सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती केरळ सरकारने ठरवल्या.

देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक मार्गानी प्रयत्न चालू आहेत. एखादी आप्पती ही बऱ्याच जणांना संधी देऊन जाते. कोरोना काळात देखील हा अनुभव आला आहे. सुरवातीला तर मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावल्या गेल्या. यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडला. केरळ सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे किमान केरळ मध्ये तरी आता कोरोना उपचार आवाक्यात येतील अशी आशा करायला हरकत नाही.

Kerala Essential Articles Control Act, 1986

केरळमध्ये Kerala Essential Articles Control Act, 1986 या कायद्यानुसार अत्यावश्यक सेवा किंवा वस्तू यांच्या किंमती सरकार ठरवू शकते. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या कायद्यांची अमंलबजावणी सुरु केल्याची माहिती दिली. सध्याच्या काळात किंमतींवर नियमन करणे गरजेचे होते. त्यानुसार आता N 95 मास्क इतर वस्तूंच्या किंमती खालील प्रमाणे असतील.

PPE किट्स- ₹ २७३
N95 मास्क- ₹ २२
ट्रिपल लेअर मास्क- ₹ 3.९०
फेस शील्ड- ₹ २१
Disposable Apron – ₹ १२
Surgical Gown – ₹ ६५
Inspection Gloves – ₹ ५.७५
हॅन्ड सॅनिटायझर- ₹ १९२ (५०० ml), ₹ ९८ (२०० ml), ₹ ५५(१०० ml)
Sterile Gloves- ₹ १५ (pair)
NRB मास्क- ₹ ८०
Oxygen मास्क ₹ 54
Flow Meter with Humidifier -₹ १५२०
Pulse Oximeter- ₹ १५००

ठरवून दिलेल्या या किंमती पेक्षा अधिक रक्कम आता आकारता येणार नाही. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कोरोना उपचार खर्च काही अंशी का होईना आटोक्यात येईल. खरं तर सर्व राज्यात या प्रकारची नियमावली जाहीर करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने देखील आशा वेळी गंभीरतेने विचार करायला पाहिजे. देशभरात कोरोना उपचार करताना अनेक ठिकाणी रुग्णांची लूट झाली आहे. हा सगळा विचार करता हे पाऊल महत्वाचं आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.