सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पुण्याच्या ‘नायडू’ हॉस्पिटल मध्ये आता ऑक्सिजन रिफिलिंग स्टेशन.

देशात आणि राज्यात काही भागात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेश, बिहार राज्यात तर परिस्थिती भयंकर झाली आहे. महाराष्ट्रातही मुंबई, नाशिक आणि काही ठिकाणी रुग्णांना जीव गमवावा लागला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने चांगलं पाऊल उचललं आहे. याआधी पुणे महानगरपालिकेनं कमी वेळेत ऑक्सिजन प्लांट उभा करून दाखवला आहे. आता महानगर पालिकेने ऑक्सिजन पुरवठा अधिक सुरळीत होण्याच्या दृष्टीने घेतलेलं
हे पाऊल स्वागतार्ह आहे.

पुणे महापालिकेच्या डॉक्टर नायडू रुग्णालयाच्या आवारात 13KL क्षमतेचा ऑक्सीजन टँक बसविण्यात आला आहे. याच्या साह्याने लिक्विड डूरा सिलेंडर रिफिलिंग करून पुणे मनपाच्या इतर रुग्णालयांना पुरविण्यात येणार आहे. आज पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. तसेच गॅस जंबो सिलेंडर रिफिलिंग प्लॅण्टही कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी ऑक्सीजन सिलेंडर भरण्याची सुविधाही उपलब्ध होणार असल्याने शहरातील कुठल्याही रुग्णालयात गतीने ऑक्सिजन पुरवठा करणे सहज शक्य होईल. भविष्यातील रुग्णाची गरज ओळखून हे पाऊल महत्वाचे आहे. ऑक्सिजन उपलब्धतेत सर्व शहरे लवकर स्वयंपूर्ण होतील अशी आशा करू.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.