सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

 एलन मस्क आणि ट्विटरचं नक्की चाललंय काय ?

ट्विटरचे सर्वात मोठे शेयर होल्डर झालेले एलन मस्क पुढे कोणते पाऊल उचलणार याची चर्चा आठवडाभर सुरु होती. मागच्या आठवडाभरात त्यांनी सूचक ट्वीट करत त्यांनी मोठे पाऊल उचलण्याचा एक प्रकारे इशाराच दिला होता. ज्यामध्ये त्यांनी सोशल मीडिया कंपनीमधील आपला मोठा हिस्सा जाहीर केला, ट्विटरच्या बोर्डावर जागा मिळवली, सार्वजनिकरित्या मोठे बदल केले आणि नंतर बोर्डाची भूमिका नाकारली. ह्या सर्व घडामोडी एका आठवड्यात झाल्या आहेत.
परंतु आता ट्विटरमध्ये अंदाजे ९ टक्के शेयर्स असणार्‍या अब्जाधीशांनी जर सोशल मीडियाच्या व्यवसायाला पुन्हा आकार देण्यासाठी आपल्या कल्पना पुढे रेटल्या तर त्याचे परिणाम वेगेळे दिसतील असं मत जाणकार व्यक्त करत आहेत.
पण या सगळ्यात ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी सोमवारी सकाळी ट्विट करत प्रसिद्धीपत्रक शेअर करत एलन मस्क यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला. एलन मस्क हे ट्वीटरच्या संचालक मंडळात (बोर्ड ) सहभागी होणार नसल्याचं पराग अग्रवाल यांनी जाहीर केलं.

एलन मस्क ट्वीटरच्या संचालक मंडळात का सहभागी झाले नाही ?

संचालक मंडळात सहभागी होणार नसल्याचं आपण शनिवारीच ट्वीटरला कळवलं असल्याचं मस्क यांनी सांगितलं आहे. परंतु, त्यांनी यामागचे कारण सांगितले नाही. मात्र शनिवारचा निर्णय मस्कच्या आता हटवलेल्या ट्विटशी जोडला जात आहे. ज्यामध्ये कंपनीने मोठे बदल सुचवले आहेत, जसे की कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणून जाहिरात करणे आणि त्यांचे सॅन फ्रान्सिस्को मुख्यालय बदलणे इत्यादी. ट्विटरच्या इतर मेंबर आणि मस्कचे एकमत झाले नसल्याच्या बातम्या आहेत.

ट्वीटर काय सांगत आहे

ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल म्हणाले की, मस्क यांनी ट्वीटरच्या संचालक मंडळात सहभागी न होणं हे कंपनीच्या चांगल्यासाठीच आहे, पण याचं कारण पराग यांनी स्पस्ट केलं नाही. पराग अग्रवाल यांनी माध्यमांना सांगितले कि मस्क यांना आम्हाला संचालक मंडळावर
(बोर्डवर )घ्यायचे होते. पण त्यांची पार्श्वभूमी आणि इतर गोष्टींचा अडथळा आल्यामुळे ते जमलं नाही.

मस्कने आपली हिस्सेदारी कशी तयार केली ?

मस्क बर्‍याच दिवसांपासून ट्विट करत होता, परंतु त्यांनी काही महिन्यांपूर्वीच ट्विटरचे स्टॉक खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ३१ जानेवारी रोजी सुरुवात केली, तेंव्हापसून ३६.८३ डॉलर दराने ६२०,००० पेक्षा थोडे अधिक शेअर्स खरेदी केले. एप्रिल १ एप्रिलपर्यंत लाखो शेअर्स खरेदी केले. सध्या ट्विटर मध्ये मस्कचे ७३.१ दशलक्ष शेअर्स किंवा कंपनीचे ९.१ टक्के हक्क आहेत. ते सर्व खुल्या बाजारात विकत घेण्यासाठी त्यांनी २.६४ अब्ज डॉलर्स खर्च केले. मस्कच्या स्टेकसह संपूर्ण ट्विटरचे बाजारमूल्य अंदाजे ३८ अब्ज आहे.

कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल म्हणाले , एलन मस्क यांच्यासोबत आम्ही प्रदीर्घ चर्चा केली. संचालक मंडळात सहभागी झाल्यानंतर असलेली आव्हाने याबाबतची स्पष्टता एलन मस्क यांच्यापुढे ठेवली. कंपनीचे सर्वात मोठे शेयर होल्डर जर संचालक मंडळात सहभागी होत असतील तर त्याचा कंपनीला आणि इतर शेयर्स होल्डर्सनायांना फायदाच होईल असं सांगत एलन मस्क यांना मंडळात जागा देऊ केली होती, ९ एप्रिलपासून हे लागू होणं अपेक्षित होतं. पण त्याच दिवशी सकाळी एलन मस्क यांनी संचालक मंडळात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
शेयर्स होल्डर्सच्या सुचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करत आलो आहे. एलन मस्क हे कंपनीतील सर्वात मोठे शेयर्स होल्डर आहेत आणि आम्ही त्यांच्या सुचना खुल्या मनाने स्वीकारू. कंपनीपुढे अनेक आव्हाने आहेत मात्र आम्ही आमच्या पारदर्शकतेच्या ध्येयापासून जराही दूर जाणार नाही. निर्णय कोणते घ्यायचे आणि कसे अंमलात आणायचे याचे अधिकार संपुर्णपणे आमच्या हातात आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला असून आमही कामावर लक्ष केंद्रित करत आहोत, असं त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात पराग अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.