सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचारातून या कारणामुळे थांबवली : केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दुसऱ्या लाटेत रुग्णांबरोबर नातेवाईकांची ससेहोलपट खूप झाली. सहज व्हाटस अँप वर प्लाझ्मा द्या असे किमान दोन चार तरी स्टेटस झळकायचे. आता वणवण फिरणारे कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि प्लाझ्मादान करुन कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करत असाल तर थांबा, कारण केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून आता नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.

करोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी असल्याने प्लाझ्मा मागणी वाढत होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. दरम्यान टास्क फोर्सने आता प्लाझ्मा थेरपीला उपचारांमधून वगळून टाकलं आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR ), एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर करोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थेरपी करोनाविरोधातील उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं. म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी आवाहन केलं होतं. प्लाझ्मा देण्यासाठी कोरोना होऊन गेलेले अनके जण पुढे सरसावले. पण या निर्णयानंतर एक प्रकारे या लोकांना फसवणूक झाल्यासारखं वाटत असेल.

अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी परिमाणकारक नसल्याचं समोर आलं आहे

गभरातही या बाबत शास्त्रज्ञांनी प्रतिकूल मत दिली होती. आयसीएमआर, टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याच्या बाजूने मत नोंदवलं होतं. भारतातही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तसंच काही संशोधकांनी प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्स संचालकांना यासंदर्भात पत्र लिहून सावध होण्याचा इशारा दिला होता.

भारतात प्लाझ्माचा अवैज्ञानिकपणे आणि अतार्किकपणे वापर केला जात आहे. प्लाझ्मासंदर्भात करण्यात आलेल्या ताज्या संशोधनात आढळून आलेल्या पुराव्यानुसार प्लाझ्मा उपचार पद्धतीचा रुग्णावर कोणताही चांगला परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे. तरीही भारतभरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांवर प्लाझ्मा उपचार केले जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचे प्लाझ्मा दात्यांचा शोध घेताना फरफट होत आहे,” असं या पत्रात म्हटलं होतं. “सध्या केल्या जात असलेल्या प्लाझ्मा उपचार पद्धतीमुळे करोनाचा अति घातक विषाणू तयार होण्याची शक्यता आहे. असा विषाणू निर्माण झाल्यास सध्याच्या महामारीच्या काळात तो पेट्रोल ओतण्यासारखाच ठरेल,” असा इशारा या तज्ज्ञांनी दिला होता.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.