सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

दिल्लीत शिकाऊ डॉक्टरांच्या आंदोलनात पोलिसांचा लाठीचार्ज

Doctors protest against delay in NEET-PG counselling

सोमवारी रात्री शिकाऊ डॉक्टरांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. पोलीस आणि मोर्चेकरी डॉक्टरांमध्ये हिंसक झडपी झाल्या. पोलिसांनी मारल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

दिल्लीतल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टर्स आंदोलन करत आहेत. त्यांच्या पदवीत्तर प्रवेशाचे घोळ झाले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टरांचे नुकसान होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. परीक्षेची प्रक्रिया सुरळीत करावी म्हणून ते आंदोलन करत आहेत.

मोर्चा सर्वोच्च न्यायालयावर का ?

तर झाले असे आहे, वैद्यकीय विभागाने पदवी झालेल्या डॉक्टरांची पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेतली होती. त्या परीक्षेचे निकाल देखील लागले आहेत. पण काही विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया अन्यायकारक आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले. आर्थिक मागास असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले असल्याचा त्यांचा दावा होता. सर्वोच्च न्यायालयात विदयार्थ्यांच्या मागणीवर सुनावणी झाली आणि सर्वोच न्यायालयाने प्रवेश नियम सदोष असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर बंदी आणली.

सर्वोच्च नायायालयाने प्रवेश प्रक्रिया थांबवल्यामुळे डॉक्टरांच्या पदवीत्तर प्रवेशासाठी उशीर होत आहे. हजारो डॉक्टर्सचा महाविद्यालयांमध्ये प्रवेश झाला नसल्यामुळे ते घरी आहेत. त्यांना काम करण्यास अडचण येत आहे. देशात महामारी असल्यामुळे डॉक्टरांची कमतरता आहे आणि त्यात शिकाऊ डॉक्टरांना संधी नाकारली जात आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने लावलेली बंदी उठवावी म्हणून शिकाऊ डॉक्टर त्यांचा मोर्चा न्यायालयावर नेत होते. प्रवेश प्रक्रियेवर बंदी लावल्यामुळे डॉक्टरांचे नुकसान होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून देणे त्यांचा उद्देश होता.

पोलिसांचा डॉक्टरांवर लाठीचार्ज आणि आंदोलन चिघळले

सोमवारी २७ डिसेंबरला शिकाऊ डॉक्टर्स त्यांचा मोर्चा सर्वोच न्यायालयावर नेत होते. मोर्चेकरी डॉक्टर्स आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हिंसेमध्ये झाले. पोलिसांनी डॉक्टर्संवर लाठीचार्ज केला. लाठीचार्जे मध्ये अनेक डॉक्टर्स जखमी झाले. काही डॉक्टरांना पोलिसांनी अटक देखील केली. डॉक्टरांवर लाठीचार्ज आणि त्यांना अटक केल्यामुळे आंदोलन चिघळले आहे. दिल्लीतील सर्व डॉक्टर शिकाऊ डॉक्टरांचे समर्थन करण्यासाठी सोमवारी रात्रीपासून ज्या पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरांना अटक केली आहे त्याच्या पुढे आंदोलन करत आहेत. डॉक्टरांच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. जो पर्यंत अटक केलेल्या डॉक्टरांची सुटका होत नाही तो पर्यंत आंदोलन करणार असल्याचं मोर्चेकरी डॉक्टर सांगत आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.