सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

एलन मस्क यांना रोखण्यासाठी ट्विटरने Poison Pill धोरण आणलंय पण हे काय आहे ?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला मोटर्सचे प्रमुख एलन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटरची १०० टक्के शेयर्स खरेदी करण्याची ऑफर कंपनीला दिली आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रत्येक शेयर या भावाने ट्विटरचे १०० टक्के शेयर्स ४३.३९ अब्ज डॉलरला खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के शेयर्स विकत घेतल्यानंतर ट्विटरचे सर्वात मोठे शेयर्स होल्डर झाले आहेत. साहजिकच त्यांच्याकडे सर्वात जास्त शेयर्स असल्यामुळे कंपनीच्या बोर्डात सहभागी होण्यासाठी कंपनीकडून विचारणा करण्यात आली होती पण एलोन मस्क यांनी ती नाकारली आणि सर्व कंपनीचं विकत घ्यायचा प्रस्ताव दिला आहे. ट्विटरच्या खरेदीसाठी ह शेवटचा प्रस्ताव असल्याचं मस्क यांनी सांगितलं. मात्र एलन मस्क यांना ट्विटर विकण्यास कंपनीचं बोर्ड तयार नाही. एलन मस्क ट्विटर ताब्यात घेण्यासाठी दबाव आणत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करु शकतात अशी भीती असल्याने ट्विटरच्या बोर्डाने ‘पॉयजन पिल’चा (Poision Pill) चा मार्ग अवलंबला आहे.

ट्विटरच्या या धोरणामुळे एलन मस्क यांना कंपनी टेकओव्हर करताना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ट्विटरच्या ह्या निर्णयाने एलन मस्क यांना मोठा झटका बसला असल्याचं बोललं जात आहे. जगभरात सध्या एलोन मस्क , पोईंजन पिल याचीच चर्चा आहे. त्यामुळे हे सर्व काय चाललंय आहे , हे पोईंजन पिल काय असत आणि एलोन मस्कला ट्विटर का विकत घ्यायचं या सर्व प्रश्नाने उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करत करणार आहोत.

पॉयजन पिल काय आहे ?

पॉयजन पिल हे एक असं धोरण आहे ज्याचा वापर एखादी व्यक्ती जबरदस्ती कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ते करण्यापासून रोखण्यासाठी वापरलं जातं. ट्विटरच्या प्रकरणातही असंच होत आहे. या धोरणामुळे त्या विकत घेणाऱ्या व्यक्तीला कंपनी ताब्यात घेताना अनेक अडचणींना येऊ शकतात. पोईंजन पिल धोरण अवलंबल्यावर कंपनी काही सूट देत इतरांना कंपनीचे अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्याची परवानगी देतं. असं केल्याने टेकओव्हर करणाऱ्याच्या शेअर्सच्या किंमती कमी होतात. अशाप्रकारे कंपनी घेण्याच्या किमतीत वाढ होते. म्हणजेच कंपणी विकत घेणं महाग होऊन जात. पॉयजन पिलचा वापर एकदम इमरजन्सीच्या स्थितीत केला जातो.

१९८० मध्ये जबरदस्तीनं कंपन्या विकत घेत असेलेला प्रकारकमी करण्यासाठी या धोरणाचा वापर अमेरिकेत करण्यात आला होता. त्यावेळी उद्योगपती कंपन्यांचे शेअर्र बाजारातून खरेदी करत जबरदस्तीने कंपनी विकत घेण्याचा करण्याचा प्रयत्न करत होते.

ट्विटर विरुद्ध मस्क –कधीपासून सुरु झालं ?

ट्विटर बोर्डाचं असं म्हणणं आहे की, ट्वीटर विकत घेण्यासाठी एलोन मस्कने जी किंमत सांगितली आहे ती योग्य नाहिये. तर एलन एलोन मस्क यांनी जी किंमत सांगितली आली आहे त्यापेक्षा जास्त किंमतीवर चर्चा करण्यास त्यांनी नकार दिला आहे. एलोन यांची भूमिका पाहता एलन मस्क यांनी कंपनी खरेदी करण्यासाठी कंबर कसली आहे असं वाटतं आहे. त्यामुळे ट्विटर बोर्ड घाबरला आहे. एलोन मस्क यांच्या वाचवण्यासाठी त्यांनी ‘पॉयजन पिल’ धोरण अवलंबलं आहे.

आता एलन मस्क काय करेल ?

ट्विटर बोर्डाच्या निर्णयानंतर एलोन मस्क यांनी त्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. पण एलोन आणि ट्विटर दोघे देखील इरेला पेटले आहेत. ट्विटरला त्यांची संपूर्ण कंपनी एलोन यांच्या हातात जाऊ द्यायची नाही तर एलोन यांना काहीही करून ती घ्यायची आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार एलोन यांना रोखणं ट्विटरला खूप जड जाणार आहे. कायदेशीर मार्गाने दोघांना लढाई लढावी लागेल. एलोन मस्कनी तर मी कायदेशीर लढाईला तयार असल्याचं जाहीर केलं आहे. पुढच्या काळात ट्विटर आणि एलोन मस्क यांच्यातली लढाई कुठल्या दिशेला जाते हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. हि केस पुढच्या अनेक केसला दिशा देण्याचं काम करेल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.