध्ये CoWin टॅब वर क्लिक करा बाकी सगळी प्रक्रिया याच पद्धतीने करा.

लसीकरणाला जाताना खालील कागदपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
१) ओळखपत्र पुरावा
२) काही आजार असल्यास त्यासंबंधी कागदपत्रे.

१०७५ या CoWIN हेल्प लाईन क्रमांकावर आपण अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.