सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

निवडणुकांची रणधुमाळी संपली, एक्झिट पोल काय सांगत आहेत कोणाचे सरकार येईल.

उत्तरप्रदेश , पंजाब , गोवा , उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभेची रणधुमाळी संपली आहे. उत्तरप्रदेशात आज ७ मार्च ला सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं. मतदान पूर्ण झालं कि सर्वाना उत्सुकता असते एक्झिट पोलची. निवडणूक निकालाच्या आधी सांगितल्या जाणाऱ्या अंदाजाला इंग्लिश मध्ये एक्झिट पोल म्हणतात.

एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल सारखेच वाटतं असले तरी वेगळे असतात.

निवडणूका लागल्या कि बातम्या देणारे चॅनेल ओपिनियन पोल जाहीर करतात. ओपिनियन पोलचा एवढा प्रचार करतात कि असं वाटतं ज्यांच्या बाजूने ओपिनियन पोल आहे त्यांचच सरकार येईल पण तसं नसतं तो फक्त अंदाज असतो. निवडणुकीचा प्रचार सुरु झाला कि लोक आपोआप ओपिनियन पोलला विसरून जातात आणि निवडणूक जोरात होते. एक्झिट पोल मात्र ओपिनियन पोल सारखे नसतात. सर्व मतदान झाल्यावर एक्झिट पोल जाहीर होत असतात. एक्झिट पोल देणारी संस्था सर्व मतदार संघात जाऊन सॅम्पल घेत असते आणि मग त्यांचा अंदाज जाहीर करते. एक्झिट पोल बऱ्याचदा खरे ठरतात. त्यामुळेच सर्वांचं लक्ष एक्झिट पोल काय म्हणत आहेत ह्यावर असतं. पाच राज्यांच्या विधानसभेचे एक्झिट पोल आले आहेत. कोणत्या राज्यात कोणाचे सरकार बनेल हे समजून घेऊ..

१ ) पंजाब

इंडिया टूडे च्या एक्झिट पोल नुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सरकार बनवेल. एक्झिट पोल मध्ये मतदान टक्का आणि जागा दिल्या आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये टक्कर होती.
एकूण १०० % पैकी पार्टी वाईस मतदानाचाही टक्का असेल राहील.
आम आदमी पार्टी – ४२ %
काँग्रेस – २८ %
अकाली दल – २२ %

इतर -८ %

एकूण १३० जागांपैकी पंजाबमध्ये इंडिया टुडे नुसार अश्या जागा असतील.
आम आदमी पार्टी – ७६ -९०.
काँग्रेस -१९ -३१
अकाली दल – ७-११
इतर – ०-२

२ ) उत्तरप्रदेश

टाईमस ऑफ इंडियाच्या एक्झिट पोल नुसार उतररप्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांना सत्ता राखण्यात यश मिळत असल्याचा भाकीत केलं आहे. उत्तरप्रदेश मध्ये समाजवादी पार्टी आणि भाजप यांच्यात टक्कर होती. समाजवादी पार्टी आणि भाजप यांच्या शिवाय उत्तरप्रदेश मध्ये काँग्रेस आणि बीएसपी निवडणूक लढवत होती. टाईमस ऑफ इंडियाच्या एक्झिट पोल नुसार उत्तरप्रदेशात ४०३ जागा पैकी अश्या जागा राहतील.
भाजपा- २४०
समाजवादी पार्टी+ युती – १४०
बीएसपी – १७
इतर – ६

३ ) उत्तराखंड

उत्तराखंड मध्ये २०१७ पासून भाजपचे सरकार होते. टाईमस ऑफ इंडियाच्या एक्झिट पोल नुसार २०२२ ला पण भाजप सरकार बनवेल. उत्तराखंड मध्ये एकूण ७० जागा आहेत. उत्तराखंड मध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात टक्कर होती. ७० पैकी एक्झिट पोल नुसार उत्तराखंड मध्ये अश्या जागा राहतील.
भाजप – ३७
काँग्रेस – ३१
आम आदमी पार्टी -१
इतर – १

४) गोवा

४० जागा असलेल्या गोवा पण या वर्षी खूप चर्चांमध्ये होते. टाईमस ऑफ इंडियाच्या एक्झिट पोल नुसार गोव्यात कोणताही पक्ष सरकार बनवायच्या स्थितीत राहणार नाही. पण काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल. एकूण ४० जागांपैकी गोव्यात अश्या जागा राहतील.
भाजप – १४
काँग्रेस -१६
आम आदमी पार्टी -०४
इतर -०६

५ ) मणिपूर

पाच राज्यात निवडणूक होत्या मात्र सर्वात कमी चर्चा झाली ती मणिपूरच्या निवडणुकीची. मणिपूर गोव्यापेक्षा मोठे राज्य आहे पण इतर राज्यांच्या तुलनेत छोटेच ठरले. मणिपूर मध्ये एकूण ६० जागा आहेत. टाईमस ऑफ इंडियाच्या एक्झिट पोल नुसार मणिपूर मध्ये काँग्रेस सरकार बनवेल. मणिपूर मध्ये एकूण ६० अश्या जागा राहतील.
काँग्रेस – ३१
भाजप – १७
इतर १२.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.